मोहित चौहान
Jump to navigation
Jump to search
मोहित चौहान | |
---|---|
![]() मोहित चौहान | |
आयुष्य | |
जन्म स्थान | नहान, हिमाचल प्रदेश |
संगीत साधना | |
गायन प्रकार | इंडियन पॉप, बॉलिवूड |
संगीत कारकीर्द | |
कारकिर्दीचा काळ | १९९८ - चालू |
मोहित चौहान हा एक भारतीय गायक आहे. इंडियन पॉप संगीतामधील सिल्क रूट ह्या बॅंडद्वारे आपल्या संगीत कारकिर्दीची सुरूवात करणारा मोहित सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहे. त्याला आजवर २०१० व २०१२ सालचे सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
२००६ मधील रंग दे बसंतीमध्ये गाणे म्हटल्यानंतर २००७ सालच्या जब वी मेट ह्या चित्रपटामध्ये प्रीतमने मोहित चौहानला पार्श्वगायनाची संधी दिली ज्यामुळे त्याला लोकप्रियता लाभली. तेव्हापासून त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये गाणी म्हटली आहेत.
पुरस्कार[संपादन]
फिल्मफेअर पुरस्कर[संपादन]
- २०१० - सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - दिल्ली 6 मधील मसकली
- २०१२ - सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - रॉकस्टार मधील जो भी मैं
बाह्य दुवे[संपादन]
- वैयक्तिक संकेतस्थळ
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील मोहित चौहानचे पान (इंग्लिश मजकूर)