महाराणा प्रताप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेवाडनरेश महाराणा प्रताप सिंह
महाराणा
RajaRaviVarma MaharanaPratap.jpg
राजा रवी वर्मा यांनी काढलेले महाराणा प्रताप यांचे चित्र
Mewar.svg
मेवाडचा ध्वज
Insignia of Mewar, inside the City Palace, Udaipur.jpg
मेवाडची राजमुद्रा
अधिकारकाळ इ.स.१५७२-इ.स.१५९७
राज्याभिषेक १ मार्च इ.स.१५७२
राज्यव्याप्ती मेवाड विभाग, राजस्थान
राजधानी उदयपुर
पूर्ण नाव महाराणा प्रतापसिंह उदयसिंह
जन्म ९ में इ.स.१५४०
कुम्भलगड किल्ला,राजस्थान
मृत्यू १९ जानेवारी इ.स.१५९७
पूर्वाधिकारी महाराणा उदयसिंह
उत्तराधिकारी महाराणा अमरसिंह
वडील महाराणा उदयसिंह
आई महाराणी जयवंताबाई
पत्नी महाराणी अजबदेहबाई (एकूण ११ पत्नी)
राजघराणे सिसोदिया


महाराणा प्रताप सिंह हे मेवाड राज्याचे शासक होते.

कुळ[संपादन]

महाराणा प्रताप हे हिंदू राजपूत होते. ते सिसोदिया कुळातील राजपूत होते.

जन्म[संपादन]

महाराणा प्रतापसिंह यांचे वडील महाराणा उदयसिंह हे होते. आणि आईचे नाव महाराणी जयवंताबाई असे होते. महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म ९ मे इ.स.१५४० या दिवशी कुम्भलगड येथे झाला.

राज्याभिषेक[संपादन]

इ.स. १५६८ मध्ये, उदय सिंह दुसरे यांच्या चित्तोड राज्यावर मुघल सम्राट अकबर चाल करुन आला. या हल्ल्यात राजे उदय सिंह आणि मेवाडचे राज घराणे किल्ल्यावर ताबा मिळवण्या आधी निसटले. उदय सिंह यांनी १५५९ मध्ये उदयपूर शहराची स्थापना केली. महाराज उदय सिंह आणि त्यांची सर्वात प्रिय राणी भातियानी यांचा मुलगा जगमल याने त्यांच्या नंतर राज्यकारभार सांभाळावा अशी महराजा उदय् सिंह यांची इच्छा होती, पण राजे उदय सिंह यांच्या म्रुत्यूनंतर त्यंचा जेष्ठ पुत्र प्रताप यांनी परंपरेनुसार राज्य कारभार सांभाळावा अशी सर्व वरिष्ठ मंत्र्यांची इच्छा होती.प्रताप यांच्या राज्याभिषेका आधी जगमल याला मुख्यमंत्री चुंदावट आणि तोमर रामशाह यानी राजवाड्याबाहेर घालवून दिले आणि प्रताप यांस मेवाडचा राजा म्हणुन घोषित केले. प्रताप यांची त्यांच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध राजा होण्याची तयारी नव्हती पण राज्यातील मंत्र्यानी जगमल राज्य करण्यास असमर्थ असल्याचे प्रताप यांस पटवून दिले.