चर्चा:राष्ट्रभाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संमिलीकरण[संपादन]

तांत्रिकदृष्टीने शक्य असेल तर या पानाचे हिंदी भाषा या पानात संमिलीकरण (मर्जर) केले जावे, त्यानंतर तेथे विश्वकोष लेखाच्या निकषांनुसार संपादन, पुनर्लेखन केले जावे हा प्रस्ताव मी ठेवीत आहे. कुणाला आक्षेप नसेल तर येत्या आठ दिवसांत हे काम व्हावे ही अपेक्षा. - मनोज ०९:३६, १५ मार्च २०१० (UTC)

या मीलनीकरणाला माझा विरोध आहे. कारणे --
राष्ट्रभाषा हे मोघम (generic) शीर्षक आहे. येथे राष्ट्रभाषा या विषयावर माहिती हवी. एखाद्या विशिष्ट देशाच्या राष्ट्रभाषेबद्दल नाही.
हिंदी भाषा व भारतीय राष्ट्रभाषा या दोन पानांचे मीलनीकरण योग्य राहील.
इतर सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे हिंदी हीच भारतीय राष्ट्रभाषा आहे कि नाही याबद्दल पुरावा नाही (नसल्याचा पुरावा येथे खाली आहे). असा पुरावा आढळल्यास भारतीय राष्ट्रभाषा व हिंदी भाषा यांचे मीलनीकरण करावे.
अभय नातू ०५:४७, २४ मार्च २०१० (UTC)

बदल साचा[संपादन]

बदल साचा लावण्यामागची कारणे --

१. ललितलेखन

२. वैयक्तिक मते

३. अयोग्य शीर्षक (फक्त भारतातील राष्ट्रभाषा विषयावर लेखन)

अभय नातू १८:१७, २८ डिसेंबर २००९ (UTC)

हा लेख नक्की कशाच्या संदर्भात आहे?[संपादन]

विकिपीडिआ चाळता चाळता सहज माझी दृष्टी ह्या लेखावर गेली,तस पाहिलं तर सध्या हा मुद्दा अगदी वारंवार पाहण्यात/ऐकण्यात येतो पण विकिवर ह्या विषयी काही माहिती आहे का हे पाहण्यास म्हणून आलो तर हे काय भलतच... इथला लेख तर चक्क एकाच विषयावर बोलतोय,एकंदरीत वाचण्यावरून असे लक्षात येते कि हा राजकारण प्रेरीत लेख आहे तसेच तो कुणा हिंदी भाषा प्रचारकाने लिहिला असावा कारण विशेषकरून तो बहुभाषिक राष्ट्राची कल्पनाच मुळात चुकीची आहे असे सूचित करतोय.भारताचे ऐक्य आणि अखंडता हे विविधतेत (बहुविध भाषा संस्कृतीत) दडलेले आहे त्याविषयी कुणालाच संशय नसावा . विविधता हिच भारताची शक्ती आहे असे बाहेरच्या देशातील लोक उल्लेख करतात हे मात्र सांगायला लेखक विसरलेला दिसतोय.असो. एक मस्तच वाक्य लिहिले आहे त्याचा संदर्भ काय आहे हे लेखकाने दिलेच नाहिये "हिंदी समजणारे या देशात 80 टक्के लोक आहेत (आता हे कुठे वाचलं??). इंग्रजी समजणारे फक्त 3 टक्के लोक आहेत (बापरे हे मात्र अतिच झाले, अहो भारतात शिक्षणाचा दर ६१ % इतका आहे,इंग्रजी वृत्तपत्र भारतात जेवढी खपतात तेवढी ती इंग्लंडमध्ये देखील खपत नाहीत आणि माझ्या माहिती प्रमाणे हा "डाटा" १९९५ चा आहे,आज इंग्रजी शिवाय नोकर्या व स्पर्धा परिक्षांना प्रवेश मिळत नाही असे असतांना ह्यांना असे म्हणायचे आहे का इंग्रजी फक्त मुलांनाच येते इतरांना नाही?)." ?? भारताची अधिकांश लोकसंख्या हि तरूण आहे हे ह्यांना माहित नसावे कदाचित. अर्थात विषय हा नाहिये ,परंतु ह्या लेखकाचे नक्की म्हणणे काय आहे? त्याला ह्यातून काय सूचित करायचे आहे? "मुंबईच्या बॉलीवुड मधुन हिंदी काढा मग पहा किती हाहाकार माजतो." ह्याचा अर्थ असा हिंदी शिवाय इतर भाषांत चित्रपट बनू शकत नाहित असा आहे का? कि फक्त हिंदीच चित्रपट हे चित्रपट असतात? माझ्या माहिती प्रमाणे तमिळ आणि तेलूगू ह्या हिंदीच्या दुप्पट चित्रपट बनवितात व त्यांचे त्यामुळे हाहाकार उडेल असे काहीच होत नाही. असो असे ह्यासारखे अनेक वाक्य आहेत जे ह्या लेखकाने का लिहिले असावेत ते माहित नाही, परंतु व्यवस्थापकांनी असले लेख जे नि:पक्षपाती नसतील ते ठेऊच नयेत अशी विनंती.मग ते कोणत्याही विषयावर असो. Prasannakumar १६:४०, ९ मार्च २०१० (UTC)

लेखकाने हे देखील करावे[संपादन]

आत्ताच ह्या लेखाच्या लेखकाचा पूर्वानुभव व कार्य पाहिले त्यात असे आढळून आले कि ते मराठीतील साहित्य हिंदीत भाषांतरीत करू शकतात तसेच त्यांना हिंदी व त्याविषयीच्या लिखाणाची गोडी दिसते ,तेव्हा अशा लेखकांनी मराठी साठी देखील काही करावे,हिंदी विकिपीडिया वरील अनेक लेख जे मराठीत नाहियेत असे, ते जर त्यांनी मराठीत भाषांतरीत (हिंदी चे शुद्ध मराठीत) केले तर खूपच मोलाची भर पडेल व मराठी विकिपीडियाची भरभराट होईल.एवढीच अपेक्षा. Prasannakumar १६:४०, ९ मार्च २०१० (UTC) आभार

धन्यवाद मला मराठी साठी काम करायला नक्कीच आवडेल. हिंदी बरोबर मराठी साठी मी विकिपिडियात योगदाना साठी तयार आहे. आपल्या प्रोहत्साहना बद्धल धन्यवाद. --विप्र ०९:०७, १० मार्च २०१० (UTC)

राष्ट्रभाषा .......? प्रयोजन काय?[संपादन]

नेमके हिंदी बाबतीत लेखक महाशय यांनी सांगितलेली माहिती जी हिंदी चे महात्म्य सांगते.या पेक्षा मराठी भाषेला हिंदी पेक्षा खूप मोठा इतिहास आहे.हे विसरून चालणार नाही.काही मुद्दे खटकले त्यामुळे मी पण वादग्र्स्त साचा लावला. कृपया लेखकानी संदर्भ द्यावेत.पुस्तकी पेक्षा संकेतस्थळा चे जिवंत दुवे दिले तर आनंद वाटेल. विनोद रकटे १५:५७, १० मार्च २०१० (UTC)

राष्ट्रभाषा सर्वांगीण विचार[संपादन]

राष्टभाषा या लेखाकरिता काही दुवे दिले आहेत. लेखात काही अशुध्द लेखनाच्या चुका असतील तर कृपया जाणकारांनी त्या सुधारण्याकरिता मदत करणे. अजुन अमेरिकेत राष्ट्रभाषा इंग्रजी स्थापित होऊ शकलेली नाही. या संदर्भातील बिल सिनेट मध्ये अनिर्णयित आहे. अन्य देशातील राष्ट्रभाषा संदर्भातील माहिती या लेखात जोडता येईल. लेख केवळ भारतातील राष्ट्रभाषा विषयावर केंद्रीत होऊ नये असे मला वाटते कारण राष्ट्रभाषा ही संकल्पना अद्याप अनेक देशात विवादास्पद आहे. मी हिंदीचा प्रचार करतो त्यामुळे मी हिंदी भाषेला समोर ठेउन लेख लिहिला आहे परंतु आपल्या प्रतिक्रिया वाचल्या नंतर या लेखात केवळ राष्ट्रभाषा हा मुद्दा लक्षात ठेऊन संपादन करावे लागेल. कृपया जाणकारांनी मदत करावी. --विप्र ११:५३, १० मार्च २०१० (UTC)

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा गृहमंत्रालयही म्हणते हिदी राष्ट्रभाषा नव्हे![संपादन]

कृपया हे दुवे पाहावे.


