Jump to content

रत्‍नापूर (मानवत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?रत्नापूर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मानवत
जिल्हा परभणी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच चक्रधर राजे
बोलीभाषा मराठी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 431505
• एमएच/22

रत्नापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

[संपादन]

रत्नापुर येथील लोकजीवन साधारण आहे ह्या गावात अनेक जातीचे लोक एकत्र राहतात सर्व सण उत्सव साजरे करतात. तसे ह्या गावात मराठा व माळी समाज बहुसंख्य असुन येथे धनगर, मांग, बौद्ध, धोबी, मुस्लिम हे समाज पण आहेत. रत्नापुर येथील ७०% लोक हे शेती करतात तर २९% लोक मजुरी करतात. ह्या गावात दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिराव फुले जयंती, श्री कृष्ण जन्माष्टमी, पोळा, नवरात्री, दीपावली, असे सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने व जल्लोषात साजरे केले जातात.

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

रत्नापुर ह्या गावात श्री कृष्ण मंदिर असुन येथे महानुभाव आश्रम आहे, हनुमान मंदिर, दुर्गा देवी मंदिर, खंडोबा मंदिर व परवगिरी मंदिर अशी देवस्थान आहेत. रत्नापुर ह्या गावात कृषी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देखिल आहे, दोन इंग्लिश स्कूल असुन जिल्हा परिषद शाळा आहे.

नागरी सुविधा

[संपादन]

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ ह्या गावातुन गेला असल्याने येथील दळणवळण यंत्रणा सुलभ आहे. ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा इत्यादी.

जवळपासची गावे

[संपादन]

रत्नापुर शेजारची गावे मानवत, उक्कलगाव, पोहेटाकळी, पाथरी, देवनांद्रा ही गावे आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate