भिल्ल समाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भिल्ल समाजातील एक स्त्री

भिल्ल समाज हा भारतातील एक मुख्य आदिवासी समूह आहे. त्यांना विविध भाषांत भिला किंवा भिल्ल गरासिया असे म्हणतात.

आढळ[संपादन]

तडवी भिल्ल समाज हा महाराष्ट्रामध्ये जालना जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात आढळतो. पारध बुद्रुक, पारध खुर्द, कोसगाव, भोकरदन, अंबड, घनसावंगी,टाका,खालापुरी, धनगर पिंप्री, लिंगेवाडी, वाकडी, वढोद तांगडा, पद्मावती, धावडा, सेलूद, लिहा, पोखरी, जळगाव सपकाळ, हिसोडा, देहेड, खंडाळा, भोरखेडा, दहिगाव याठिकाणी या समाजाची वस्ती आहे. बुलढाणा जिल्ह्याला पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखायचे बुलढाणा तालुक्यात जामठी, दहिद बुद्रुक, दहिद. खुर्द, गिरडा, गोधनखेडा आणि मढ; जळगाव जिल्ह्यातथल जामनेर तालुक्यात खूप जास्त प्रमाणात तडवी भिल्ल या समाजाची वस्ती आहे. महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये भिल्ल जात प्रमुख आहे. येथे गायकवाड, मोरे, बर्डे, राठोड, पवार, गांगुर्डे, सोनावणे, राठोड, पिंपळे, इत्यादी आडनाव असणारे भिल्ल आढळून येतात. त्यांची वस्ती मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थानमहाराष्ट्र या राज्यांतही आहे. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात जे विविध उठाव झाले त्यामध्ये भिल्ल समाजाने केलेला उठाव हा देखील अतिशय मोलाचा मानला जातो १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी वासुदेव बळवंत फडके यांनी प्रस्थापितांविरोधात केलेला उठाव, तसेच अन्य लहान-मोठे उठाव संपूर्णपणे दडपून टाकण्यात इंग्रजी सत्तेला यश मिळाले. मात्र भिल्ल समाजाने स्वसंस्कृतीची जोपासना आणि अधिकाराचे जतन करण्यासाठी लढा उभारला त्याला पूर्णपणे दडपून टाकण्यात इंग्रजांना यश मिळाले नाही. ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील महाराष्ट्रामध्येभिल्लांचा उठाव ही महत्त्वपूर्ण चळवळ राहिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आदिवासी व भिल्लांचे उठाव हे महत्त्वाचे पर्वत ठरलेले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या उठावांना विशेष महत्त्व आहे. या उठावांतील समुदाय यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध जो संघर्ष केला तो संघर्ष आपली संस्कृती आपल्या परंपरा व आर्थिक हित कायम ठेवण्यासाठीचा संघर्ष होता ब्रिटिश सत्तेला हे उठाव सहजासहजी मोडून काढता आले नाहीत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामधील या उठावांचे विशेष महत्त्व आहे. .

महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकलव्य भिल्ल समाज संघटना कार्य करते. महाराष्ट्रातील एकलव्य संघटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहेWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.