विनोद रकटे ००:५७, ११ मार्च २०१० (UTC)

लेखक हिंदीचे प्रचारक असल्यामुळे[संपादन]

लेखक हिंदीचे प्रचारक असल्यामुळे :

 • त्यांचे देखील वैयक्तिक मत असावे कि हिंदीच फक्त एकमेव राष्ट्रभाषा व्हावी. (जो ज्याचा प्रचारक आहे त्याला त्याचे महत्त्व हे आलेच,स्वाभाविक आहे हे.)
 • एखाद्या गोष्टीचा प्रचारक म्हणून कामात पडलो कि आपसूकच त्याविषयीची मानवास माहिती होत उलगडत जाते व ती लोकांसमोर मांडायला अनेक मुद्दे (पटवून द्यायला) मिळत जातात,स्वाभाविक आहे हे.
 • त्यांच्या कडे हिंदीलाच महत्त्व का द्यावे (तीचे महात्म्य) किंवा त्या विषयीच्या अनेक लिंक्स/ दुवे असणारच .(उद्या कुणी मराठीचा प्रचारक झाला तर त्यालाही अनेक रहस्य उलगडतीलच(हे लेखकाने केले तरीही त्यात कुणाचाही आक्षेप नसेल असे मला वाटते.)स्वाभाविक आहे हे.)
 • एकाच विषयावर एकतर्फी लिखाण करणार्याला इतर गोष्टींचा विसर पडतोच किंवा त्या वेळी इतर विचार मनात नसतोच,स्वाभाविक आहे हे.
 • त्यांच्या शुद्धलेखणात अनेक चुका आढळतात (अनेक हिंदी शब्द),हिंदीच्या प्रभावामुळे आज बरीच माणसे अगदी सुशिक्षीत मंडळी सुद्धा नीटशी मराठी बोलू शकत नाही किंवा त्यांना मायबोलीतील अनेक शब्दांचा विसर पडलेला असतो ,स्वाभाविक आहे हे.
 • त्यामुळे तूर्त लेखकास ह्यात बदल करण्यास प्रोत्साहित करून मदत करावी अशी मी अपेक्षा बाळगतो.

काय आहे प्रत्येक जण आपआपल्या शिकवणीनुसार आणि आलेल्या अनुभवांनुसार लिखाणाद्वारे आणि भाषणांद्वारे किंवा बोलून भावना व्यक्त करतो, हा निव्वळ मानवी स्वभाव आहे, त्यामुळे कुणीही ठरवून एखाद्या हेतूने एखाद्या मुद्यात हात घालत नाही.सांगायचा मुद्दा असा कि आपण सर्वांनी लेखकास प्रवृत्त करावे कि त्याने ह्यापुढे कोणत्याही गोष्टीचा प्रचार म्हणून लिखाण करु नये हि विनंती / शक्यतो वादग्रस्त लिखाण करु नये

 • ता.क.= लेखकास हि बाब खटकु शकते कि मीच त्यांना एवढे प्रतिसाद का देत आहे ,आहो स्वाभाविकच आहे शेवटी मी माणूस म्हणून जन्माला आलो ते मला ह्या जगात मराठीभाषेनेच शिकविले इतकेच नाही तर मी तिचा जाज्वल्य इतिहास जो हिंदी पेक्षा खूपच मोठा आहे हे देखील शिकलो आहे त्यामुळे अशा विषयात जातीने लक्ष घालणारच ,स्वाभाविक आहे हे.

.Prasannakumar ०४:१७, १४ मार्च २०१० (UTC)


मला येथे माझे विचार प्रकट करण्याची संधी दिल्या बद्दल धन्यवाद. मी हा लेख सुधारु इच्छितो. यावर अधिक चर्चा जरुर नोंदवावी. --विप्र ०९:२६, १५ मार्च २०१० (UTC)

चर्चा करून काय उपयोग[संपादन]

चर्चा करून काय उपयोग पुन्हा तेच..आधीचाच मुद्दा आपण पुन्हा नव्या मांडणीत लिहीला आहे.असो. तुम्ही वरील चर्चा पुनःश्च एकदा वाचा आणि जमल्यास हिंदीचा प्रचार न करता नव्या पद्धतीने हा लेख लिहा असे मी सूचवतो.Prasannakumar १०:०७, १५ मार्च २०१० (UTC)

एक बाह्यदूवा[संपादन]

माझ्या पहाण्यात आलेला एक बाह्यदूवा http://www.petitiononline.com/19652007/petition.html तो जमल्यास वाचावा.

लेखातील त्रुटी व त्याविषयीच्या वैयक्तिक सूचना[संपादन]

लेखातील त्रुटी व त्याविषयीच्या काही (वैयक्तिक) सूचना.
ह्या वाचून ह्यात काही कमी जास्त असेल तर ते निदर्शनास आणून कृपया लवकरात लवकर असे लेख मार्गी लावावे.

 • हा लेख एखाद्या भाषेच्या जाणकाराने लिहीणे अपेक्षीत आहे,कोणत्याही भाषेच्या प्रचारकाने नव्हे.
 • ह्या लेखात लेखक जो भाषेचा प्रचार करू पाहत आहे आणि जितके मुद्दे उपस्थित करत आहे तितकेच मुद्दे किंबहुना त्याहून अधिक मुद्दे त्या विरोधात देखील असू शकतात (किंवा पुराव्यादाखल मांडले जाऊ शकतात) ह्याचे लिहीतांना भान असावे.
 • राष्ट्रभाषा असो कि कोणतीही भाषा असो लिखाणात कोणत्याही दूसर्या /इतर भाषांविषयी तुलनात्मक /दर्जात्मक लिखाण करू नये.तसे केल्यास इतर कुणीही तसेच तुलनात्मक/दर्जात्मक लिखाण करू शकतो ह्याचे लेखकाने भान असू द्यावे.
 • एखादी गोष्ट पटवून देण्याची किंवा प्रचाराची हि (मराठीतील विकिपीडिया) जागा नसावी.
 • हा लेख अगदी सोपा आणि नीटनेटका ,संक्षीप्त कसा होईल ह्यावर अधिक भर देण्यात यावा.(विनाकारण मुद्दे आणि त्यांचे स्पष्टी़करण त्या जोडीस वैयक्तिक मत अजिबात मांडू नये.)
 • मराठी विकिपीडिया अधिकाधिक दर्जेदार कसा होईल ह्याबाबत आग्रही असावे व त्यासंबंधीत सूचना करण्यात याव्या हि अपेक्षा.
 • आपल्या लिखाणाने वाद निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी प्रत्येक लेखकाने घ्यावी अशी विनंतीवजा सूचना.

चूकभूल द्यावीघ्यावी क.लो.अ. Prasannakumar ११:०३, १५ मार्च २०१० (UTC)

वेदोक्त = राष्ट्रभाषा[संपादन]

मागच्या वेळी वेदोक्तबाबत जशी चर्चा झाली होती तशीच विनाकारण येथे होत आहे..इथे पण मला तेच सांगायचे आहे.हिंदी भाषा चा प्रचार केल्यासारखा तसेच तुलनात्मक् लेखन हे विकिपिडियास धरून नाही.प्रचार केला म्हणजे जाहिरातबाजी ठरते.व ते विकिपिडियास असा जाहिरात सदृश्य मजकुर नसावा या दृष्टिने मी माहिती काढली आहे.राष्ट्रभाष याचा अर्थ काय व लिहिले काय आहे.व्याख्या बरोबर वाटली. वेदोक्त लेखात ही असाच गोंधळ आहे.कळावे.

विनोद रकटे

ह्या लेखात आता पुन्हा अधिक काही नको.[संपादन]

राष्ट्रभाषा हा वादग्रस्त विषय असल्याकारणाने ह्यात अधिक माहिती भरून विनाकारण दिशाभूलही करू नये तसेच वादास जागा निर्माण करु नये हि विनंती -Prasannakumar ०३:४२, २० मार्च २०१० (UTC)

अभिव्यक्तीवर बंधन[संपादन]

मराठी विकिपीडिया टीमला नमस्कार. माझा लेख राष्ट्रभाषा वादग्रस्त ठरविल्या बद्धल मला वाईट वाटले. खरे पाहता हा लेख सुधारता आला असता.लेखाची फक्त व्याख्या ठेवली आहे. येथे माझ्या अभिव्यक्तिवर बंधन आल्याचे मी नम्रपणे नमुद करु इच्छितो. इ.स. 1880 मध्ये पुण्यात एका सार्वजनिक परिसंवादात केशव वामन पेठे या व्यक्तिने देशातील संपर्क भाषा हिंदी वर अभ्यासपूर्ण निबंध सादर केला. या परिसंवादाचे आयोजन लोकमान्य टिळक यांनी केले होते. या परिसंवादाचा विषय देशातील भिन्न विभिन्न भाषी लोकांसाठी संपर्क माध्यमाची एक भाषा कोणती असावी हा ठेवला होता. या निबंधाच्या अनुषंगाने लो.टिळक यांनी राष्ट्रभाषा नावांचे पुस्तक प्रकाशित करण्याचे सूचविले. राष्ट्रभाषा या विषयावर मराठी लोकांनीच चर्चा सुरु करून राष्ट्रीय आंदोलनास पाठिंबा दिला होता. हा इतिहास मराठी लोकांनी विसरु नये. --विप्र ०५:११, २४ मार्च २०१० (UTC)

