Jump to content

मुकणे राजघराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जव्हार संस्थानची स्थापना करणारे जयदेवराव (जयबाजीराजे) हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. इ.स. १४व्या शतकात जयबाजीराजे मुकणे यांनी प्रथम या संस्थानाची स्थापना केली. आणि जवळपास ६०० वर्षे मुकणे राजघराण्याची या संस्थानावर सत्ता होती. त्यानंतर १९४७ मध्ये यशवंतराव मुकणे यांनी जव्हार संस्थान भारतात विलीन केले.

इतिहास

[संपादन]

मुकणे राजघराण्याचे प्रथम शासक जयबाजीराव मुकणे यांनी डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर बांधले. [][]

जायबाजीरावच्या मुलाने म्हणजे, नेमशाह मुकणे यांनी तब्बल २२ किल्ले जिंकून साम्राज्यविस्तार केला. यामुळे ५ जून १३४३ रोजी दिल्लीचा तत्कालीन सुल्तान मुहम्मद बिन तुघलक ने महाराज नेमशाह यांना शाह ही उपाधि देऊन सम्मानित केले आणि प्रथमच स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला.[] त्यानंतर नेमशाहचा नातू महाराजा देवबारराव मुकणे यांनी बहामनी सल्तनतचे सुल्तान अहमदशहा (अल्लाउद्दीन) बहमानी विदारच्या किल्ल्यावर युद्ध केले. युद्ध कळताच ते बहामनी सल्तनतच्या राजकुमारीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न करून जव्हारला परत आले.[]

मुकणे राजघराण्यातील शासनकर्ते

[संपादन]

जव्हार संस्थान वर राज्य केलेल्या मुकणे राजघराण्यातील महाराजांची यादी पुढीलप्रमाणे आहे[][]

1)श्रीमंत जयबाजीराव मुकणे(इ.स.1316-1337)

2)श्रीमंत धुळाबाराव उर्फ नेमशाह मुकणे(इ.स.1337-1388)

3)श्रीमंत भीमराव उर्फ भीमशहा मुकणे(इ.स.1388-1429)

4)श्रीमंत देवबाराव उर्फ महंमदशहा मुकणे(इ.स.1429-1492)

5)श्रीमंत कृष्णाराव मुकणे प्रथम(इ.स.1492-1560)

6)श्रीमंत नेमशाह मुकणे द्वितीय(इ.स.1560-1630)

7)श्रीमंत विक्रमशाह मुकणे प्रथम(इ.स.1630-1678)

8)श्रीमंत पतंगशाह मुकणे प्रथम(इ.स.1678-1694)

9)श्रीमंत कृष्णशहा मुकणे द्वितीय(इ.स.1694-1710)

10)श्रीमंत विक्रमशहा मुकणे द्वितीय(इ.स.1710-1742)

11)श्रीमंत कृष्णशहा मुकणे तृतीय(इ.स.1742-1758)

12)श्रीमंत गंगाधरराव उर्फ पतंगशहा द्वितीय(इ.स.1758-1798)

13)श्रीमंत मालोजीराव उर्फ विक्रमशहा तृतीय(इ.स.1798-1821)

14)श्रीमंत हनुमंतराव उर्फ पतंगशाह तृतीय(इ.स.1821-1865)

15)श्रीमंत नारायणराव उर्फ माधवराव उर्फ विक्रमशहा चतुर्थ(इ.स.1865-1865)

16)श्रीमंत मल्हारराव उर्फ पतंगशहा चतुर्थ(इ.स.1865-1905)

17)श्रीमंत गणपतराव उर्फ कृष्णशहा चतुर्थ(इ.स.1905-1917)

18)श्रीमंत मार्तंडराव उर्फ विक्रमशहा पंचम(इ.स.1918-1927)

19)श्रीमंत यशवंतराव मार्तंडराव मुकणे उर्फ पतंगशहा सहावे (इ.स.1927-1978)

20)श्रीमंत दिग्विजयसिंहराजे मुकणे (इ.स.1978-1992)

21)श्रीमंत महेंद्रसिंहराजे मुकणे (इ.स1992)

चित्रदालन

[संपादन]
महाराजा मार्तंडराव मुकणे
महाराजा मार्तंडराव मुकणे
महाराजा यशवंतराव मुकणे(उजवीकडे), दिग्विजयसिंहराव मुकणे (डावीकडे) आणि राजकुमार महेंद्रसिंहराव मुकणे
लहानपणीचे महाराजा यशवंतराव मुकणे


महाराजा यशवंतराव मुकणे तरुणपणी
महाराजा यशवंतराव मुकणे वृद्धावस्था
जव्हार संस्थान (मुकणे राजघराणे)ची मुद्रा



यशवंतराव मुकणे
राजा गणपतराव मल्हारराव मुकणे

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "महालक्ष्मी के इस मंदिर में चढ़ती है पहली फसल रहस्य जानकर चौंक जाएंगे आप - mobile". punjabkesari. 2018-12-21. 2021-02-21 रोजी पाहिले.
  2. ^ Tribhuwan, Robin D. (2003). Fairs and Festivals of Indian Tribes (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 978-81-7141-640-0.
  3. ^ a b "Imperial Gazetteer2 of India, Volume 14, page 87 -- Imperial Gazetteer of India -- Digital South Asia Library". dsal.uchicago.edu. 2021-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Indian Princely States before 1947 A-J". www.worldstatesmen.org. १५ जुलै २०१५ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "Indian states before 1947 A-J". rulers.org. १५ जुलै २०१५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.