Jump to content

महेश मांजरेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महेश वामन मांजरेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
महेश मांजरेकर
जन्म १६ ऑगस्ट, १९५८ (1958-08-16) (वय: ६६)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८४ - चालू
प्रमुख टीव्ही कार्यक्रम बिग बॉस मराठी
पत्नी मेधा मांजरेकर
अपत्ये सई मांजरेकर

महेश मांजरेकर (ऑगस्ट १६, इ.स. १९५८ - ) हे एक आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार व निर्माते आहेत. प्रामुख्याने हिंदीमराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले वास्तवअस्तित्त्व हे हिंदी चित्रपट लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या अभिनय जीवनाची सुरुवात १९८४ साली अफलातून ह्या मराठी नाटकामधून केली. त्यांना आजवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व दोन स्क्रीन पुरस्कार मिळाले आहेत. दिग्दर्शनाशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनयही केला आहे त्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या चित्रपटांचाही समावेश आहे. 'कांटे'या चित्रपटामुळे त्यांना अभिनयात यश मिळण्यास सुरुवात झाली. तेलुगू चित्रपट ओक्काडुन्नडु (२००७)आणि स्लमडॉग मिलिनिअर (२००८) या चित्रपटात जावेद असे नकारात्मक भुमिकाही त्यांनी केल्या. त्यांनी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ह्या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली.त्यांची सचिन खेडेकर,आणि विद्याधर उर्फ बाप्पा जोशींबरोबर जोडी प्रसिद्ध आहे.

कारकीर्द

[संपादन]

अभिनय

[संपादन]
वर्ष चित्रपट भाषा
1999 वास्तव हिंदी
2001 एहसास हिंदी
2003 कांटे हिंदी
2003 प्राण जाये पर शानना जाये हिंदी
2004 प्लॅन हिंदी
2004 रन हिंदी
2004 मुसाफिर हिंदी
2005 इट वॉज रेनिंग दॅट नाईट इंग्लिश/बंगाली
2006 जिंदा हिंदी
2006 जवानी दिवानी हिंदी
2007 दस कहानियां हिंदी
2007 ओक्काडुन्नाडू तेलुगू
2007 पद्मश्री लालू प्रसाद यादव हिंदी
2008 मीराबाई नॉट आऊट हिंदी
2008 स्लमडॉग मिलियोनेर हिंदी/इंग्लिश
2008 होमम तेलुगू
2009 मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मराठी
2009 वॉन्टेड हिंदी
2009 ९९ हिंदी
2009 फ्रुट अँड नट हिंदी
2009 तीन पत्ती हिंदी
2010 अधुर्स तेलुगू
2010 दबंग हिंदी
2010 डॉन सीनू तेलुगू
2011 रेडी हिंदी
2011 फक्त लढ म्हणा मराठी
2011 बॉडीगार्ड हिंदी
2012 तुक्का फिट हिंदी
2012 ओ.एम.जी. – ओ माय गॉड! हिंदी
2012 जय जय महाराष्ट्र माझा मराठी
2013 हिम्मतवाला हिंदी
2013 शूटआऊट ॲट वडाळा हिंदी
2013 आरंबम तमिळ
2013 रज्जो हिंदी
2013 आजचा दिवस माझा मराठी
2014 जय हो हिंदी
2014 रेगे मराठी
2014 सिंघम रिटर्न्स हिंदी
2014 अर्धांगिनी बंगाली

दिग्दर्शक

[संपादन]

निर्माता

[संपादन]
  • प्राण जाये पर शानना जाये (2003)
  • इट वॉज रेनिंग दॅट नाईट (2005)

बाह्य दुवे

[संपादन]