प्रीमियर हॉकी लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रीमियर हॉकी लीग
PHLLogo.jpeg
खेळ हॉकी
प्रारंभ २००५
ब्रीदवाक्य गर्व नही तो कुछ नही!
वर्षे
संघ
देश भारत
सद्य विजेता संघ Bangalore-Hi-Fliers.jpeg बंगलोर हाय फ्लायर्स
संकेतस्थळ प्रीमियर हॉकी लीग
Sports current event.svg प्रीमियर हॉकी लीग २००८


प्रीमियर हॉकी लीग (इंग्रजी:Premier Hockey League) किंवा पी.एच.एल. भारतातील हॉकी स्पर्धा आहे. ही स्पर्धा २००५ सालापासून खेळवली जात आहे. हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. क्रिकेटची लोकप्रियता व भारतीय हॉकी संघाच्या सुमार प्रदर्शनामुळे प्रेक्षक हॉकीपासून दूर गेला. भारतात हॉकी परत एकदा लोकप्रिय करण्यासाठी, भारतीय हॉकी संघटनेने (IHF) ही लीग सुरू केली.

२००७ मध्ये ही स्पर्धा चेन्नईचंदीगड येथे होत आहे. प्रीमियर हॉकी लीगचे सर्व सामने ई.एस.पी.एन. वाहिनीवर दाखविले जातात.

नवीन नियम[संपादन]

आंतरराष्ट्रीय हॉकी सामना ७० मिनिटांचा असतो व ३५ मिनिटांच्या दोन भागात विभागला जातो. मात्र पी.एच.एल. मध्ये ७० मिनिटे चार भागात विभागलेले आहेत (एक भाग १७.५ मिनिटे). ह्याशिवाय फिरते बदल ( Rolling Substitution), टाइम आउट ( Time Out) असे नावीन्यपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत.

प्रीमियर हॉकी लीग हंगाम[संपादन]

वर्ष यजमान शहर विजेता उप विजेता
२००५
माहिती
हैद्राबाद Hyderabad Sultans.jpeg हैद्राबाद सुल्तान्स Sher-e-Jalandhar.jpeg शेर-ए-जालंदर
२००६
माहिती
चंदीगड Bangalore-Hi-Fliers.jpeg बंगलोर हाय फ्लायर्स Chandigarh Dynamos.jpeg चंदिगड डायनामोज
२००७
माहिती
चेन्नईचंदीगड Orissa Steelers.jpeg ओरिसा स्टीलर्स Sher-e-Jalandhar.jpeg शेर-ए-जालंदर
२००८
माहिती
चंदीगड Bangalore-Hi-Fliers.jpeg बंगलोर हाय फ्लायर्स Chandigarh Dynamos.jpeg चंदिगड डायनामोज

संघांची कामगिरी[संपादन]

संघ सहभाग सलग सहभाग पदार्पण शेवटचा सहभाग सर्वोत्तम प्रदर्शन माहिती
सामने विजय हार
Bangalore-Hi-Fliers.jpeg बंगलोर हाय फ्लायर्स २००५ २००८ विजेता (२००६,२००८) 26 15 11
Hyderabad Sultans.jpeg हैद्राबाद सुल्तान्स २००५ २००८ विजेता (२००५) 26 12 14
Orissa Steelers.jpeg ओरिसा स्टीलर्स २००७ २००८ विजेता (२००७) 21 15 6
Sher-e-Jalandhar.jpeg शेर-ए-जालंदर २००५ २००८ उप विजेता (२००५,२००७) 29 15 14
Chandigarh Dynamos.jpeg चंदिगड डायनामोज २००६ २००८ उप विजेता (२००६,२००८) 26 15 11
Maratha Warriors.jpeg मराठा वॉरियर्स २००५ २००८ 26 13 13
Chennai Veerans.jpeg चेन्नई वीरन्स २००५ २००८ 26 6 20


संघ २००५ २००६ २००७ २००८
प्रीमियर लीग
Hyderabad Sultans.jpeg हैद्राबाद सुल्तान्स विजेता
Bangalore-Hi-Fliers.jpeg बंगलोर हाय फ्लायर्स विजेता विजेता
Orissa Steelers.jpeg ओरिसा स्टीलर्स na विजेता
Sher-e-Jalandhar.jpeg शेर-ए-जालंदर उप विजेता उप विजेता
Chandigarh Dynamos.jpeg चंदिगड डायनामोज na उप विजेता उप विजेता
Maratha Warriors.jpeg मराठा वॉरियर्स
Chennai Veerans.jpeg चेन्नई वीरन्स
फर्स्ट डिविजन
Chandigarh Dynamos.jpeg चंदिगड डायनामोज विजेता na
Orissa Steelers.jpeg ओरिसा स्टीलर्स a विजेता
Chennai Veerans.jpeg चेन्नई वीरन्स a विजेता
Lucknow nawabs.gif लखन्नो नवाब्ज na na
Delhi dazzlers.gif दिल्ली डॅझलर्स उप विजेता
Imphal rangers.gif इंफाळ रेंजर्स na na

संघ[संपादन]

 • हैद्राबाद सुल्तान्स
 • शेर-ए-जालंदर
 • मराठा वॉरीएर्स
 • बंगलोर लायन्स
 • चंदिगड डायनामोज
 • चेन्नै विरन्स
 • ओडिशा स्टीलर्स
 • दिल्ली डॅझलर्स
 • बेंगाल टायगर्स
 • लखनौ नवाब्ज
 • इंफाळ रेंजर्स

आंतरराष्ट्रीय खेळाडू[संपादन]

पी.एच.एल.(प्रीमियर हॉकी लीग)मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू मोठ्या प्रमाणात सामील होतात. पाकिस्तान, नेदरलँड्स, जर्मनी, स्पेन, मलेशिया, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचे खेळाडू पी.एच.एल मधे सहभागी झाले आहेत. २००७ मध्ये खेळणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू:

 • सेबॅस्टियन वेस्टरहॉट (नेदरलन्ड्स, सुल्तान्स)
 • शकील अब्बासी (पाकिस्तान, सुल्तान्स)
 • तारिक अजीज (पाकिस्तान, सुल्तान्स)
 • डॉन प्रिन्स (नेदरलन्ड्स, शेर्स)
 • मोहम्मद इम्रान (पाकिस्तान, शेर्स)
 • इम्रान खान (पाकिस्तान, शेर्स)
 • सेस्को वॅन डर विलेट (नेदरलॅन्ड्स, वॉरियर्स)
 • अदनान मकसुद (पाकिस्तान, वॉरियर्स)
 • इम्रान वारसी (पाकिस्तान, वॉरियर्स)
 • जेमी डॉयर (ऑस्ट्रेलिया, वॉरियर्स)
 • सॅन्डर वॅन डे विडे (नेदरलॅन्ड्स, लॉयन्स)
 • रेहान भट्ट (पाकिस्तान,लॉयन्स)
 • बाल्देर बोमन्स (नेदरलॅन्ड्स, डायनामोज)
 • सज्जाद अन्वर (पाकिस्तान , डायनामोज)
 • टिमो ब्रुइन्समा (नेदरलॅन्ड्स, डायनामोज)
 • अल्बर्ट सेसास (स्पेन, विरन्स)
 • कुहान शण्मुखनाथन (मलेशिया, विरन्स)
 • मुहम्मद झुबेर (पाकिस्तान, विरन्स)
 • तिजार्ड स्टेलर (नेदर्लॅन्ड्स, स्टीलर्स)
 • सलमान अकबर (पाकिस्तान, स्टीलर्स)
 • अदनान झाकिर (पाकिस्तान, स्टीलर्स)

प्रीमियर हॉकी लीग २००५[संपादन]

२००५ साली हैद्राबादमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. प्रीमियर लीग व फर्स्ट डिविजन ह्या दोन विभागात ही स्पर्धा झाली.

प्रीमियर लीग फर्स्ट डिविजन

प्रीमियर हॉकी लीग २००६[संपादन]

प्रीमियर लीग फर्स्ट डिविजन

प्रीमियर हॉकी लीग २००७[संपादन]

२००७ साली फक्त प्रीमियर लीग खेळवण्यात येत आहे. सात संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा चेन्नईचंदिगड येथे होईल.

संघ सामने विजय हार गोल केले गोल झाले गुण श्रेणी
Orissa Steelers.jpeg ओरिसा स्टीलर्स ( विजेता) १२ १० २९ १२ २८
Sher-e-Jalandhar.jpeg शेर-ए-जालंदर १२ २८ १४ २३
Bangalore-Hi-Fliers.jpeg बंगलोर हाय फ्लायर्स १२ २४ २६ २०
Maratha Warriors.jpeg मराठा वॉरियर्स १२ १९ २० १९
Chandigarh Dynamos.jpeg चंदिगड डायनामोज १२ १८ १७ १७
Chennai Veerans.jpeg चेन्नई वीरन्स १२ १८ ३२ १३
Hyderabad Sultans.jpeg हैद्राबाद सुल्तान्स १२ १० ११ २६

विजेता संघ - ओडिशा स्टीलर्स (४० लाख रुपये )

उप-विजेता संघ - शेर-ए-जालंदर(१५ लाख रुपये )

मॅन ऑफ़ टुर्नामेंन्ट - गगन अजित सिंग (शेर्स)

फ़ेअर प्ले - बंगलोर लायन्स


साखळी सामन्यांच्या अंती ओडिशा स्टीलर्स व शेर-ए-जालंदर यांच्यातील बेस्ट ऑफ़ थ्री फ़ायनल्स मधुन विजेता संघ निवडण्यात आला.

तिसया अंतिम सामन्यात पंच्याशी केलेल्या गैर वर्तनामुळे शेर-ए-जालंदर च्या संघाला विजयी रकमेच्या ५० % दंड ठोकवण्यात आला. भारतीय हॉकी महासंघाने ह्या घटनेत सहभागी असलेल्या खेळाडुंची चौकशी सुरु केलेली आहे.

यशस्वी झालेली हि स्पर्धा खूप लांब (४ जानेवारी २००७ ते ५ मार्च २००७) असल्याचे बरयाच परदेशी खेळाडुंनी सांगितले.

बाह्य दुवे[संपादन]

ओरिसा स्टीलर्स | शेर-ए-जालंदर | बंगलोर हाय फ्लायर्स | मराठा वॉरियर्स | चंदिगड डायनामोज | चेन्नई विरन्स | हैद्राबाद सुल्तान्स
संघ | अंतिम सामना | विक्रम
२००५ | २००६ | २००७ | २००८