प्रचीती म्हात्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रचीती म्हात्रे
जन्म प्रचीती म्हात्रे
ठाणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व मराठा, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, दूरचित्रवाणी)
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट बालगंधर्व

प्रचीती म्हात्रे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही मराठी अभिनेत्री आहे.

जीवन[संपादन]

प्रचीती म्हात्रे हिचा जन्म महाराष्ट्रात ठाणे येथे झाला. ई टीव्ही मराठी वाहिनीच्या 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' या मालिकेद्वारे प्रचीतीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारलेल्या बालगंधर्व या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.

बाह्य दुवे[संपादन]