रविराज इळवे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
रविराज गणपत इळवे हे महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागातील एक अधिकारी[१] आहेत.
रविराज इळवे | |
---|---|
जन्म |
१७ जुलै १९६९ मुंबई, महाराष्ट्र |
शिक्षण | बीएससी, एमएसडब्लू, एलएलबी |
प्रशिक्षणसंस्था | फर्ग्युसन कॉलेज, कर्वे समाज सेवा संस्था, पुणे विद्यापीठ |
मूळ गाव | घोडेगाव, पुणे |
पदवी हुद्दा | अपर कामगार आयुक्त/ कल्याण आयुक्त |
एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रविराज इळवे यांचे प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील गोनवडी ( घोडेगाव ) या छोट्या वाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत व पुढील शालेय शिक्षण घोडेगाव व चिंचवड येथे झाले.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शास्त्र शाखेतील पदवीचे शिक्षण घेत असताना रविराज इळवे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) स्वयंसेवक व पुढे फर्ग्युसनचे एनएसएस युनिट इन्चार्ज झाले. सन १९९०-९१ या वर्षी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून त्यांची पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) प्रतिनिधी (यु.आर.)म्हणून नामनिर्देशनाने नेमणूक करण्यात आली होती.
राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत समाज सेवेचे धडे गिरवल्याने या क्षेत्रातच पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी कर्वे समाज सेवा संस्था, पुणे येथून कामगार कल्याण या विषयात एम एस डब्लू ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे १९९५ मध्ये निवड होऊन त्यांची महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागात कामगार अधिकारी या पदावर नियुक्ती झाली. तदनंतर त्यांनी सहायक कामगार आयुक्त, उप कामगार आयुक्त, प्र. सह कामगार आयुक्त आणि अपर कामगार आयुक्त या विविध पदांवर मुंबई, पुणे, रायगड, पालघर, नाशिक, जळगाव जिल्ह्यात काम केले आहे. कामगार आयुक्तालयात राज्य बाल कामगार कक्षाचा प्रमुख तसेच राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचा सचिव म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कल्याण आयुक्त पदावर ते सध्या कार्यरत असून या मंडळाचा राज्य स्तरीय प्रशासकीय प्रमुख म्हणून ते जबाबदारी पार पाडत आहेत.
त्यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या सेवा काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना केलेली काही उल्लेखनीय कामे खालील प्रमाणे आहेत.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ :
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, कार्यक्रम आणि उपक्रम अधिक कामगाराभिमुख व्हाव्येत व त्यांचे आयोजन/अंमलबजावणी नियमितपणे आणि प्रभावीपणे व्हावी यासाठी त्यांनी योगदान दिले आहे.[२]
कामगार साहित्य संमेलन :
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून भरविण्यात येणारे कामगार साहित्य संमेलन सन २०११ नंतर बंद पडले होते. कामगार साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा हा उपक्रम रविराज इळवे यांनी पुन्हा सुरू करून २४ व २५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचे मिरज , जिल्हा सांगली येथे यशस्वीरीत्या आयोजन केले[३][४][५]. या कामगार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर या होत्या.
श्रमकल्याण युग मासिक:
श्रमकल्याण युग या १९७९ मध्ये सुरू झालेल्या आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मुखपत्र असलेल्या त्रैमासिकाचे मे २०२१ [६]मध्ये मासिकात रुपांतर करून या मासिकाचे पहिले संपादक म्हणून जबाबदारी रविराज इळवे हे सांभाळत आहेत. आता हे मासिक केवळ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मुखपत्र न राहता महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण कामगार विभागाचे मुखपत्र म्हणून समोर येत आहे.
हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, मुंबई येथील क्रीडा सुविधा :
महाकल्याण क्रीडा प्रबोधिनी : कामगार व कामगार कुटुंबीयांसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या प्रकल्पांमध्ये व कामगार कल्याण भवनांमध्ये मैदानी, गृहांतर्गत तसेच बैठ्या खेळांच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. तथापि या सुविधा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक सहभागासाठी आवश्यक असलेल्या दर्जाच्या व सोबतच दर्जेदार प्रशिक्षण सोयींनी युक्त नाहीत. हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनात यासाठी महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीची १ जुलै २०२१ रोजी प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करून खेळ सुविधा व प्रशिक्षण या दोन्हींचा दर्जा उंचावण्यासाठी रविराज इळवे यांनी प्रयत्न सुरू केले. प्रथम या भवनातील टेबल टेनिस सुविधा अद्ययावत करून तेथे दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून दिले. या भवनात उपलब्ध असलेल्या क्रीडा सुविधांचा दर्जा उंचावला जसे की बॅडमिंटन हॉल अधिक सोयींनी युक्त केला व काही अधिकच्या क्रीडा सुविधा निर्माण केल्या. सध्या या भवनात खालील दर्जेदार क्रीडा सुविधा दर्जेदार प्रशिक्षणासह उपलब्ध आहेत.[७][८]
रायफल शूटिंग रेंज ( नेमबाजी ) : मुंबईतील एक सर्वात मोठी व अद्ययावत अशी १० मीटर एअर रायफल/ पिस्टल शूटिंग रेंज रविराज इळवे यांच्या संकल्पनेतून व मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २०२३ मध्ये उभारण्यात आली आहे. ही रेंज ऑलिंपिक दर्जाची असून या खेळाची सर्व आधुनिक साधनसामग्री येथे उपलब्ध आहे.
आर्चरी रेंज ( धनुर्विद्या ) : धनुर्विद्या या खेळासाठी आवश्यक असलेल्या सुविधांच्या अभावी मुंबईतून हा खेळप्रकार हद्दपार झाला होता परंतु तत्कालीन मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री राजीव निवतकर यांच्या संकल्पनेतून आणि रविराज इळवे यांच्या पुढाकाराने या कामगार क्रीडा भवनात २०२३ मध्ये ऑलिंपिक दर्जाची ७० मीटर आर्चरी रेंज उभी राहिली आहे. सध्या मुंबईतील ही एकमेव ऑलिंपिक दर्जाची आर्चरी रेंज आहे.
जिमनॅस्टिक : या क्रीडा भवनात सन २०२२ मध्ये रविराज इळवे यांच्या प्रयत्नातून प्रायोगिक तत्त्वावर आर्टीस्टीक जिमनॅस्टिक सुरू करण्यात आले असून या खेळाला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
टेबल टेनिस : मंडळाच्या पूर्वीच्या टेबल टेनिस अकॅडमीच्या जागेत रविराज इळवे यांच्या प्रयत्नातून व मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मुंबईतील एक अतिशय अद्ययावत टेबल टेनिस अकॅडमी २०२४ मध्ये विकसित करण्यात आली आहे.
बॅडमिंटन : या भवनातील जुन्या बॅडमिंटन हॉलची २०२४ मध्ये पूर्ण दुरुस्ती करून त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच रविराज इळवे यांच्या संकल्पनेतून या भवनातील खुल्या नाट्यगृहाच्या स्टेजवर आणखी एक पर्यायी बॅडमिंटन कोर्ट विकसित करण्यात आले आहे.
जलतरण : या क्रीडा भवनातील तरण तलाव मुंबईतील एक सर्वात जुना व सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेला तलाव म्हणून ओळखला जात असे. परंतु करोना काळातील निर्बंधांमुळे मार्च २०२० पासून तो बंद करण्यात आला व तो प्रदीर्घ काळ बंद राहील्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती निघाली होती. मंडळाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ही दुरुस्ती जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून व्हावी म्हणून रविराज इळवे यांनी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर यांच्या कडे पाठपुरावा केला व त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन २०२४ मध्ये या तरण तलावाचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. ऑलिंपिक आकाराचा व संपूर्ण छत असलेला (इनडोअर) मुंबईतील एकमेव तरण तलाव आहे.
