मधुलिका अग्रवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. मधुलिका शशिभूषण अग्रवाल या वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम या विषयावर संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आहेत.

पिकांवर होणारा प्रदूषणाचा परिणाम[संपादन]

अग्रवाल यांचे एम.एस्‌सी. पीएच्‌.डीचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून झाले.जड धातूंमुळे शेतीवर आणि अन्नमालिकेवर होणारा परिणाम हाही त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. ओझोन प्रदूषणामुळे गव्हासारख्या धान्यपदार्थाच्या निरनिराळ्या जातींच्या उत्पादनात होणारी घट मापून औद्योगिक क्षेत्राजवळ धान्याच्या कोणत्या जाती लावल्यास नुकसान कमी होईल याचा अंदाज त्यांनी बांधला.

आंतरराष्ट्रीय मान्यता[संपादन]

पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन डॉ. अग्रवाल यांचे अति-नील ‘ब’ किरण आणि वाढीव कार्बन डायॉक्साइड यांचा महत्त्वाच्या धान्यांच्या निरनिराळ्या जातींवर होणारा परिणाम या विषयातील संशोधन महत्त्वाचे ठरले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे.

अमेरिका-इंग्लंडमधील संशोधन[संपादन]

इ.स. १९८८मध्ये फुलब्राइट फेलोशिप मिळाल्यावर अग्रवाल यांनी अमेरिकेतील मेरीलॅंडमधील बेलॅटिव्हल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये संशोधन केले. इंग्लंडमध्ये लॅंकेस्टर येथे रॉयल सोसायटी – इंडियन नॅशनल सायन्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना फेलोशिप मिळाली (१९९४).

डॉ. अग्रवाल यांनी दिल्लीतील पर्यावरण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, काउन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च, आणि यू.के.- स्टॉकहोम एन्व्हायर्नमेंट इन्स्टिट्यूट (यॉर्क)चा इंटरनॅशनल डेव्हलपमेंट विभाग, यू.के. रिसर्च कौन्सिल (नॉर्वे) आदींनी पुरस्कृत केलेल्या प्रकल्पांवर संशोधन केले आहे.

२२० शोधनिबंध, २ पुस्तके (त्यातील एक मेरिकेतील लेव्हिस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध) अग्रवालांच्या नावावर असून, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या एशियन ब्राऊन क्लाऊड या प्रकल्पात त्यांनी भाग घेतला होता.

मधुलिका शशिभूषण अग्रवाल यांनी ३६हून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे.

पुरस्कार[संपादन]

त्यांनी केलेल्या संशोधनामुळे मधुलिका अग्रवाल यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान/पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांपैकी काही हे :-

  • बी.एस्‌सी.मध्ये गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल राष्ट्रीय शिष्यवृत्ती
  • एम.एस्‌सी. परीक्षेत पहिला क्रमांक आल्याबद्दल बनारस विद्यापीठाकडून सुवर्ण पदक
  • UNESCO/ROSTASCA तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार (१९८८)
  • प्रोफेसर हिरालाल चक्रवर्ती यांच्या नावाचा Indian Science Congress Association पुरस्कार (१९९४)
  • National Institute of Ecology (India)ची फेलोशिप (१९९६३).
  • विद्यापीठ अनुदान मंडळाकडून स्वामी प्रणवानंद सरस्वती यांच्या नावाचा पर्यावरण संशोधन पुरस्कार (१९९३)
  • भारतीय वनस्पतीशास्त्र सोसायटीकडून डॉ.शील स्मृती व्याख्यानमालेमध्ये राष्ट्रीय विज्ञान अकादमी पुरस्कार (२०००)
  • बंगलोरच्या राष्ट्रीय कृषीविज्ञान अकादमीची फेलोशिप (२००३)
  • अलाहाबादच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीची फेलोशिप

अधिक माहिती[संपादन]