बोंडीवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?बोंडीवली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर दापोली
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

बोंडीवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

भौगोलिक दृष्ट्या विचार करता तालुक्याचं ठिकाण दापोली हे केवळ हाकेच्या अंतरावर आहे.मुंबई पासून 200 किमी आणि जिल्ह्याचं ठिकाण असणाऱ्या रत्‍नागिरी पासून 150 किमी अंतरावर बोंडीवली हे गाव जस पाचूच्या गोंदनात हिरा बसवावा तसं निसर्गाच्या कुशीत आणि सह्याद्रीच्या मुशीत वसलेलं आहे. आपटोबा च्या कृपेने बारमाही वाहणारं खळाळत्या नद्या,सदाहरित जंगले,निसर्गाचा सहवास आणि गावाचं गावपण जपणारी असंख्य मने हेच या गावाचे वैभव.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

गाव तसं लहानच.साधं,गुण्यागोविंदाने राहणारं, मोजून 150 उंबऱ्याच गाव,गावाची लोकसंख्या फार फार तर 1000 च्या घरातच,त्यातील 70% लोक पोटापाण्यासाठी मुंबई पुण्याला स्थायिक झालेली. गावाचं ग्रामदैवत आहे श्री आपटोबा म्हणजेच महादेवाचं रूप. गावाच्या वेशीच रक्षण करणारे म्हसोबा,डुनकाई, गोरजाई,साती आसरा,महामाई,भानोबा,करजाई,काळकाई अशी देवस्थान गावाला सुखरूप ठेवतात.त्यांच्या जोडीला गावात श्री मुरुबाई आई,राधाकृष्ण,श्री भगवान,महाबली हनुमान ही देवस्थाने आहेत.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासची गावे[संपादन]

संदर्भ[संपादन]

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/