बारा ऑलिंपियन दैवते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बारा ऑलिंपियन दैवते हे ग्रीक दंतकथेनुसार ऑलिंपस पर्वतावर राहणारी प्रमुख दैवते आहेत. रोमन दंतकथेनुसारसुद्धा असेच प्रमुख बारा दैवते आहेत. यामध्ये खालील दैवते समाविष्ट आहेत.

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


ऑलिंपियन दैवतांची यादी[संपादन]

ग्रीक नाव रोमन नाव पुतळा कशाचा/कशाची देव/देवता ? पिढी
झ्यूस ज्युपिटर Jupiter Versailles Louvre Ma78.jpg देवांचा राजा आणि ऑलिंपस पर्वताचा अधिपती; आकाश, वादळ(वीज) व न्याय यांचा देव पहिली
हीरा ज्युनो Hera Campana Louvre Ma2283.jpg देवांची व स्वर्गाची राणी; स्त्रीत्व, गृहस्थी व मातृत्वाची अधिष्ठात्री. पहिली
पोसायडन नेपच्यून (Bologna) - Fontana del Nettuno.jpg समुद्राचा अधिपती; समुद्राचा व भूकंपाचा देव; घोड्यांचा निर्माता पहिली
डीमिटर सेरेस Demeter Altemps Inv8546.jpg सुपीकता, शेती, निसर्ग व ऋतू यांची देवता पहिली
हेस्तिया व्हेस्टा Hestia-meyers.png चूल व घर यांची देवता (left so Dionysus could be in the twelve). पहिली
ॲफ्रोडाइटी व्हीनस NAMA 262 Aphrodite Epidaure 2.JPG प्रेमाची, सौंदर्याची, कामनेची व प्रजननक्षमतेची देवता दुसरी
अपोलो अपोलो Roman Statue of Apollo.jpg सूर्यदेव तसेच प्रकाश, रोगमुक्ती, संगीत, कविता, भविष्यकथन, धनुर्विद्या व सत्य यांचा देव. दुसरी
ॲरीस मार्स Ares villa Hadriana.jpg युद्ध, उन्माद, द्वेष आणि रक्तपाताचा देव. दुसरी
आर्टेमिस डायना Diane de Versailles Leochares 2.jpg शिकार, चंद्र तसेच कौमार्यतेची देवता दुसरी
अथेना मिनर्व्हा Athena Giustiniani Musei Capitolini MC278.jpg बुद्धी, कारागिरी व युद्धाची व्यूहरचना यांची देवता. दुसरी
हिफॅस्टस व्हल्कन Vulcan Coustou Louvre MR1814.jpg देवांचा लोहार; आगीचा व लोहाराच्या भट्टीचा देव. दुसरी
हर्मीस मर्क्युरी Hermes-louvre3.jpg देवांचा दूत; व्यापार, गती, चोर व खरेदी-विक्री यांचा देव. दुसरी

ऑलिंपियन दैवतांच्या निकटदेवता[संपादन]

  • बिआ - हिंसेचे प्रतीक किंवा हिंसेचे मूर्तरूप असलेली देवता.
  • क्रेटॉस - सामर्थ्याचे मूर्तरूप.
  • दिओने - ॲफ्रोडायटीची आई.
  • डायनिसस - वाईन, मेजवान्यांचा, आणि आनंदाचा देव. हा बाकस या नावानेसुद्धा ओळखला जातो. (हेस्तिया ऑलिंपस पर्वत सोडून गेल्यावर याचा बारा ऑलिंपियन दैवतांमध्ये समावेश झाला.)
  • ऐलीथिया - झ्यूसपत्नी ज्युनो(हीरा)च्या कन्यका; प्रसूतिदेवता.
  • इऑस - पहाटेचे मूर्तरूप.
  • एरिस - मतभेदांची देवता.
  • इरॉस - इच्छा व वासना यांचा देव. रोमन देव क्यूपिड व हा एकसारखेच आहेत.
  • गॅनिमीड - ऑलिंपस पर्वतावरील राजवाड्यातील देवांचा सेवक.
  • हेडीस - मृतांचा अधिपती; पाताळभूमीचा आणि पृथ्वीच्या पोटातील संपत्तीचा (रत्न व मौल्यवान धातू यांचा) देव.
  • हीब - तारुण्यदेवता.
  • हेलियोस - टायटन; मनुष्यरूपातील सूर्य.
  • हेराक्लेस - हर्क्युलीस(झ्यूसचा पुत्र), ग्रीक पुराणांतील सर्वात महान बलवान आणि शूर नायक (Greatest hero of the Greek myths).
  • होरे - ऑलिंपसचे रक्षक.
  • आयरिस - ऑलिंपसी दूत, मानवीस्वरूपातील इंद्रधनुष्य.
  • लेटो - झ्यूसची एक पत्नी; एका टायटनची कन्या; किअस टायटन व फीबी हिचे आईवडील; अपोलो व आर्तेमिस(डायना)ची आई.
  • मॉर्फियुस - स्वप्नदेवता.
  • म्यूझ - झ्यूसच्या नऊ कन्यका; काव्य, गान, नृत्य, वगैरेंच्या अधिष्ठात्या देवता; स्फूर्तिदेवता.
  • नेमेसिस - ग्रीक सूडदेवता.
  • नाइकी - विजयाची देवता.
  • पॅन - जंगल, गुराखी, वन्यपशू आणि निसर्गांचा देव.
  • पेएन - धन्वंतरी.
  • पेर्सेयस - झ्यूसचा पुत्र - ग्रीक पुराणांतल्या महान नायकांपैकी एक.
  • पेर्सेफोन - वसंतऋतू आणि मृत्युची देवता. डिमीटरची मुलगी.
  • सेलेने - मानवी स्वरूपातील चंद्र.
  • झेलस - नकलाकार देवता.