बालखाश सरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बालखाश सरोवर  
बालखाश सरोवर - १९९१ साली अंतराळातून टिपलेले चित्र
बालखाश सरोवर - १९९१ साली अंतराळातून टिपलेले चित्र
१९९१ साली अंतराळातून टिपलेले चित्र
स्थान कझाकस्तान
गुणक: 46°10′N 74°20′E / 46.167°N 74.333°E / 46.167; 74.333गुणक: 46°10′N 74°20′E / 46.167°N 74.333°E / 46.167; 74.333
प्रमुख अंतर्वाह इली नदी व इतर लहान नद्या
प्रमुख बहिर्वाह बाष्पीभवन
पाणलोट क्षेत्र २,७६,००० वर्ग किमी
भोवतालचे देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान (८५%)
Flag of the People's Republic of China चीन (१५%)
कमाल लांबी ६०५ किमी (३७६ मैल)
कमाल रुंदी ७४ किमी (४६ मैल)
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १६,४०० चौ. किमी (६,३०० चौ. मैल)
सरासरी खोली ५.८ मी (१९ फूट)
कमाल खोली २६ मी (८५ फूट)
पाण्याचे घनफळ ४४० किमी (१०० घन मैल)
उंची ३४१.४ मी (१,१२० फूट)
कझाकस्तान नकाशावर बालखाश सरोवर

बालखाश सरोवर (रशियन: Озеро Балхаш; कझाक: Балқаш Көлі) हे मध्य आशियातील खंडामधील सर्वात मोठे व जगातील १३व्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. कझाकस्तानच्या आग्नेय भागात स्थित असलेल्या बालखाश सरोवराला ह्या खोऱ्यामधील सात नद्या येऊन मिळतात तर सरोवरातील पाण्याचा बहिर्वाह केवळ बाष्पीभवनाद्वारे होतो. एक छोटी सामुद्रधुनी बालखाशला दोन भागांमध्ये विभागते. सरोवराच्या पश्चिम भागातील पाणी गोडे तर पूर्व भागतील पाणी खारे आहे. सुमारे ६६,००० लोकसंख्या असलेले बालखाश हे ह्या सरोवराच्या काठावर वसलेले सर्वात मोठे शहर आहे.

सोव्हिएत राजवटीने बालखाश सरोवराला पाणी पुरवणाऱ्या नद्या सिंचनासाठी इतरत्र वळवल्यामुळे अरल समुद्राप्रमाणे येथील पाण्याचा साठा देखील आटत चालला आहे.