Jump to content

अभिजात भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.[]

  • भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे ।
  • भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे ।
  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत ।
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा ।

हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.

अभिजात भाषांची यादी

[संपादन]

भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, पाली, प्राकृत, उडिया आणि आसामी अशा अकरा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.[]

मराठी भाषेसाठी प्रयत्न

[संपादन]

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी महाराष्ट्र राज्य शासन तर्फे रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.[] ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने यांच्या पुढाकाराने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.[][]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "अभिजात दर्जा म्हणजे काय रे भाऊ?". न्यूझ१८ लोकमत. 2018-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ "मराठीच्या कलशाची अभिजात घटस्थापना; निवडणुकांच्या तोंडावर मोठा निर्णय". लोकमत. 2024-10-03. 2024-10-04 रोजी पाहिले.
  3. ^ "मराठी भाषा आणि अभिजात दर्जा". सामना. 2018-04-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-08 रोजी पाहिले.
  4. ^ "मोठी बातमी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय". एबीपी माझा. 2024-10-03. 2024-10-03 रोजी पाहिले.
  5. ^ "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय". टीव्ही९ मराठी. 2024-10-03. 2024-10-03 रोजी पाहिले.