नमस्कार विप्र,
मी या लेखाचा सातत्याने पाठपुरावा केलेला नाही पण तुमचे माझ्या अभिव्यक्तिवर बंधन आल्याचे मी नम्रपणे नमुद करु इच्छितो हे उद्गार वाचून येथे काही लिहावेसे वाटले.
तुम्ही लिहिलेल्या लेखात इतर सदस्यांना क्षती आढळल्याने त्यांनी यात बदल केले. यावर तुमची प्रतिक्रिया येथे नमूद करावी व अशा सदस्यांशी (सु)संवाद साधून मध्यममार्ग काढून मजकूर पुनर्स्थापित करावा अशी (नम्रच) सूचना.
राष्ट्रभाषा हा विषयच तसा वादातीत नाही, तरी हे लक्षात ठेवूनच लिखाण करावे. मी बदल साचा लावला व त्यामागची कारणे नमूद केली होती, त्यांची दखल घ्यावी ही विनंती.
तुमच्या अभिव्यक्तीप्रमाणेच इतर सदस्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यही ध्यानात ठेवावे.
आत्तापर्यंत तुम्ही मराठी विकिपीडियावर बहुमोल योगदान केले आहे तसेच वाद झाले असता संयम दाखवला आहे तरी हेच कायम ठेवावे ही विनंती. तुम्ही रागावून किंवा वैतागून निघून जाऊ नका अशीही पुस्तीवजा विनंती.
अभय नातू ०५:३४, २४ मार्च २०१० (UTC)

अहो लेखक महोदय पुन्हा आपण तोच मुद्दा घेऊन वेगळ्या मार्गाने येतात असेच दिसत आहे.आपण माझे मुद्दे नीट पुन्हा वाचावे त्यात मी स्पष्टपणे म्हटले आहे कि आपणांस आपली बाजू कशी खरी आहे हे पटविण्यासाठी इतिहासात अनेक मुद्दे सापडतीलही (ज्याचे दाखले आपण वारंवार देत आहात,कि मराठी लोकांनी कशी हिंदीची बाजू घेत इतिहासात कार्य केली आहेत,परंतु ते कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या संदर्भात (अनुषंग /context) म्हटले होते ह्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती असल्याखेरीज आपण त्यावर वक्तव्य करणे योग्य वाटते का?) अहो तुम्ही १८८० मधले पुरावे देतात आत्ता ह्याचा काय संबंध ह्या लेखाशी?? तसच जर काही असेल तर मग मराठी लोकांनी किंवा इतर सर्वच भाषकांनी जर त्यांचा इतिहास चाळला तर नक्कीच वेगळेच निष्कर्ष आणि माहिती जगासमोर येतील ह्याचा देखील विचार व्हावा.मी काही भाषा तज्ञ नाही परंतु कोणत्याही भाषेची बाजू न घेता हे निश्चीतपणे सांगू शकतो भाषांचा इतिहास खूपच व्यापक आणि आज ज्यापद्धतीने मांडला जातो त्याहूनहि भिन्न आहे (हे माझ्या तुटपूंज्यामाहिती वरुन सांगत आहे ).आपण एकच रट्टा लावला आहे मराठी लोक (पूर्वी आणि कदाचीत आजही?) हिंदीची बाजू घ्यायचे म्हणुन हिंदी हिच राष्ट्रभाषा व्हावी,ह्याला काही अर्थ आहे का? ज्यांनी ह्या विरोधात आवाज उठविला त्यांचे संदर्भ द्यायला मात्र आपण विसरला आहात आणि त्याची व्यापकता आपण दुर्लक्षीत करत आहात,असे करून कसे चालेल?(लेखात सर्वच बाबींचा/मुद्यांचा विचार व्हावा आणि मांडणी देखील असावी.) आपण एका स्वतंत्र सार्वभौम देशात राहतो त्यामुळे सर्वांच्या विचाराचा सन्मान व्हायलाच हवा.आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतोच पण तुम्हीही इतरांच्या अभिव्यक्तीचा आदर करून त्यांचे म्हणणे त्यांच्या दृष्टीकोनातून पहावे.अभय नातूंच्या मताशी मी सहमत आहे,त्यांच्या विनंतीचा विचार करून पुढिल कार्य चालू ठेवाल अशी अपेक्षा.क.लो.अ.चुकभूल द्यावी घ्यावी. Pra.K. ०६:४४, २४ मार्च २०१० (UTC)