विशेषणे टाळण्याच्या भूमीकेचा एक महत्वाचा भाग जाणता/अजाणता झालेल्या कॉपी पेस्टींग मजकुरातून कॉपीराईट भंग होत असेल तर विशेषणे टाळण्याने अनवधानाने होणारे कॉपीराइट भंग टळण्यास बऱ्या पैकी मदत होऊ शकते. बाकी भूमीका या पुर्वी विकिपीडिया:नवीन_सदस्यांकडून_होणार्या_सर्वसाधारण_संपादन_त्रुटी येथे आणि विकिपीडिया:मर्यादा येथे मांडलेली आहेच.
सावधान: विशेषणे टाळा ! आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही. अधिक माहिती दाखवा
विश्वकोशीय लेखनात अलंकृत तसेच रंजनात्मक लेखन आणि विशेषणांचा वापर टाळावा लागतो. उदाहरणार्थ "खरोखरीच","प्रसिद्ध", "अतिसुन्दर", "रमणीय", "अगदी", "सर्वोत्तम", "अत्युच्च", "महान", "लोकहृदयसम्राट", "थोर", "परमपूज्य" अशा स्वरूपाची आणि इतर विशेषणे टाळणे अभिप्रेत असते.आपण आपल्या लेखनातून अलंकृत लेखन,अतीरंजन आणि विशेषणांचा वापर टाळून पुर्नलेखन करण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती आहे.
छापून येणे या अर्थाने (प्रसिद्ध करणे एवजी) प्रकाशित करणे वापरण्या बद्दल विचार करा.
लेखांच्या शीर्षक लेखनात सुद्धा व्यक्तिपर विशेषणे सुद्धा टाळावयाची आहेत. अधिक माहिती करिता पहा विकिपीडिया शीर्षक लेखन संकेत
कदाचित आपल्या स्वत:कडून विशेषण अथवा अलंकृत लेखन न होताही या लेखात,आपल्या आधीच्या लेखकांच्या लेखनातून अलंकृत लेखन अथवा विशेषणे लिहिले गेल्याने हि सूचना दिसणे संभवते. स्वत:च्या लेखनातून विशेषणे टाळणे बऱ्याचदा बऱ्याच जणांचा लेखन शैली अथवा सवयीचा भाग असल्यामुळे अवघड जाते.त्यामुळे या लेखात अथवा इतर लेखात आलेले अलंकृत लेखन आणि विशेषणे वगळून मराठी विकिपीडिया ज्ञानकोशास सहकार्य करावे हि नम्र विनंती. वगळण्याजोग्या आणि वारंवार आढळणाऱ्या विशेषणांचा अंतर्भाव टाळावयाच्या यादीत येण्याकरिता या सूचना संदेशा बद्दल चर्चा येथे आपल्या सूचना मांडाव्यात.
विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. मराठी विकिपीडिया हि काही सर्वसाधारण वेबसाईट नाही, विकिपीडिया एक एनसायक्लोपिडीया विश्वकोश/ज्ञानकोश आहे. तो शक्यतोवर संदर्भ देऊनच बनवला जातो आणि नंतर विकिपीडियाच संदर्भ म्हणून वापरला जातो. त्यासाठी माहिती निव्वळ वस्तुनिष्ठ (फॅक्ट) असावी लागते. अलंकृत भाषा आणि विशेषणांच्या वापराने बऱ्याचदा वाचक, तो लेख किंवा विकिपीडिया एखाद्या व्यक्तीचे किंवा गटाचे समर्थन करतो(soft corner), असे समजू शकतो आणि लेखाची विश्वासार्हता कमी होण्याचा धोका असतो. विश्वासार्हता धोक्यात येण्याने फायद्याऐवजी नुकसानच अधिक होण्याची शक्यता बळावते. प्रत्येक वाचक स्वतःचे मत स्वतः बनवण्यास समर्थ असतो. अधिकात अधिक विश्वासार्ह माहिती वाचकास पुरविल्यास त्यामुळे त्यांचा विश्वास वाढतो.
