माफीचा साक्षीदार (चित्रपट)
माफीचा साक्षीदार | |
---|---|
दिग्दर्शन | राज दत्त |
निर्मिती | हिरालाल शाह |
कथा | जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारित |
प्रमुख कलाकार |
• नाना पाटेकर, • मोहन गोखले, • अविनाश खर्शीकर • आणि उषा नाईक |
संगीत | विश्वनाथ मोरे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९८६ |
अवधी | १३२ मिनिटे |
माफीचा साक्षीदार हा एक १९८६ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून याचे निर्माता हिरालाल शाह असून दिग्दर्शक राज दत्त होते. या चित्रपटात नाना पाटेकर, मोहन गोखले, अविनाश खर्शीकर आणि उषा नाईक यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट पुण्यातील जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारित होता.[१]
कथानक
[संपादन]१९७६-७७ मध्ये पुण्यात कुख्यात जोशी-अभ्यंकर हत्याकांड झाले होते. चार 'व्यावसायिक कला' विद्यार्थ्यांनी हे हत्याकांड घडवून आणले होते. दहा खुनांसाठी दोषी ठरवल्यानंतर या चार जणांना फाशी देण्यात आली होती.[२] दरम्यान यातील एक आरोपी मुनावर शाह याने जेल मध्ये असताना १९८३ मध्येच 'येस, आय एम गिल्टी' हे आत्मचरित्र लिहिले होते.[३] नंतर या घटनेवर अनुराग कश्यपने 'पाच' नावाचा हिंदी चित्रपट बनवला होता, जो चित्रपट गृहात प्रदर्शित झाला नाही.[४][५]
पात्र
[संपादन]- नाना पाटेकर - राघवेंद्र "राघवा"च्या भूमिकेत
- मोहन गोखले - सुनील "सुन्या"च्या भूमिकेत
- बिपिन वर्ती - राकेश "रॉकी"च्या भूमिकेत
- किशोर जाधव - मनोहरच्या भूमिकेत
- अविनाश खर्शीकर - विलास मोडकच्या भूमिकेत
- उषा नाईक - गीता, सुनीलची मैत्रीण म्हणून
- जयराम कुलकर्णी - महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या भूमिकेत
- अरुण सरनाईक - सरकारी वकिलाच्या भूमिकेत
- कमलाकर सारंग - बचाव पक्षाच्या वकीलाच्याच्या भूमिकेत
- दत्ता भट - न्यायाधीशाच्या भूमिकेत
- रवी पटवर्धन - पोलीस निरीक्षक जाधव।च्या भूमिकेत
- आशालता वाबगावकर - सुनीलच्या आईच्या भूमिकेत
- सुमती गुप्ते - राघवेंद्रच्या आईच्या भूमिकेत
- बिंदू - रेस्टॉरंट/बारमध्ये डान्सरच्या भूमिकेत (पाहुणी कलाकार)
- पद्मा खन्ना - "शमा ने जब आग" गाण्यात (पाहुणी कलाकार)
- इर्शाद हाश्मी - पोलीस आयुक्ताच्या भूमिकेत
- वसंत शिंदे - पोलीस हवालदारच्या भूमिकेत
संगीत
[संपादन]विश्वनाथ मोरे यांनी या चित्रपटास संगीत दिले आहे.[६]
- "जीवन में आयी नशा"
- "रंगले नवे नवे स्वप्न"[६]
संदर्भ
[संपादन]- ^ "Mohan Gokhale is dead". Rediff. 29 April 1999. 21 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "The Joshi-Abhyankar Serial Murders that Shook Pune in 1976-77". 4 May 2018.[permanent dead link]
- ^ मूनव्वर शाह. "येस, आय एम गिल्टी". बुक गंगा. १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
- ^ Paanch
- ^ "Reality Check". Telegraph India. 18 June 2008. 2020-01-14 रोजी पाहिले.
- ^ a b "Maficha Sakshidar". 2022-03-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-01 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील माफीचा साक्षीदार (चित्रपट) चे पान (इंग्लिश मजकूर)