न्यू जर्सी
न्यू जर्सी New Jersey | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | ट्रेंटन | ||||||||||
मोठे शहर | न्यूअर्क | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ४७वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २२,६०८ किमी² | ||||||||||
- रुंदी | ११२ किमी | ||||||||||
- लांबी | २७३ किमी | ||||||||||
- % पाणी | १४.९ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ११वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ८७,९१,८९४ (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ४५८/किमी² (अमेरिकेत १वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $७०,३७८ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | १८ डिसेंबर १७८७ (१८वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-NJ | ||||||||||
संकेतस्थळ | www.nj.gov |
न्यू जर्सी (इंग्लिश: New Jersey, न्यू जर्झी ) हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले न्यू जर्सी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने अकराव्या क्रमांकाचे राज्य आहे.
न्यू जर्सीच्या पूर्वेला व दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला डेलावेर व पेनसिल्व्हेनिया व उत्तरेला न्यू यॉर्क ही राज्ये आहेत. ट्रेंटन ही न्यू जर्सीची राजधानी तर न्यूअर्क हे सर्वात मोठे शहर आहे. न्यू जर्सीमधील बव्हंशी लोक न्यू यॉर्क शहर व फिलाडेल्फिया ह्या महानगरांच्या क्षेत्रांत राहतात.
दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीने न्यू जर्सी हे अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणावर न्यू यॉर्क शहरावर अवलंबून आहे व न्यू यॉर्क शहरामध्ये काम करणारे हजारो लोक न्यू जर्सीमध्ये वास्तव्य करतात. भारतीय वंशाच्या रहिवाशांच्या संख्येमध्ये न्यू जर्सीचा अमेरिकेत तिसरा क्रमांक लागतो.
मोठी शहरे
[संपादन]- न्यूअर्क - २,७७,१४०
- जर्सी सिटी - २,४७,५९७
- पॅटरसन - १,४६,१९९
गॅलरी
[संपादन]-
न्यू जर्सीला न्यू यॉर्क शहरासोबत जोडणारा जॉर्ज वॉशिंग्टन पूल हा जगातील सर्वात वर्दळीचा पूल आहे.
-
अटलांटिक सिटीमधील ट्रंप ताज महाल हॉटेल
-
न्यू जर्सीमधील प्रमुख रस्ते व महामार्ग
-
न्यू जर्सीचे विधानभवन.
-
न्यू जर्सीचे २५ सेंट्सचे नाणे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |