माक्स म्युलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माक्स म्युलर

फ्रीडरीश माक्स म्युलर (६ डिसेंबर, इ.स. १८२३ - २८ ऑक्टोबर, इ.स. १९००) हे जर्मन तत्त्वज्ञ व भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक होते. भारतीय संस्कृति व वेदांचे महात्म्य पाश्चिमात्य जगाला उलगडुन दिले. हिंदू धर्माची आणि संस्कृतीची प्रभावी ओळख करून देणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञ प्रा. मॅक्समुलर यांचा जन्म ६ डिसेंबर १८२३ साली झाला तर मृत्यु २८ ऑक्टोबर १९०० साली झाला. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील ’हितोपदेश’ या नीतीकथांचा अनुवाद केला. हा अनुवाद करतानाच ते या भाषेच्याही विलक्षण प्रेमात पडले. लाईप्झिग येथून पदवी मिळाल्यानंतर ते पॅरिसला गेले. तेथेच त्यांनी आपल्या संस्कृत भाषेच्या आयुष्यभराच्या प्रसारचे ध्येय निश्चित केले. हिंदूंचा पुरातन धर्म ग्रंथ ॠग्वेदाचे संपादन करून तो प्रसिद्ध करणे हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले. पॅरिसमध्ये उपलब्ध असलेली ॠग्वेदाची हस्तलिखिते अभ्यासत असताना लंडनमधील ईस्ट इंडिया कंपनीच्या ग्रंथालयात असलेल्या हस्तलिखितांची त्यांना वेळोवेळी गरज भासू लागली. म्हणून १८४८ ला ते ऑक्सफर्ड येथे आले आणि जन्मभर तेथेच राहिले. १८४९ साली त्यांनी ऋग्वेदाचा पहिला खंड प्रकाशित केला. तर १८७४ साली सहावा खंड पूर्ण करून हे महान कार्य सिध्दिस नेले. याशिवाय ’इंडिया : व्हॉट इट कॅन टीच अस’, ’द सॅक्रेड बुक्स ऑफ ईस्ट (५० खंड)’ अशा अनेक पुस्तकांचे लेखन आणि संपादनही केले. संस्कृत भाषा ही कितीही पुरातन असली तरी तिची रचना व व्याकरण विलोभनीय आहे. ग्रीक भाषेपेक्षाही ती अधिक भक्कम आणि लॅटिन पेक्षा अधिक प्रवाही आहे, असे ते म्हणत असत. १८९७ साली टिळकांना १८ महिन्यांची सक्तमजूरीची शिक्षा झाली होती; पण त्यांच्या प्रयत्नांमुळे १२ महिन्यात त्यांची सुटका होऊ शकली. मॅक्समुलर यांनी म्हतले आहे, ’सर्व पृथ्वीवर निसर्गाने आपली सारी संपत्ती, शक्ती आणि सौंदर्य यांची उधळण ज्या प्रांतावर केली आहेअसा कोणता देश असेल तर तो भारत! जीवनाच्या गहन समस्यांचा विचार करून त्यावर उपाय शोधून काढले आहेतसे कुठे आढळेल तर ते भारतातच! मानवाचं आंतरिक जीवन अधिक परिपूर्ण, अधिक समग्र, अधिक विश्वव्यापी होत असेल ते केवळ भारतीय वेदांमुळे