पारंपारिक ऊर्जा
Appearance
पारंपारिक ऊर्जा (इंग्रजी: Fossil Energy) हे एक प्रकारचे इंधन आहे, जे सजीवांचे अवशेष जमीन गाडले जाऊन, ज्याला "जिवाश्म" असेही म्हणतात, त्यावर नैसर्गिक प्रक्रिया होऊन तयार होते. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू हे पारंपरिक ऊर्जेचे इंधन आहे. हे इंधन जाळल्यानंतर त्यातून ऊर्जा बाहेर पडते.
ओळख
[संपादन]पारंपारिक ऊर्जा कार्बन चक्रावर आधारित आहे आणि ज्यामुळे सुर्याची ऊर्जा भूतकाळात अनेक वर्षं साठविली असते त्या ऊर्जेचा वर्तमान काळात वापर करणे शक्य होते.
स्रोत
[संपादन]सर्व प्रकारचे जिवाष्म इंधने ही पारंपारिक ऊर्जेचे स्रोत आहेत.
महत्त्व
[संपादन]हे स्रोत औद्योगिक क्रांतीच्या काळापासून सतत आर्थिक वृद्धी करण्यास मानवास सक्षम करत आहेत.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ रिंगले, सर एडवर्ड (2010). Energy and the English Industrial Revolution. केंब्रिज: केंब्रिज विद्यापीठ प्रेस. ISBN 978-0-511-77961-9.