Jump to content

पाटोदा (औरंगाबाद)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पाटोदा (जी. औरंगाबाद) या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?पटोदा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ४९′ ०१.९३″ N, ७५° १६′ ०५.८४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५१८ मी
जवळचे शहर औरंगाबाद
जिल्हा औरंगाबाद
लोकसंख्या ३,३०० (२०११)
भाषा मराठी
कोड
आरटीओ कोड

• MH 20

पाटोदा छत्रपती संभाजीनगर जिल्हा मधील एक गाव आहे. या गावाला महाराष्ट्रातील सर्वोत्कृषट गावाचा सन्मान मिळाला आहे. या गावास भूतपूर्व (माजी) राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते आणि राष्ट्रपती-प्रतिभा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.

प्रशासन

[संपादन]

पाटोदा औरंगाबाद तालुक्यात स्थित आहे आणि औरंगाबाद शहरापासून बारा किमी अंतरावर आहे. पाटोदा गावात ग्रामपंचायत आहे. भास्कर पेरे पाटील हे येथील सरपंच आहेत.

व्यवस्थापन

[संपादन]

पाटोदा गाव हे आदर्श ग्राम महणून ओळखलं जाते. गावात सांडपाण्याची विल्हेवाट लावली गेली आहे, शोषखड्यांची अनेक ठिकाणी निर्मिती केली गेली आहे. वृक्ष लागवड केली गेली आहे. पेव्हर ब्लॉक बसून गावातील रस्ते पक्के केले गेले त्यामुळे पावसाळ्यात गावात चिखल होत नाही. पाटोदा गावातील मराठी शाळा सुद्धा आदर्श शाळा आहे तिथे मुलांना बसण्यासाठी आधूनीक बंचेस आहेत. प्रोजेक्टर द्वारे धडे शिकवले जातात. ओल्या कचऱ्यापासून शेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. गावात एक ट्रॅक्टर आत्वड्यातील ठराविक दिवशी फिरून ट्राॅलीत कचरा गोळा करते. नागरिकांना सुद्धा सूचना आहेत की ते ओला व कोरडा कचरा वेगवेगळा वेगळ्या कचराकुंडीत जमा करतात. गावात दाळनाची यावस्था मोफत आहे. ग्रामपंचायत पीठ, मसाला मोफत दळून देते.बटाटे चिप्स मोफत बनवून मिळतात. अश्या अनेक सुधारक कमांमुळे पाटोदा गावाला ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना आणि प्रतिभा पाटील राष्ट्रपती असताना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला हे पुरस्कार त्यावेळेचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांना देण्यात आले.

पुरस्कार

[संपादन]
  1. ^ https://marathi.abplive.com/news/mumbai/villages-will-develop-if-government-officials-work-sincerely-says-sarpanch-bhaskar-pere-patil-771450