स्वत:बद्दल/स्वत:चे हितसंबंध जपणारे लेखन, स्वत:ची अथवा इतर कुणाची जाहीरात करण्याच्या उद्देशाचे लेखन टाळावे.हि बाब तुमच्या आत्मियता असलेल्या विषयासंदर्भाच्या निष्पक्ष वस्तुनिष्ठ लेखनाच्या आड येत नाही याची नोंद घ्यावी.
आपण करू इच्छित असलेला लेखातील बदल जतन करण्यापूर्वी, बदलांची झलक पाहून घेऊन ते योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असे सूचित केले जात आहे.
विश्वकोश संकल्पना
ज्ञानकोशांत साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरुद्ध मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली, वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे दिलेली माहिती मिळ्ते.
इथे वाचकांना भाषेचे सौंदर्य अपेक्षित नसते, तर निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो.
सारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते..
विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो.
ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसर्या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभ्यासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .
ही सूचना आपल्यापर्यंत स्वयंचलित लेखन/संपादन सुयोग्यता छाननी आणि नियंत्रणप्रणालीतून येत आहे. मराठी विकिपीडियावर अद्याप ही प्रणाली प्रायोगिक तत्वावर वापरली जात असून हि प्रणाली स्वयंचलित असल्यामुळे काही वेळा चुकीचे संदेश देऊ शकते किंवा कसे हे कळण्यास आपल्या मदतीची आवश्यकता आहे. खासकरून विकिपीडिया:धूळपाटी आणि विकिपीडिया:मदतकेंद्र या पानावर लिहीताना हा संदेश दिसल्यास आणि तसे दिसणे अयोग्य असल्यास तेथे ते आवर्जून नमूद करावे.
हा संदेश आपल्या पर्यंत का आला आहे हे न समजल्यास अथवा चूकीने आला आहे असे वाटल्यास, हा संदेश कोणत्या प्रकारचे संपादन करताना दाखवला गेला याची नोंद विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन येथे आवर्जून करावी.आपण अशी मदत करण्यामुळे भविष्यात इतर सदस्यांना खासकरून नवागत आणि अनामीक सदस्यांना संपादने करताना त्रास होणार नाही याची काळजी घेणे सोपे होईल.या संदेशात उचीत बदल मिडियाविकी चर्चा:विशेषणे टाळा अथवा येथे सुचवावेत अथवा .
सूचना: आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन मराठी विकिपीडियावरील लेखन/संपादन संकेतास अनुसरून नसावी अथवा अयोग्य असावी अथवा साशंकीत म्हणून नोंदवली जात आहे.
आपले संपादन जतन(सेव्ह) करण्यापूर्वी आपण करू इच्छित असलेली कृती/लेखन/संपादन रचनात्मक आहे याची खात्री करून घ्यावी.अरचनात्मक संपादने तात्काळ उलटवली जाण्याची शक्यता असते.
खालील गोष्टी टाळा:
रोमन लिपीचा अनावश्यक वापर टाळा मराठीत लिहा.मराठीत सहज लिहिण्याकरता मराठी विकिपीडियावर सुविधा उपलब्ध आहे त्याचा वापर करा.
