पांढऱ्या भुवईचा बुलबुल
शास्त्रीय नाव | Pycnonotus luteolus |
---|---|
कुळ | वल्गुवदाद्य (Pycnonotidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | White-browed Bulbul |
संस्कृत | सितभ्रू गोवत्सक |
आकार
[संपादन]पांढऱ्या भुवईचा बुलबुल हा साधारण २० सें. मी. (८ इं) आकाराचा पक्षी आहे.
आवाज
[संपादन]या बुलबुलचा आवाज ऐका (सहाय्य·माहिती)
शरिररचना
[संपादन]हा डोक्यावर तुरा नसलेला, फिकट हिरव्या रंगाचा पक्षी आहे. याचे कपाळ आणि भुवया पांढऱ्या असतात. भुवईच्या पांढऱ्या रंगावरून हे बुलबुल ओळखता येतात. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.
वास्तव्य
[संपादन]पांढऱ्या भुवईचा बुलबुल भारतीय द्वीपकल्पात सर्वत्र आढळणारा स्थानिक निवासी पक्षी आहे तसेच श्रीलंका देशातही याचे वास्तव्य आहे. हे बुलबुल झुडपी विरळ जंगलात, बागेत, शुष्क पानगळीच्या जंगलात राहतात.
प्रजाती
[संपादन]याच्या रंग आणि आकारावरून किमान २ उपजाती आहेत. भारतीय अपजातीच्या मानाने श्रीलंका येथील उपजात थोडी लहान आणि जास्त गडद असते.
खाद्य
[संपादन]विविध कीटक, फळे, दाणे, मध हे बुलबुलचे मुख्य खाद्य आहे. बुलबुल विविध प्रकारची फळे खाणारे पक्षी असल्याने झाडांच्या बिया दूर अंतरावर पसरविण्यास यांचा मोठा सहभाग आहे.
प्रजनन
[संपादन]मार्च ते सप्टेंबर हा कालावधी या बुलबुलचा विणीचा काळ असून जमिनीपासून २ मी. उंच झाडावर यांचे गवताचे, खोलगट घरटे असते. सहसा घरटे बांबूच्या रांजीत असते. मादी एकावेळी २-३ फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. यांच्या अंड्यांवरील तपकिरी ठिपके लाल बुडाचा बुलबुलच्या अंड्यांवरील ठिपक्यांपेक्षा फिकट असतात. नर-मादी पिलांचे संगोपन करण्यापासून सर्व कामे मिळून करतात.
चित्रदालन
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |