चर्चा:प्रिया बेर्डे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अशुद्ध लेखन आहे नव्याने लेखन अपेक्षीत आहे.बदल अपेक्षीत.क.लो.अ. पुनर्लेखन करावे Pra.K. १०:०६, ८ एप्रिल २०१० (UTC)

प्रिया मराठे की प्रिया बेर्डे[संपादन]

माझ्या आठवणीनुसार प्रिया मराठे ही तुलनेने तरूण पिढीतील अभिनेत्री आहे. झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेत व कॉमेडी सर्कस या विनोदप्रधान हिंदी कार्यक्रमात तिने कामे केली आहेत. या लेखाचा विषय असलेली प्रिया बेर्डे मराठी चित्रपटांतील सुपरिचित अभिनेत्री असल्यामुळे त्याबाबत संदिग्धता नाही; मात्र लेखात तिचे नाव प्रिया मराठे असे लिहिले आहे - ते नाव पूर्वाश्रमीचे आहे किंवा कसे ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:४०, २६ जून २०११ (UTC)


दिवंगताशी लग्न?[संपादन]

>>तिने दिवंगत मराठी चित्रपट-अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे याच्याशी विवाह केला.<<.. दिवंगताशी विवाह कसा करता येईल? हे वाक्य असे चालले असते. त्यांनी मराठी चित्रपट-अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे(आता दिवंगत) यांच्याशी विवाह केला होता..किंवा त्या दिवंगत मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी होत्या....J ०७:०८, २६ जून २०११ (UTC)

आधीचे नाव प्रिया अरुण[संपादन]

लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी रुही बेर्डे. ती (बहुधा) मेंदूच्या आजाराने वारली. दुसरी पत्नी प्रिया अरुण. प्रिया मराठे ही अगदी नवीन नटी आहे....J ०७:४०, २६ जून २०११ (UTC)