Jump to content

चर्चा:भ्रष्टाचार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भ्रष्टाचार=भ्रष्ट+आचार. आचार म्हणजे आचरण. त्यामुळे भ्रष्टाचार म्हणजे पदभ्रष्ट होऊ शकत नाही. रस्त्याने चालणारा माणूस रस्ता चुकला तर तो पदभ्रष्ट होतो. एखाद्याला त्याच्या पदावरून किंवा मानाच्या खुर्चीवरून खाली ओढले तरी तो पदभ्रष्ट झाला असे म्हणतात. येथे भ्रष्टाचाराचा काहीही संबंध येत नाही. आचार म्हणजे लोणचे, त्यामुळे बिघडलेल्या वा खराब झालेल्या लोणच्याला विनोदाने भ्रष्टाचार म्हणता येईल.

अनुचर=मागून चालणारा, सहचर= बरोबरीने चालणारा, खेचर=आकाशातून चालणारा=खग=पक्षी, गंधर्व, वायू, सूर्य-चंद्र-ग्रह-चांदणी इत्यादी. त्यामुळे भ्रष्ट मार्गाने चालणारा असा अर्थ हवा असेल तर भ्रष्टचर, भ्रष्टपथचर, असे शब्द बनवावे लागतील भ्रष्टाचाराचा तो अर्थ होऊच शकत नाही. भ्रष्टाचार हे नाम आहे. पदभ्रष्ट हा सामासिक शब्दातला समास तत्पुरुष आहे असे धरले तर पदभ्रष्ट हे विशेषण होईल. नामाचा अर्थ हा कधीही विशेषणाने व्यक्त करता येत नाही. त्यामुळे भ्रष्टाचार म्हणजे मूलत: पदभ्रष्ट असे विधान करणे उचित नाही. उचित आहे असे समजले तर ’मंत्री भ्रष्टाचार करतो” या वाक्याला मंत्री पदभ्रष्ट करतो हे वाक्य समानार्थी होईल.

पदभ्रष्ट या शब्दातला समास बहुव्रीहि आहे असे समजले, तर पदभ्रष्ट हे नाम होईल. पण नाम अशा अर्थाने व्यवहारात ते वापरले जात नाही. आणि नाम ठरलेच तो शब्द भ्रष्टाचार या शब्दाचा प्रतिशब्द नाही. (भ्रष्ट म्हणजे अधार्मिक, अनीतिमान, अशुद्ध, आसनावरून खाली ओढलेला, खराब, गळालेला, बरबटलेला, बाटलेला, विटाळलेला, वगैरे)...J (चर्चा) १५:२१, २६ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

@: आपण चर्चापानावर असलेली माहिती लेखात जोडू शकाल का? --Tiven2240 (चर्चा) ११:३८, ५ जुलै २०२० (IST)[reply]