इंटरनेट चाचेगिरी
भांडवली नफा कमवण्याच्या हेतूने एखादी मूळ ध्वनिफित, चित्रपट, नाटक अथवा अन्य कलाकृतींच्या बेकायदेशीर पुनरावृत्ती/पुनर्निर्मिती करणे व त्या कलाकृतीवर कायदेशीर अधिकार गाजवणाऱ्या मालकाची/ निर्मात्याची परवानगी न घेणे ह्यास चाचेगिरी असे म्हणतात. इंटरनेट हे या चाचेगिरीचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे इंटरनेटद्वारे होणाऱ्या चोरीस इंटरनेट चाचेगिरी असे म्हणतात. अश्या कृतीमुळे अनेक प्रताधिकारांचे उल्लंघन होते व त्यास गुन्हा मानतात. तंत्रज्ञानातील नवनवीन शोध व प्रगती बरोबरच चाचेगिरीचे प्रमाणही वाढत आहे. विविध जुनी/नवीन गाणी, चित्रपट तसेच संगणक प्रणाली हे इंटरनेट चाचेगिरीचे महत्त्वाचे घटक आहेत. चाचेगिरीबद्दल माहिती मिळवण्यासाठी सर्वप्रथम प्रताधिकार म्हणजेच प्रताधिकारांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
२००६ सालच्या एका लेखानुसार भारतात संगीत चाचेगिरीचे प्रमाण ५६% होते तर चीनमध्ये ते ८५% होते. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फोनोग्राफिक इंडस्ट्रीच्या अहवालानुसार त्याचवर्षी पॅराग्वे, चीन, इंडोनेशिया, युक्रेन, रशिया, मेक्सिको व पाकिस्तान हे देश संगीत चाचेगिरीत भारतापेक्षा अग्रेसर होते. ह्या चाचेगिरीमुळे भारतीय संगीत क्षेत्राला तसेच भारतीय सरकारला दर वर्षी सुमारे ४५० कोटी रूपयांचे नुकसान होते.
इंटरनेट चाचेगिरीचे मार्ग
[संपादन]- एखादी संगणक प्रणालीची प्रत एकापेक्षा अधिक संगणकांवर वापरणे
- व्यावसायिक वापराकरीता तयार केलेली संगणक प्रणाली घरगुती संगणकावर वापरणे
- कायदेशीरदृष्ट्या विकत घेतलेल्या संगणक प्रणालींच्या बेकायदा प्रती बनवणे व विकणे
- इंटरनेटवरून विविध गाणी MP3 स्वरूपात 'डाऊनलोड' करणे
- एखाद्या कलाकाराच्या मैफिलीची ध्वनिफित तयार करून ती विकणे
हेही पाहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- लीगलसर्व्हिस इंडिया.कॉम - इंटरनेट चाचेगिरी (इंग्लिश मजकूर)
- एच.जी. ऑर्ग - इंटरनेट चाचेगिरी (इंग्लिश मजकूर)
- एच.जी. ऑर्ग - इंटरनेट चाचेगिरी (इंग्लिश मजकूर)