पदपरिस्फोट
Appearance
पदपरिस्फोट म्हणजे शब्दांचे व्याकरण चालविणे.वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगता येणे यालाच 'व्याकरण चालविणे' असे म्हणतात.वाक्यातील प्रत्येक शब्दाची जात,पोटजात व त्याचे कार्य तर सांगता यावेच,शिवाय त्या शब्दाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबधही सांगता यावा हा हेतू असतो.एका अर्थाने संपूर्ण व्याकरण विषयक माहिती असते.
वाक्यातील शब्द/पद कोणती माहिती द्यावी
- नाम/सर्वनाम मूळ शब्द,त्याचा पोटप्रकार,लिंग,विभक्ती,वचन,विभक्तीचा अर्थ स्पष्ट करून सांगावा.
- विशेषण -मूळ शब्द,त्याचा पोटप्रकार, कोणत्या नामा बद्दल ते विशेष माहिती सांगते ते नाम(विशेष्य)सांगावे.
- क्रियापद - मूळ धातू, क्रियापदाचा प्रकार,रूप(करण किंवा अकरण), अर्थ,काळ,लिंग,पुरुष,वचन व वाक्याचा प्रयोग.
- क्रिया विशेषण -पोटप्रकार कोणा बद्दल विशेष माहिती सांगते तो शब्द .
- शब्दयोगी अव्यय - कोणत्या शब्दाला जोडून आला त्याचे व्याकरण,पोटप्रकार,व विभक्तीचा अर्थ व्यक्त करत असेल तर तो अर्थ.
- उभयान्वयी - पोटप्रकार सांगून कोणते दोन शब्द किंवा वाक्ये जोडते त्याचा उल्लेख करावा.
- केवलप्रयोगी - कोणती भावना व्यक्त करते ते स्पष्ट करावे.
संदर्भ
[संपादन]- 'मराठीचे व्याकरण'(प्रथमावृत्ती १९९३) डॉ.लीला गोविलकर
- 'सुगम मराठी व्याकरण' लेखन लेखक कै. मो.रा.वाळंबे(निधन मार्च १९९२).
- 'अत्यावश्यक मराठी व्याकरण' - डॉक्टर विजय लक्ष्मण वर्धे(एम्.ए.मराठी,एम्.ए.(हिंदी),एम्.एड,पीएच्.डी.