कोशांचे लेखन करताना आणि खासकरून विकिपीडिया:लेखनभाषा संकेतांनुसार अंलंकृत भाषा आणि विशेषणे टाळणे अभिप्रेत असते.मी स्वतः या संकेतांचा ठाम पुरस्करता असुनसुद्धा प्रत्यक्षात विकिकरण करताना किंवा मार्गदर्शन करताना प्रत्यक्षात खूप अडचणी येतात विशेषणे टाळणे बरेच अवघड जाते. उदाहरणार्थ en:Quebec City लेखाचे मराठी भाषांतर क्वेबेक सिटी पाहिले, भाषांतरकार विकिपीडिया संपादकांकडून आपसूकपणे विशेषणांचा वापर झाला आहे जसे खरोखरीच, प्रसिध्द्,अतिसुन्दर, रमणीय, अगदी . पण टाळावयाचे म्हटले तरी कसे ? आणि टाळले तर भाषा कृत्रीम आणि कदाचित तोच तो पणा येणारी रटाळ होईल का असे वाटते.अलंकृत भाषा आणि विशेषणे हि मराठी भाषेची अगदीच न टाळता येणारी वैशिष्ट्ये आहेत काय ? आपण (म्हणजे मराठी विकिपीडियाने) विशेषणांचा वापर आणि अलंकृत भाषा स्विकार्ह ठरवावी काय ? तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास आवडेल .
याबाबत सहसा एक संकेत पाळता येईल - बहुसंख्य लोकांना मान्य होतील, अशी गुणवाचक विशेषणे 'माफक प्रमाणात वापरायला हरकत नाही. उदा.: रमणीय, प्रेक्षणीय, प्रसिद्ध इत्यादी. तर-तमभाववाचक विशेषणे पुराव्याशिवाय वापरणे टाळावे. म्हणजे, प्रमाण पुरावांनुसार अमुक एखादे शहर/देश लोकसंख्या/घनता वगैरे पैलूमध्ये सर्वोच्च स्थानी असेल, तरच 'सर्वोत्तम/सर्वाधिक/सर्वोच्च/उच्चतम' वगैरे तर-तमभाववाचक शब्दयोजना करावी; अन्यथा मोघम गुणवाचक विशेषणे वापरावीत उदा.: 'चांगले/अधिक/उच्च'.
व्यक्तिपर लेखांमध्ये आलंकृत भाषा व गैरवाजवी विशेषणे कटाक्षाने टाळावीत. वर नोंदवलेले मुद्दे तेथेही वापरता येतील.
संकल्पच्या मताशी सहमत. मला वाटते की सर्वोत्तम, अत्युच्च, महान, इ. विशेषणांचा (मुबलक) उपयोग केल्यानेच भाषेत कृत्रिमपणा येईल. मग जसे गल्लोगल्ली थोर, परमपूज्य, लोकहृदयसम्राट नेते जसे उत्पन्न झाले आहेत, तसेच वाटायला लागेल... :-) जनरल जॉर्ज आर्मस्ट्राँग कस्टर याला अत्युत्तम/महान सेनापती म्हणता येईल पण नेपोलियन बोनापार्ट, पहिले बाजीराव, प्रतापराव गुजर, इतकेच काय जुलियस सीझरसमोर त्याचा पराक्रम फिकाच पडतो. असे असले तरी अमेरिकेत कस्टरला महानच म्हणले जाते.
विशेषणे लिहिताना एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की मराठी विकिपीडिया विश्वकोष आहे तरी लावलेली विशेषणे वैश्विकदृष्ट्या valid असावी.
शिवाय अशी विशेषणे वापरताना व्यक्तिगत दृष्टिकोन/bias नक्कीच येईल, जो विकिपीडिया/विश्वकोषात मुळीच उपयोगाचा नाही. पुण्यातील ५०% (तरी) लोकांना पर्वती अतिसुंदर रमणीय स्थळ वाटते. महाबळेश्वरच्या माणसाला तेथे फक्त झोपडपट्टी आणि घाण वास आढळतात. तरी अशी विशेषणे वापरताना ती वादातीत असतील तरच वापरावी - उदा. पर्वती ऐतिहासिकदृष्ट्या अतिमहत्त्वाचे स्थळ आहे. याला महाबळेश्वरच काय, कोलकात्याच्या माणूसही आक्षेप घेऊ शकत नाही.
