भास्कर पेरे पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भास्कर पेरे पाटील[१]

पाटोदा गावचे सरपंच

राष्ट्रीयत्व भारतीय
अपत्ये

भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे सरपंच आहेत.[२]ते सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्टातील सर्वोत्कृष्ट गावचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली[३].

जीवन[संपादन]

भास्कर पेरे पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे.

कारकीर्द[संपादन]

पेरे सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, प्रथम राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून. महाराष्ट्र सरकारजढूनही पुरस्कार मिळाला. पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत जसे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य. ते गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शनसुद्धा करतात.

सन्मान[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://marathi.abplive.com/news/mumbai/villages-will-develop-if-government-officials-work-sincerely-says-sarpanch-bhaskar-pere-patil-771450
  2. ^ https://marathi.abplive.com/news/mumbai/villages-will-develop-if-government-officials-work-sincerely-says-sarpanch-bhaskar-pere-patil-771450
  3. ^ टुडे, महाराष्ट्र (२०२०). "किनाळा : राज्यातील उत्कृष्ट ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा भास्कर पेरे पाटील लोहगावात व्याख्यान". Maharshtra: Maharshtra Today. pp. १.


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.