भोरमदेव मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


भोरमदेव मंदिर
भोरमदेव
भोरमदेव मंदिर
भोरमदेव मंदिर
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
भोरमदेव मंदिर
भारताच्या छत्तीसगढ राज्याच्या नकाशात या मंदिराचे स्थान
नाव
भूगोल
गुणक 22°06′57.6″N 81°08′52.8″E / 22.116000°N 81.148000°E / 22.116000; 81.148000गुणक तळटिपा
देश भारत
राज्य छत्तीसगढ
जिल्हा कबीरधाम जिल्हा
स्थानिक नाव भोरमदेव
संस्कृती
मूळ आराध्यदैवत महादेव
स्थापत्य
स्थापत्यशैली नगरा
मंदिरांची संख्या
इतिहास व प्रशासन
बांधकामाचे वर्ष १०८९ ख्रिस्तनंतर AD
संकेतस्थळ [१]

भोरमदेव हे छत्तीसगड राज्यामधील कवर्धा गावापासून सुमारे १८ कि.मी. दूर असलेले ठिकाण आहे. येथे सुमारे सातव्या अगर आठव्या शतकातील शिवमंदिर आहे. हे मैकाल पर्वतरांगेत येते. हा भाग पूर्णपणे जंगलाने वेढलेला आहे. भोरमदेव हे एक पर्यटनस्थळही आहे.

भोरमदेवाचे हे शिवमंदिर साकरी नदीच्या किनाऱ्यावर एका लहान टेकडीवर वसलेले आहे.नाग घराण्याच्या राजा रामचंद्र याने हे मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते. कोणार्कचे सूर्यमंदिर, तसेच खजुराहोची मंदिरे यातील कलाकृतींशी साधर्म्य सांगणारी येथील शिल्पकला असल्याने यास छत्तीसगडचे खजुराहो असेही संबोधतात.

बांधकाम[संपादन]

या मंदिराच्या गर्भगृहात (तळघरात) निर्माणकाळात स्थापलेले शिवलिंग आहे. हे मंदिर अजूनही सुस्थितीत असून हे हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर आहे. याचे छत शतदल कमलाकृती असून यास अष्टकोनी स्तंभ आहेत. या स्तंभांवर आकर्षक मूर्तीकाम व नक्षीकाम केलेले आहे.येथील बांधकाम पिंगट गुलाबी दगडाचे आहे. या मंदिरात असलेला देव महादेव हा येथील जातींची उपास्यदेवता आहे.

प्रतिमा[संपादन]

गणेश ,विष्णू, शिव , चामुंडा या प्रतिमा, तसेच अष्टभुजा चामुंडा, चतुर्भुजा सरस्वती, लक्ष्मीनारायण व छत्रासह वामनमूर्ती अशा प्रकारच्या मूर्ती येथे आहेत. या मंदिराच्या खालील भागात अनेक मिथुनदृष्ये आहेत. नृत्य गायन वादन करीत असलेल्या पुरुषांच्या व स्त्रियांच्या मूर्ती येथे कोरलेल्या आहेत.अप्सरांच्या मूर्तींत ढोल, सनई , बासरी , वीणा वगैरे वाजविणाऱ्या मूर्तीदेखील आहेत.

सुविधा[संपादन]

भोरमदेव अभयारण्यात ट्रेकिंगची सुविधा आहे. या ठिकाणीच छत्तीसगड पर्यटन मंडळाचे विश्रामगृह व रिसॉर्ट्स देखील उपलब्ध आहेत.[१]


संदर्भ[संपादन]

  1. ^ लेखक - डॉ. उदय राजहंस. दिनांक-११/०९/२०१६ - तरुण भारत - ई पेपर - आसमंत पुरवणी पान क्र. ३ भोरमदेव Check |दुवा= value (सहाय्य). १२-०९-२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]