Jump to content

राम सुतार (शिल्पकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ram Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; 拉姆·V·蘇塔爾; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; রাম ভি সুতার; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; राम सुतार (शिल्पकार); Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; رام فنجي سوثار; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; રામ વંજિ સુતાર; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; ラーム・V・スタール; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; رام فنجى سوثار; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; राम सुतार; ᱨᱟᱢ ᱵᱚᱧᱡᱤ ᱥᱩᱛᱟᱨ; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; 拉姆·V·苏塔尔; ராம் வன்ஜி சூதார்; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram V. Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; രാം വഞ്ജി സുതർ; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; ରାମ ବଞ୍ଜି ସୁତାର; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; Ram Vanji Sutar; రామ్‌ సుతార్‌; 拉姆·V·苏塔尔; Рам Сутар; artista indio; ভারতীয় শিল্পী; artiste indien; ભારતીય શિલ્પકાર (૧૯૨૫-૨૦૨૫); indijski umjetnik; artista indi; भारतीय कलाकार; ଭାରତୀୟ କଳାକାର; artist indian; artist indian; ealaíontóir Indiach; Indian artist; India kunstnik; artista indio; אמן הודי; Onye omenkà si India; індійський митець; भारतीय मूर्तिकार (1925-2025); భారతీయ శిల్పి; intialainen kuvanveistäjä; Indian artist; نحَّات هندي; Indian artist; இந்தியக் கலைஞர்; Ram Vanji Sutar; Ram V. Sutar; রাম সুতার; রাম ভাঞ্জি সুতার; Ram V. Sutar; રામ વી સુતાર; Ram V Sutar; Ram V. Sutar; Сутар, Рам; शिल्पकार राम सुतार; राम सुतार; Ram V. Sutar; Ram V. Sutar; ରାମ ଭି ସୁତାର
राम सुतार (शिल्पकार) 
भारतीय कलाकार
माध्यमे अपभारण करा
स्थानिक भाषेतील नाव
  • राम सुतार
जन्म तारीखफेब्रुवारी १९, इ.स. १९२५
धुळे
मृत्यू तारीखडिसेंबर १८, इ.स. २०२५
नोएडा
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९५९
कार्य कालावधी (अंत)
  • इ.स. २०१४
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • शिल्पकार
उल्लेखनीय कार्य
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q7288610
व्हीआयएएफ ओळखण: 69167198960967632538
यूएलएएन ओळखण: 500714776
आरकेडीआर्टिस्ट ओळखण: 468623
Europeana entity: agent/base/130476
विकिडाटावर माहिती संपादित करा
फंचल (पोर्तुगल) येथील राम व्ही. सुतार यांनी केलेले महात्मा गांधी यांचे जीवनप्रतिमान

राम वंजी सुतार (१९ फेब्रुवारी, १९२५ - १८ डिसेंबर २०२५)[] हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार होते. यांचा जन्म इ.स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. सुतार यांनी २००हून अधिक शिल्पे जगातील पाचही खंडांत बनवली आहेत. दिल्ली येथील संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांची शिल्पे आहेत.[]

जीवन

[संपादन]

इ.स. १९५२ मध्ये सर जे. जे. आर्टस कॉलेजमध्ये शिल्पकलेची पदवी मिळवली. यावेळी त्यांना मानाचे मेयो सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९५४ मध्ये भारतीय पुरातत्त्व खात्यात नोकरीची सुरुवात - औरंगाबाद येथे केली. अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील खराब झालेल्या शिल्पांची डागडुजी करण्याचे काम त्यांनी केले. इ.स.१९५८मध्ये त्यांनी दिल्लीला स्थलांतर केले.

बालपण

[संपादन]

त्यांचे वडील लोहारकाम आणि सुतारकाम करीत असत. शेतीची अवजारे तयार करणे, बैलगाडी बनविणे, लाकडावर कोरीव काम करणे, मातीची खेळणी बनविणे, शेणाने सारवलेल्या भिंतीवर चित्रे रंगविणे वगैरे गोष्टी ते लहानवयातच शिकले. त्यांच्या धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावात शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी मँट्रिकपर्यंत शिक्षण आपल्या नातेवाईकांकडे राहून अतिशय कष्टाने पूर्ण केले. मुंबई येथे त्यांनी श्रीराम कृ. जोशी ह्यांच्या मार्गदर्शनानुसार सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेऊन १९५३ साली शिल्पकलेत प्रथम वर्गात पदविका मिळविली. त्यांच्या शिल्पकार म्हणून कारकिर्दीला सन १९६० मध्ये चंबळ नदीच्या सीमेंट-कॉन्क्रीटच्या प्रतिकात्मक शिल्पाकृती ने झाली. हे शिल्प चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाच्या ठिकाणी आहे.[]

सर्जनशील वाटचाल

[संपादन]

राम सुतार ह्यांनी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाची शंभरी पार केली. त्यांच्या पंचाहत्तर वर्षाच्या शिल्प घडविण्याच्या कारकिर्दीत त्यांनी व्यक्तिशिल्पे, म्युरल्स, एखाद्या संकल्पनेला धरून शिल्प असे अनेक शिल्पकला प्रकार हाताळले. दिल्लीत त्यांनी व्यक्तींचे सुमारे पन्नास पुतळे बनविले. त्यांनी बनविलेल्या शिल्पाकृती संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि विविध राज्ये आणि देशविदेशात आहेत. त्यांनी आकाराने मोठे तसेच संख्येने मोठे असे अनेक पुतळे बनविले. विचारमग्न अवस्थेत असलेले महात्मा गांधी यांचे संसदभवन येथील कलात्मक व्यक्तीशिल्प आणि वल्लभभाई पटेल ह्यांचे सरदार सरोवर येथील स्टॅचू ऑफ युनिटी नावाचे उत्तुंग शिल्प ही त्यांची सर्वात लोकप्रिय शिल्पे आहेत. स्टॅचू ऑफ युनिटी हा १८२ मीटर (५९७ फूट) उंची असलेला जगातील सर्वात उंच पुतळा आहे.[]

मृत्यू

[संपादन]

१८ डिसेंबर २०२५ रोजी वयाच्या १०१व्या वर्षी सुतार यांचे वृद्धापकाळाने नोएडा येथील निवासस्थानी निधन झाले. नोएडा येथे सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.[][]

पुरस्कार

[संपादन]

१९९९ मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि त्यानंतर २०१६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[] ऑक्टोबर २०१८ मध्ये, सुतार यांना २०१६ सालचा सांस्कृतिक सलोख्यासाठीचा टागोर पुरस्कार मिळाला.[] त्यांची राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० मार्च २०२५ रोजी विधानसभेत ही माहिती दिली.[][][१०]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 "आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला". एबीपी माझा. १८ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. राम सुतार. Loksatta (Marathi भाषेत). १८ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले. संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) असे पुतळे घडविले आहेत, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही अनेक पुतळे त्यांनी घडविलेले आहेत, रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकिओतील पुतळा राम सुतार यांनी निर्मिलेला आहे, तसेच गांधीजींचे त्यांच्या स्टुडिओत घडलेले अनेक अर्धपुतळे भारत सरकारने परदेशांना भेट म्हणून दिलेले आहेत.CS1 maint: unrecognized language (link)
  3. महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार, दिनांक,७ मार्च २०२५
  4. Sharma, Ashwani (2014-12-29). "14 Things You Did Not Know About Sardar Patel, The Man Who United India". TopYaps (इंग्रजी भाषेत). 2018-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-31 रोजी पाहिले.
  5. "महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन". दैनिक लोकमत. १८ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  6. "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 2015-10-15 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 21 July 2015 रोजी पाहिले.
  7. "Tagore Awards for Cultural Harmony: Manipuri dancer, Bangladeshi sculptor among recipients". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-10-26. 2021-06-12 रोजी पाहिले.
  8. "Sculptor Ram Sutar to get Maharashtra Bhushan award: CM Devendra Fadnavis". The Economic Times. 2025-03-20. ISSN 0013-0389. 2025-03-20 रोजी पाहिले.
  9. "Sculptor Ram Sutar, designer of Statue of Unity and KIA's Kempegowda statue, to get Maharashtra Bhushan award". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2025-03-20 रोजी पाहिले.
  10. "Maharashtra: राम सुतार को मिलेगा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, स्टैच्यू ऑफ यूनिटी समेत बना चुके हैं ये प्रतिमाएं". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2025-03-20 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत