शिपाई बुलबुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिपाई बुलबुल
Red bulbul.jpg
शास्त्रीय नाव Pycnonotus jocosus
कुळ वल्गुवदाद्य (Pycnonotidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Red-whiskered Bulbul
संस्कृत गोवत्सक
हिंदी कमेरा बुलबुल, पहाडी बुलबुल

वर्णन[संपादन]

शिपाई बुलबुल हा पक्षी साधारण २० सें. मी. (८ इं) लांबी,चा आहे. पाठीकडून तपकिरी-बदामी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे, त्यावर मोठा टोकदार, काळा तुरा, डोळ्यांजवळ लाल कल्ले, तसेच गालावर पांढरा पट्टा आणि लाल रंगाचे बूड. नर-मादी दिसायला सारखेच. हा पक्षी लाल बुडाचा बुलबुलसारखा वाटतो मात्र डोक्यावरील मोठा तुरा आणि डोळ्यांजवळ असलेले ठळक लाल आणि पांढरे भाग हा या दोन पक्ष्यांमधील फरक आहे.

वास्तव्य[संपादन]

राजस्थानच्या वाळवंटी भागाखेरीज संपूर्ण भारतभर तसेच बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये शिपाई बुलबुलचे वास्तव्य आहे. ऑस्ट्रेलिया देशात १८८० साली व हवाई बेटे, मॉरिशियस आदी ठिकाणी तर शिपाई बुलबुल हा पक्षी मुद्दाम सोडण्यात आला आणि तेव्हापासून या सर्व ठिकाणीही शिपाई बुलबुलचे वास्तव्य आहे.

प्रजाती[संपादन]

रंग आणि इतर थोड्या फरकांनी याच्या किमान पाच उपजाती आहेत.

आढळस्थान[संपादन]

सर्व प्रकारच्या जंगलांत विशेषतः जंगलांच्या बाह्य भागांत तसेच बागा, उद्याने व शेतीचे प्रदेश या ठिकाणी शिपाई बुलबुल आढळतो.

खाद्य[संपादन]

फळे, कीटक, मध हे शिपाई बुलबुलचे मुख्य खाद्य आहे.

प्रजनन काळ[संपादन]

फेब्रुवारी ते ऑगस्ट हा काळ या पक्ष्यांचा प्रजनन काळ असून यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे असते. घरटे बहुधा एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत असते. तसेच ते कडेकपारीत किंवा एखाद्या ओसाड घराच्या छताला लागून असलेलेही दिसून येते. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. यांची आणि लाल बुडाचा बुलबुलची अंडी साधारण सारखीच दिसतात. पिलांचे संगोपन वगैरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन[संपादन]