सदस्य श्री मनोज यांनी सुचवल्यावरून "विशेषणे टाळा" हि सूचना किती वेळा दिसावी याची मर्यादा घालण्याचा प्रस्ताव आहे.उपलब्ध मार्गांपैकी एक मार्ग rate limit चा आहे.
Trigger actions only if the user trips a rate limit
"कदाचित आपल्या स्वत:कडून विशेषण अथवा अलंकृत लेखन न होताही या लेखात,आपल्या आधीच्या लेखकांच्या लेखनातून अलंकृत लेखन अथवा विशेषणे लिहिले गेल्याने हि सूचना दिसणे संभवते; स्वत:च्या लेखनातून विशेषणे टाळणे बऱ्याचदा बऱ्याच जणांचा लेखन शैली अथवा सवयीचा भाग असल्यामुळे अवघड जाते.त्यामुळे या लेखात अथवा इतर लेखात आलेले अलंकृत लेखन आणि विशेषणे वगळून मराठी विकिपीडिया ज्ञानकोशास सहकार्य करावे ." अशी एक भूमीका हि संपादन गाळणी बनवताना होती . कदाचित सदस्य या भूमीकेशी अनुकूल नसावेत त्यामुळे या भूमीकेस यश येत नाही शिवाय हि सूचना विनाकारण अधिक वेळा दिसते असा अभास होतो आहे त्या दृष्टीने केवळ स्वत:च्याच आणि नव्या संपादनातील विशेषणांनाच सूचना दिली जावी असा बदल करूयात.
चर्चा पानांवर "विशेषणे टाळा" सुचनेची गरज आहे का ? असा एक प्रश्न श्री मनोज यांनी उपस्थीत केला आहे . चर्चा पानांवर "विशेषणे टाळाचे" दोन उपयोग आहेत .
१) पहिला उपयोग नवीन सदस्य बऱ्याचदा त्यांचे लेखन चर्चा पानावरील चर्चे पासूनच चालू करतात , तर मुख्य लेखामध्ये लेखन करण्यापुर्विच "विशेषणे टाळा" सूचनेमुळे सजगता अभियानास सहाय्य होते .
२) चर्चा पानांवरील वाद विवादात बऱ्याचदा असभ्य अथवा असांसदीय अथवा असभ्य नसलेल्या परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या भावना दुखावण्याच्या हेतुने अशीष्ट विशेषणांचा वापर चर्चा पानावर केला जातो. स्वत: स्पष्ट म्हणवू इच्छिणाऱ्या व्यक्तीस आपल्या अशिष्ट विशेषणामुळे वाद चिघळतील अथवा नव्या वादांना उत येण्यास आपले मागचे अशीष्ट विशेषण कारणीभूत होते याची कल्पना नसते. मनोजनी आणि इतरही सदस्यांनी वेळोवेली 'हास्यास्पद' असा शब्द प्रयोग केला , चावडी तांत्रीक वर एका मान्यवर सदस्यांनी 'बाष्कळ' हे विशेषण वापरले हि आणि अशी इतर बरीचशी विशेषणे बंदी घालण्या जोगी नसतील तरी सावधान करण्याची गरज असलेली निश्चीत असू शकतात. म्हणून चर्चा पानांनाही "विशेषणे टाळा"ची गरज आहे असे माझे प्रांजळ मत आहे.
याचा अर्थ श्री मनोजजींच्या तक्रारीची दखलच घ्यावयाची नाही असे नाही.लेखपानावरील विशेषणे टाळा मधून चर्चा पानावरील विशेषणे टाळा काढून टाकावे.चर्चापान विषयक उपरोक्त दोन्ही कारणा करिता दोन वेगवेगळे नव्या संपादन गाळण्या लावाव्यात चर्चा पानांकरिताच्या पहिल्या नव्या गाळणीत केवळ नवागत आणि अनामीक सदस्यांना लागू करावी आणि दुसरि नवी गाळणी सर्व सदस्यांना लावावी मात्र त्यात केवळ अशीष्ट विशेषणेच ठेवावीत .