महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हे महाराष्ट्र शासनाचे आधिपत्याखाली असलेले मंडळ आहे.

या मंडळाची स्थापना १ जुलै १९५३ रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी कामगार कल्याण मंडळ काम करते. अधिनियमाच्या कलम ६ ब ब नुसार कामगार, मालक, शासन अशी त्रिपक्षीय वर्गणी (MLWF – महाराष्ट्र लेबर वेल्फेअर फंड) दर ६ महिन्यातून (जून व डिसेंबर) मंडळाला मिळते. या निधीतून कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ महाराष्ट्र राज्यातील विनिर्दिष्टीत आस्थापनांना लागू आहे. यात द फॅक्टरी ॲंक्ट १९४८ अंतर्गत येणारे सर्व कारखाने, महाराष्ट्र शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ॲंक्ट १९४८ अंतर्गत येणारी अशी दुकाने व आस्थापना ज्यामध्ये किमान ५ कामगार आहेत आणि द मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ॲंक्ट १९६१ अंतर्गत नोंदित आस्थापनांचा समावेश होतो.

शैक्षणिक योजना[संपादन]

  • सर्वसाधारण शिष्यवृत्ती – इ.१० वी पासून पुढील पदवी, पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी (तांत्रिक/वैद्यकीय/अभियांत्रिकी इ.) रु.२०००/- ते रु.५०००/- पर्यंतची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. मागील वर्षी किमान ६० टक्के गुण आवश्यक. तसेच MPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण कामगार पाल्यांना रु.५,०००/- व UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण कामगार पाल्यांना रु.८,०००/- दिले जाते. Ph.D. अभ्यासक्रमासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना रु.५०००/- अर्थसहाय्य एकदाच दिले जाते.
  • परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती – परदेशात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यास रु.५०,०००/- वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून २ वर्ष शैक्षणिक खंड ग्राह्य असेल.
  • क्रीडा शिष्यवृत्ती – कामगार / कामगार कुटुंबियांनी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.
:*स्पर्धेचे स्वरूप  प्रथम         द्वितीय      तृतीय
:*राज्यस्तरीय रु.५०००/-    रु.३०००/-     रु.२०००/- 
:*राष्ट्रीय       रु.७०००/-    रु.५०००/-     रु.३०००/-
:*आंतरराष्ट्रीय   रु.१५०००/-   रु.१५०००/-    रु.१५०००/-
  • पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य – इयत्ता १० वी पासून पुढील शिक्षणासाठी कामगार पाल्यांना क्रमिक पाठ्यपुस्तक खरेदी रकमेच्या ५० टक्के रक्कम अर्थसहाय्य दिले जाते.
  • MS-CIT अर्थसहाय्य – MS-CIT परीक्षेत ६० टक्के पेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाल्यास शासनमान्य शुल्काच्या ५० टक्के रक्कम कामगार / कामगार पाल्यांना दिली जाते.
  • गुणवंत विद्यार्थी गौरव – इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत सर्वाधिक सहा (किमान ९० टक्क्यांपेक्षा अधिक) गुण प्राप्त करणाऱ्या कामगार पाल्यांस रु.,५०००/- देण्याची योजना आहे. प्रत्येक गट कार्यालय स्तरावर इयत्ता दहावीचे ३ व इयत्ता बारावीचे ३ अशा एकूण ६ गुणवंतांचा गौरव केला जातो.
  • अपंग कामगार पाल्यांना विशेष सवलत – मंडळाच्या आर्थिक लाभाच्या सर्व योजनांमध्ये शासन धोरणानुसार ३ टक्के प्राधान्य दिले जाते. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी टक्केवारीची अट शिथिल केली आहे. पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना व MS-CIT अर्थसहाय्य योजनेत १०० टक्के अर्थसहाय्य दिले जाते.
  • इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण – किमान इ.१० वी पास असलेल्या कामगार व कामगार पाल्यांना इंग्रजी, फ्रेंच, जॅपनीज आदी रोजगाराभिमुख भाषांचे संबाषण व लेखनाचे ज्ञान व्हावे, त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रशिक्षण कालावधी ३ ते ६ महिने आहे. नाममात्र रु.१००/- प्रतिमाह शुल्क आकारले जाते.
  • वाहन चालक प्रशिक्षण – चार चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दिले जाते. वयोमर्यादा किमान १८ ते कमाल ४० वर्ष आहे. किमान ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कामगाराचे वार्षिक उत्पन्न रु. ५ लाखापेक्षा जास्त नसावे.
  • साहित्य प्रकाशन अनुदान– कामगार लेखकाने स्वःलिखित साहित्य (कथा, कादंबरी, नाटक, काव्यसंग्रह आदी) प्रकाशित केल्यास रु.१०,०००/- पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.  

वैद्यकीय अर्थसहाय्य योजना -[संपादन]

  • गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य – कामगार / कामगार कुटुंबियांना कर्करोग, हृदयरोग, एड्स, क्षयरोग आदी दुर्धर आजाराच्या औषधोपचारासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते.
क्र. झालेला खर्च मिळणारे अर्थसहाय्य
रु.१०,०००/- ते रु.२५,०००/- रु.५,०००/- 
रु.२५,००१/- ते रु.५०,०००/-  रु.१०,०००/-
रु.५०,००१/- ते रु.७५,०००/- रु.१५,०००/-
रु.७५,००१ ते रु.१ लाख  रु.२०,०००/-
रु.१ लाखापेक्षा अधिक  रु.२५,०००/-
  • अपघाताने विकलांग झाल्यास
  • अर्थसहाय्य – आस्थापनेत जाताना अछवा येताना अपघात होऊन विकलांग झालेल्या व काम करण्यास असमर्थ ठरलेल्या कामगारास रु.१०,०००/- अर्थसहाय्य देण्याची योजना आहे.
  • आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबियास अर्थसहाय्य – उद्योग / आस्थापना बंद पडून आर्थिक दुरावस्थेमुळे आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना रु.१,००,०००/- अर्थसहाय्य देण्याची योजना आहे.

पुरस्कार[संपादन]

  • गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार – सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या कामगारास सदर पुरस्कार दैऊन गौरविले जाते. कामगाराची एक किंवा विविध आस्थापनांत मिळून एकूण सेवा किमान ५ वर्ष असावी. रु.२५ हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सन २०२१-२२ पासून या पुरस्काराचे नाव बदलून ते विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार असे करण्यात आले आहे.
  • कामगार भूषण पुरस्कार – गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याच्या १० वर्षानंतर सदर पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात भरीव कामगिरी अपेक्षित आहे. रु.५० हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • राव बहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार – किमान २५ वर्षे कामगारांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, संघटना यांना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी अर्ज करायला लावणे उचित नसल्याने समाजातील मान्यवर, उद्योग संस्था, संघटना यांच्याकडून विहित नमून्यात माहिती मागवली जाते. प्राप्त माहितीच्या आधारे गुणवत्तेच्या आधारे व्यक्ती / संस्था यांची निवड केली जाते. व्यक्तीचे वय ५० वर्षापेक्षा कमी नसावे. संस्थेची नोंदणी किमान २५ वर्षापुर्वी झालेली असावी. रु.७५हजार, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  

कार्यक्रम[संपादन]

कामगार नाट्य स्पर्धा

महिला / बाल नाट्य स्पर्धा

लोकनृत्य स्पर्धा / भजन स्पर्धा

समगीत / स्फुर्तीगीत स्पर्धा

कामगार साहित्य संमेलन

कबड्डी स्पर्धा

कामगार केसरी / कुमार केसरी कुस्ती स्पर्धा

कामगार श्री – शरीर सौष्ठव स्पर्धा

कामगार नाट्यकर्मींचा सत्कार

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याचा सत्कार

शालांत परीक्षा मार्गदर्शन / कारकीर्द गाईडन्स

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

रोजगार मेळावा

स्वयंरोजगार / पुरक उद्योग / बचतगट प्रशिक्षण शिबिर

क्रीडा प्रशिक्षण शिबिर

नाट्य प्रशिक्षण शिबिर

दूर पल्याच्या सहली

उपक्रम[संपादन]

शिशुमंदिर

पाळणाघर

शिवणवर्ग (सरकारमान्य / मंडळाचा)

हस्तकला वर्ग

फॅशन डिझायनिंग वर्ग

ग्रंथपालन प्रमाणपत्र शिक्षण अभ्यासक्रम

संगणक प्रशिक्षण वर्ग

वाचनालय

ग्रंथालय

अभ्यासिका

व्यायामशाळा

कराटे प्रशिक्षण

योगावर्ग

धनुर्विद्या (आर्चरी)

टेबल टेनिस कोर्ट

बॅडमिंटन कोर्ट

जलतरण तलाव

कराटे प्रशिक्षण वर्ग

संगीत वर्ग

नृत्य वर्ग

चित्रकला वर्ग

ब्युटीपार्लर वर्ग

(स्थानिक कामगारांची मागणी, जागेची व तज्ज्ञांची उपलब्धता यानुसार विविध उपक्रम केंद्र स्तरावर राबविले जातात.)

संपर्क[संपादन]

मध्यवर्ती कार्यालय[संपादन]

हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई ४०० ०१३

दूरध्वनी ०२२ – ४३२२६८१७, ४३२२६८१२, ४३२२६८५०, कामगार क्रीडा भवन - प्रकल्प - ०२२- ४३२२६८२० / २१ 

विभागीय कार्यालय व त्याअंतर्गत येणारी गट कार्यालये[संपादन]

