मो यान
Chinese novelist and screenwriter | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | 管 |
---|---|
जन्म तारीख | फेब्रुवारी १७, इ.स. १९५५ गाओमी |
टोपणनाव |
|
नागरिकत्व | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय | |
राजकीय पक्षाचा सभासद | |
पद |
|
पूर्वजांचे घर |
|
मातृभाषा | |
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
गुआन मोये (जन्म १७ फेब्रुवारी १९५५), जे मो यान या टोपण नावाने ओळखले जातात हे एक चीनी कादंबरीकार आणि लघु कथा लेखक आहे. अमेरिकी नियतकालिक टाइम चे डोनाल्ड मॉरिसन यांनी त्यांचा उल्लेख "सर्व चिनी लेखकांपैकी एक सर्वात प्रसिद्ध, अनेकदा प्रतिबंध घातलेला आणि मोठ्या प्रमाणावर वाड्:मयचौर्यने प्रभावित" लेखक आहे असा केला आहे.[१][२] त्यांची तुलना फ्रांत्स काफ्का किंवा जोसेफ हेलर सोबत केली जाते. २०१२ मध्ये, मो यांना लेखक म्हणून त्यांच्या कार्यासाठी साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.[३][४][५]
ते पाश्चात्य वाचकांना त्यांच्या १९८६ मधील रेड सॉर्घम या कादंबरीसाठी ओळखले जातात. [६] यान यांना इटलीमध्ये २००५चा आंतरराष्ट्रीय नॉनिनो प्राईज मिळाले आहे. २००९ मध्ये, ते चीनी साहित्यासाठी ओक्लाहोमा विद्यापीठाच्या न्यूमन पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते.[७]
"मो यान" हे त्याचे उपनाम आहे ज्याचा चिनी भाषेत "बोलू नका" असा अर्थ होतो. यान यांनी प्रसंगी स्पष्ट केले आहे की हे नाव त्यांच्या आई-वडिलांच्या चेतावणीतून आले आहे जेव्हा १९५० च्या दशकात चीनच्या क्रांतिकारी राजकीय परिस्थितीमुळे, बाहेर असताना आपले मत कोणी बोलू नये. हे मो यानच्या लेखनाच्या विषयाशी देखील संबंधित आहे, जे चीनी राजकीय आणि लैंगिक इतिहासाचा पुनर्व्याख्या करतात. एका मुलाखतीत मो यान यांनी सांगितले की त्यांनी त्यांचे "अधिकृत नाव" बदलून मो यान केले कारण त्यांना या नावाखाली रॉयल्टी रक्कम मिळू शकली नाही.[८]
लेखन कार्य
[संपादन]मो यान यांनी चिनी भाषेत डझनभर लघुकथा आणि कादंबऱ्या प्रकाशित केल्या व आपल्या कारकिर्दीची लेखक म्हणून सुरुवात केली. सप्टेंबर १९८१ मध्ये प्रकाशित "फॉलिंग रेन ऑन अ स्प्रिंग नाईट" ही त्यांची पहिली प्रकाशित लघुकथा होती.[९]
रेड सॉर्घम ही कादंबरी १९८६ मध्ये विविध नियतकालिकांमध्ये पाच भागात प्रकाशित झाली होती. १९८७ मध्ये ही एक संपुर्ण कादंबरी म्हणून प्रकाशित झाली होती. ह्याचे पाच भाग होते: "रेड सॉर्घम", "सॉर्घम वाइन", "डॉग वेज्", "सॉर्घम फ्युनरल" आणि "स्ट्रेंज डेथ". ह्याच्या पहिल्या दोन भागांवर आधारित चिनी चित्रपटा रेड सॉर्घमला (१९८८) गोल्डन बेअर पुरस्कार मिळाला आहे. [६]
त्यांची दुसरी कादंबरी, द गार्लिक बॅलाड्स ही एका सत्य कथेवर आधारित आहे जेव्हा गाओमी टाउनशिपमधील शेतकऱ्यांनी पीक खरेदी न करणाऱ्या सरकारविरोधात दंगल केली. त्यांची पुढिल कादंबरी रिपब्लिक ऑफ वाईन हे मद्यपानावर एक व्यंग आहे. अत्यंत विपुल, मो यान यांनी केवळ ४२ दिवसांत लाइफ अँड डेथ आर वेअरिंग मी आउट लिहिले. ही एका जमीनदाराच्या कथेबद्दलचे उपहासात्मक कथा आहे.[१०][११][१२]
मो यानच्या लेखनाचे भाषांतर हॉवर्ड गोल्डब्लॅट यांनी इंग्रजीत केले आहे. गोल्डब्टलॉटने प्रेक्षकांपर्यंत चीनी संस्कृती प्रभावीपणे प्रसारित केली आहे.[१३][१४][१५][१६]
मो यानची कामे प्रामुख्याने सामाजिक भाष्य आहेत आणि लू क्सुनच्या सामाजिक वास्तववादाचा आणि गॅब्रिएल गार्सिया मार्केझच्या जादुई वास्तववादाचा त्यांच्यावर जोरदार प्रभाव आहे.[१७][१८][१९][२०]
पुरस्कार
[संपादन]- २००५: आंतरराष्ट्रीय नॉनिनो पुरस्कार
- २००५: डॉक्टर ऑफ लेटर्स, ओपन युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग
- २०११: माओ डून साहित्य पुरस्कार विजेता
- २०१२: साहित्यातील नोबेल पारितोषिक[२१][२२]
संदर्भ
[संपादन]- ^ "The brutal genius of Mo Yan: A sneak peek into his upcoming novel POW!". FirstPost. 12 October 2012 रोजी पाहिले.
