अथीना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg
अथेनाचा पुतळा

अथेना किंवा अथीना, ही ग्रीक पुराणांनुसार बुद्धिचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता आहे. ग्रीसची राजधानी अथेन्स या शहराचे ग्रामदैवत अथेना आहे. घुबड ही या देवतेची निशाणी आहे.

अथेना ही झ्यूसची कन्या मात्र ती आईविना जन्मली.[१] दुसऱ्या एका कथेनुसार झ्यूसची पहिली पत्नी मेटीस व झ्यूस यांची ही कन्या. आपली पत्नी आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली पुत्रास जन्म देईल या भीतीने, झ्यूसने अथेनाला खाऊन टाकले. पुढे हिफीस्टसने कुऱ्हाडीच्या घावाने झ्यूसचे डोके फोडून त्यातून अथेनाला बाहेर काढले. अथेना ही मुख्यत्वे अथेन्स शहराची, आणि सामान्यत: सर्व ग्रीक शहरांची संरक्षणदेवता आहे. ती कलाकौशल्याची आश्रयदात्री आहे. ती सूतकताई आणि विणकाम यांचीही देवता आहे. पावा किंवा बासरी हे वाद्य तिनेच शोधून काढले असे म्हणतात. तिचे सौंदर्य पाहणारा भयचकित होतो.

अथेनाच्या मूर्तीत ती नेहमी सुंदर पण सशस्त्र दाखविली जाते. तिच्या ढालीवर गॉरगॉन या राक्षसिणीचे डोके दाखविलेले असते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Athena". ब्रिटानिका (इंग्रजी मजकूर) (वेब आवृत्ती.) (एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका). ३० ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. 
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस
रोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.