  • विभागीय कार्यालय, मुंबई - ललित कला भवन, गोविंदजी केणी मार्ग, अपना बाजारच्या मागे, नायगाव, मुंबई – ४०००१४ दूरध्वनी – ०२२ – २४१२१३२५
  1. गट कार्यालय, नायगाव - ललित कला भवन, गोविंदजी केणी मार्ग, अपना बाजारच्या मागे, नायगाव, मुंबई – ४०००१४ दूरध्वनी – ०२२ – २४१६८७९२
  2. गट कार्यालय, वरळी - कामगार कल्याण भवन, जांबोरी मैदान, वरळी, मुंबई – ४०००१८   दूरध्वनी – ०२२ – २४९८२८७१
  3. गट कार्यालय, अंधेरी - कामगार कल्याण भवन, गुंदवली गावठाण, आझाद रोड, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००६९ दूरध्वनी – ०२२ – २६८३१४०१
  • विभागीय कार्यालय, ठाणे - कामगार कल्याण भवन, कन्नमवार नगर क्र.२, विक्रोळी पूर्व, मुंबई – ४०००८३  दूरध्वनी – ०२२ – २५७७६७५१
  1. गट कार्यालय, ठाणे - कामगार कल्याण भवन, कन्नमवार नगर क्र.२, विक्रोळी पूर्व, मुंबई – ४०००८३ दूरध्वनी – ०२२ - २५७७१६६३
  2. गट कार्यालय, चिपळूण - साई सेंटर, वनश्री हॉटेलजवळ, चिपळूण, जि.रत्‍नागिरी – ४१५६०५ दूरध्वनी – ०२३५५ – २५०६११
  • विभागीय कार्यालय, नाशिक - कामगार कल्याण भवन, ५१७, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड कॉलनी, सातपूर रोड, नाशिक – ४२२००७ दूरध्वनी - ०२५३ – २३५११६०  
  1. गट कार्यालय, नाशिक - ललित कला भवन, शिवाजी चौक, शॉपिंग सेंटरजवळ, जुने सिडको, नाशिक – ४२२००९ दूरध्वनी - ०२५३ – २३७४९१४
  2. गट कार्यालय, जळगाव - ललित कला भवन, शाहू नगर, रिंग रोड, जळगाव – ४२५००१ दूरध्वनी – ०२५७ – २२२९६३६
  • विभागीय कार्यालय, पुणे - ललित कला भवन, सहकार नगर क्र.१, अरण्येश्वर मंदिराजवळ, पुणे – ४११००९ दूरध्वनी – ०२० - २४२२८९८८
  1. गट कार्यालय, पुणे - ललित कला भवन, सहकार नगर क्र.१, अरण्येश्वर मंदिराजवळ, पुणे – ४११००९ दूरध्वनी - ०२० – २४२१९७०६
  2. गट कार्यालय, कोल्हापूर - कामगार कल्याण केंद्र, बिंदू चौक, रविवार पेठ, कोल्हापूर – ४१६००६ दूरध्वनी – ०२३१- २६४४७७२
  3. गट कार्यालय, सोलापूर - ललित कला भवन, रविवार पेठ, सोलापूर – ४१३००२ दूरध्वनी – ९५२१७ – २७२६७३७
  • विभागीय कार्यालय, औरंगाबाद – ललित कला भवन, उस्मानपुरा, औरंगाबाद - ४३१००५ दूरध्वनी – ०२४० – २३३१५४६
  1. गट कार्यालय, औरंगाबाद- ललित कला भवन, गुरू गोविंदसिंगपुरा, नवीन उस्मानपुरा, औरंगाबाद – ४३१००१ दूरध्वनी – ०२४० – २३५८९६६ 
  2. गट कार्यालय, नांदेड - कामगार कल्याण केंद्र, शिवाजी चौक, सिडको, नांदेड – ४३१६०३ दूरध्वनी – ०२४६२ – २२८७२४
  3. गट कार्यालय, लातूर - कामगार कल्याण भवन, कोयना रोड, लेबर कॉलनी, लातूर – ४१३५१२ दूरध्वनी – ०२३८२ - २५१३२१
  • विभागीय कार्यालय, नागपूर – कामगार कल्याण भवन, राजे रघुजी नगर, नागपूर – ४४०००१ दूरध्वनी – ०७१२ – २७४९६४७
  1. गट कार्यालय, चंदन नगर (नागपूर १)- ललित कला भवन, हौसिंग बोर्ड कॉलनी, चंदन नगर, नागपूर – ४४०००९ दूरध्वनी – ०७१२ - २०५२०८७
  2. गट कार्यालय, चिटणीस नगर (नागपूर २) - ललित कला भवन, चिटणीस नगर, पंचवटी मागे, उमरेड रोड, नागपूर- ४४००१० दूरध्वनी – ०७१२ – २७४९००४  
  3. गट कार्यालय, चंद्रपूर - कामगार कल्याण भवन, बंगाली कॅम्प, चंद्रपूर – ४४२४०१ दूरध्वनी – ०७१७२ – २७०५९३
  • विभागीय कार्यालय, अकोला - ललित कला भवन, कस्तुरबा हॉस्पिटलजवळ, भीमनगर, अकोला – ४४४००१ दूरध्वनी – ०७२४ – २४३३२७५
  1. गट कार्यालय, अकोला - ललित कला भवन, डाबकी रोड, भीमनगर, अकोला – ४४४००१ दूरध्वनी – ०७२४ - २४२०२८२
  2. गट कार्यालय, अमरावती - ललित कला भवन, छाबडा प्लॉट, अमरावती – ४४४६०५ दूरध्वनी – ०७२१ – २५६९५५२