Jump to content

भारतीय वायुसेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय वायुदल या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय वायुसेना
स्थापना ८ ऑक्टोबर, इ.स. १९३२
देश भारत ध्वज भारत
विभाग पश्चिम, दक्षिण, दक्षिण-पश्चिम, पूर्व, मध्य
आकार १७०,००० जवान.
ब्रीदवाक्य नभःस्पृशं दीप्तम्
रंग संगती    
मुख्यालय नवी दिल्ली
सेनापती एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग
संकेतस्थळ भारतीय वायु सेना

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.[ संदर्भ हवा ]

ध्येयवाक्य

[संपादन]

ध्येयवाक्य

[संपादन]

नभ:स्पृशं दीप्तम्। हे भारतीय वायुसेनेचे ध्येयवाक्य आहे.

हे गीतेतल्या एका श्लोकातून घेतलेले आहे.

नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं
व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।
दृष्ट्वा ही त्वां प्रव्यथितान्तरात्मा
धृतिं न विन्दामि शमंच विष्णो॥

....भगवद्गीता ११.२४

अर्थ :- हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत.

इतिहास

[संपादन]

८ ऑक्टोबर, इ.स. १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. १२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एर फोर्स झाले.[ संदर्भ हवा ]

विमाने

[संपादन]
इंडिया गेट जवळ पहाऱ्यावर उभा असलेला वायुसैनिक

इ.स. १९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. जेट इंजिनांच्या आगमनानंतर त्याची जागा नंतर वेगवान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी केली गेली. त्या नंतर तंत्रज्ञानाच्या कसोटीवर नंतर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. भारतीय परराष्ट्र धोरणामुळे आणि रशियाने उत्तम सहकार्य केल्याने रशियन लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी करण्यात आली. तसेच रशियन हेलिकॉफ्टर्स सहभागी करण्यात आली. सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणकीय प्रणाली वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत.

२१व्या शतकाच्या सुरुवातीस वायुसेनेकडे अनेक देशांतून उत्पादन केलेली विमाने आहेत.