आशालता वाबगांवकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आशालता वाबगावकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
आशालता वाबगांवकर
जन्म आशालता वाबगांवकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

आशालता वाबगांवकर ह्या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपटअभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे ३१मे रोजी झाला. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही मुंबईत झाले. आशालता वाबगावकर ह्या मानसशास्त्रात एम.ए. आहेत. त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट 'अपने पराये'(हिंदी). या चित्रपटातील कामाबद्दल आशालतांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले. पहिले नाटक :रायगडाला जेव्हा जाग येते.

त्यांच्या भूमिका असलेली नाटके[संपादन]

 • आश्चर्य नंबर १० (१९७१)
 • गरुड झेप (१९७३)
 • गुड बाय डॉक्टर (१९७६)
 • गुंतता हृदय हे (१९७४)
 • गोष्ट जन्मांतरीची (१९७८)
 • छिन्न (१९७९)
 • देखणी बायको दुसऱ्याची (१९९२)
 • मत्स्यगंधा (१९६४)
 • रायगडाला जेव्हा जाग येते (१९६२)
 • विदूषक (१९७३)

चित्रपट[संपादन]

 • आत्मविश्वास (१९८९)
 • तिन्ही सांजा(२००९)
 • पकडापकडी (२०११)
 • मणी मंगळसूत्र (२०१०)
 • लेक लाडकी (२०१०)
 • वन रूम किचन (२०११)

त्यांनी गायलेली नाट्यगीते (कंसात नाटकाचे नाव)[संपादन]

 • अर्थशून्य भासे मज हा कलह प्रीतीचा (मत्स्यगंधा)
 • गर्द सभोतीं रानपाखरे, तू तर चाफेकळी (मत्स्यगंधा)
 • जन्म दिला मज त्यांनी (मत्स्यगंधा)
 • तव भास अंतरा झाला (मत्स्यगंधा)
 • स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या (विदूषक)

हे सुद्धा पहा : आशालता वाबगावकर यांची अविस्मरणीय गाणी