Jump to content

पंपा सरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंपा सरोवर

पंपा सरोवर हे कर्नाटकच्या हंपी जिल्ह्यात असलेले एक सरोवर आहे. ते तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेस आहे. हे सरोवर हिंदूंमध्ये पवित्र मानले जाते व हे भारतात असलेल्या पंचसरोवरांपैकी एक आहे.याचा उल्लेख श्रीमद्भागवत पुराणात सापडतो.पंपा या पार्वतीच्या अवताराने येथे शिवाला प्राप्त करण्यासाठी खडतर तप केले. या सरोवराचा उल्लेख रामायणात पण आहे. येथे शबरीने रामाची वाट बघितली होती.