- ^ Morrison, Donald (14 February 2005). "Holding Up Half The Sky". Time. 11 March 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 February 2005 रोजी पाहिले.
- ^ W. W. Norton, The Old Gun, 1985. Mo Yan: The Norton Anthology, 2018. pp. 1101-1110.आयएसबीएन 9780393602869.
- ^ Williford, James (Jan–Feb 2011). "Mo Yan 101". Humanities. 32 (1): 10.
- ^ "World Literature and China in a Global Age". Chinese Literature Today. 1 (1): 101–103. July 2010.
- ^ a b Inge, M. Thomas (1990). "Mo Yan and William Faulkner: Influences and Confluences". Faulkner Journal. 6 (1): 15–24. ISSN 0884-2949. JSTOR 24907667.
- ^ Ding, Rongrong; Wang, Lixun (2017-05-04). "Mo Yan's style in using colour expressions and Goldblatt's translation strategies: a corpus-based study". Asia Pacific Translation and Intercultural Studies. 4 (2): 117–131. doi:10.1080/23306343.2017.1331389. ISSN 2330-6343.
- ^ SW12X - ChinaX (18 February 2015). "ChinaX: Introducing Mo Yan". रोजी मूळ पानापासून संग्रहित2022-10-28. 7 November 2018 रोजी पाहिले – YouTube द्वारे.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "The Nobel Prize in Literature 2012". NobelPrize.org (इंग्रजी भाषेत). 2022-05-10 रोजी पाहिले.
- ^ Ahlander, Johan (11 October 2012). "China's Mo Yan wins Nobel for "hallucinatory realism"". Reuters. 2017-08-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 October 2012 रोजी पाहिले.
- ^ Chan, Shelley W. (Summer 2000). "From Fatherland to Motherland: On Mo Yan's 'Red Sorghum' and 'Big Breasts and Full Hips'". World Literature Today. 74 (3): 495–501. doi:10.2307/40155815. JSTOR 40155815.
- ^ "About the Author: Mo Yan". University of Chicago Press Books. 12 October 2012 रोजी पाहिले.
- ^ Yan, Mo; Yao, Benbiao (July 2010). "A Writer Has a Nationality, but Literature Has No Boundary". Chinese Literature Today. 1 (1): 22–24. doi:10.1080/21514399.2010.11833905. S2CID 194781082.
- ^ Cohorst, Kate (11 October 2012). "Professor From Notre Dame Translates Nobel Winner's Novels". University of Notre Dame. 11 October 2012 रोजी पाहिले.
- ^ Howard Yuen Fung Choy, Remapping the Past: Fictions of History in Deng's China, 1979 -1997. Leiden: BRILL, 2008. pp. 51–53. आयएसबीएन 9004167048.
- ^ Wee, Sui-Lee (11 October 2012). "China's Mo Yan feeds off suffering to win Nobel literature prize". Reuters. 11 October 2012 रोजी पाहिले.
- ^ Goldblatt, Howard (2013-09-01). "Mo Yan in Translation: One Voice among Many". Chinese Literature Today. 3 (1–2): 6–9. doi:10.1080/21514399.2013.11833989. ISSN 2151-4399.
- ^ Huang, Alexander (Jul–Aug 2009). "Mo Yan as Humorist". World Literature Today. 83 (4): 32–35. doi:10.1353/wlt.2009.0315. S2CID 161013759.
- ^ Inge, M. Thomas (June 2000). "Mo Yan Through Western Eyes". World Literature Today. 74 (3): 501–507. doi:10.2307/40155816. JSTOR 40155816.
- ^ Leach, Jim (Jan–Feb 2011). "The Real Mo Yan". Humanities. 32 (1): 11–13.
- ^ "Mo Yan får Nobelpriset i litteratur 2012". DN. 11 October 2012. 2013-02-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "The Nobel Prize in Literature 2012 Mo Yan". Nobelprize.org. 11 October 2012. 11 October 2012 रोजी पाहिले.