किक बाॅक्सिंग : या क्रीडा भवनातील या क्रीडा प्रकारास देखील चांगला प्रतिसाद मिळत असून या खेळासाठी चांगली
व्यायामशाळा :
अभ्यासिका : या भवनातील जुन्या अभ्यासिकेची बैठक क्षमता केवळ ६०/७० होती तसेच उपलब्ध बैठक व्यवस्था अतिशय जिर्ण झाली होती. अशा स्थितीत देखील या अभ्यासिकेच्या सभासदत्वासाठी प्रतिक्षा करावी लागत असे. जिर्ण अवस्थेतील या अभ्यासिकेचे रविराज इळवे यांच्या प्रयत्नातून २०२२ मध्ये श्री रवि गुलगुले, सनदी लेखापाल (सी.ए.), मुंबई यांच्या सौजन्याने आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्यात आले असून आता येथील आसन क्षमता १४४ एवढी म्हणजे दुपटीने वाढली आहे. यामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या वातावरणात अभ्यास करण्याची सुविधा निर्माण झाली आहे. रविराज इळवे यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही अभ्यासिका मुंबईतील एक अद्ययावत आणि अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेली अभ्यासिका म्हणून नावारूपाला आली आहे.[९]
कामगार कला दालन :
साखर कारखाना कामगारांसाठी शासन नियुक्त त्रिपक्षीय समिती (२०१९-२०२४) : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची वेतनवाढ व इतर सेवा शर्ती ठरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १२ नोव्हेंबर २०२० रोजी नेमलेल्या त्रिपक्षीय समितीच्या[१०] [११]सदस्य सचिव पदावर रविराज इळवे यांची नेमणूक करण्यात आली होती. या समितीचे कामकाज जलदगतीने पुर्ण करून त्रिपक्षीय करार घडवून आणण्यासाठी व त्याचा शासन निर्णय शिघ्रतेने निर्गमित व्हावा यासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. या त्रिपक्षीय कराराचा लाभ महाराष्ट्रातील दोन लाख पेक्षा अधिक साखर कामगारांना झाला.
कोविड १९ जागतिक महामारी :
माथाडी मंडळाच्या प्रशासकीय कामकाजामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी उप समिती : महाराष्ट्रात १९६९ च्या माथाडी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माथाडी मंडळांच्या कामकाजात सुधारणा सुचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. २९ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे रविराज इळवे यांच्या अध्यक्षतेखाली एक उप समिती नेमली होती[१२][१३]. या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. सदर अहवाल शासनाने स्विकारला असून तो कामगार विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
किमान वेतन सल्लागार मंडळ :
राज्य बालकामगार कक्ष :
संदर्भ
[संपादन]- ^ "Labour department website".
- ^ "महाराष्ट्रातील कामगार कल्याण प्रशासनाची ८५ वर्षे". Loksatta. 2023-11-22. 2024-10-27 रोजी पाहिले.
- ^ DGIPR, Team (2023-02-08). "राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे २४ व २५ फेब्रुवारी रोजी मिरज येथे आयोजन – कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे - महासंवाद" (इंग्रजी भाषेत). 2024-10-24 रोजी पाहिले.
- ^ "सांगली : मिरजेत शुक्रवारपासून दोन दिवसीय कामगार साहित्य संमेलन | two day workers literature conference from Friday in Miraj". Loksatta. 2023-02-22. 2024-10-24 रोजी पाहिले.
- ^ DGIPR, Team (2023-02-25). "प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभे करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे - महासंवाद" (इंग्रजी भाषेत). 2024-10-24 रोजी पाहिले.
- ^ "कामगार कल्याण मंडळाच्या श्रमकल्याणयुग मासिकामध्ये कामगार यॊजना, शासन निर्णय माहिती - नोंदणी करण्याचे आवाहन". 2024-10-25 रोजी पाहिले.
- ^ Developer, Web. "Mumbai: Kamgar bhavan gets (ar)cheery". Mid-day. 2024-10-27 रोजी पाहिले.
- ^ DGIPR, Team (2023-01-24). "कामगार मंडळाकडील क्रीडा सुविधांचा कामगार खेळाडूंनी लाभ घ्यावा – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे - महासंवाद" (इंग्रजी भाषेत). 2024-10-27 रोजी पाहिले.
- ^ CD (2023-12-17). "कामगार क्रीडा भवन कात टाकतयं:". Marathi News Esakal. 2024-10-27 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra Government GR" (PDF).
- ^ "साखर कारखाना कामगारांसाठी त्रिपक्षीय समिती". Maharashtra Times. 2024-10-25 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra Government GR search" (PDF).
- ^ "Mahakamgar official website" (PDF).