Jump to content

हरी सखाराम गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ह.स. गोखले या पानावरून पुनर्निर्देशित)

हरि सखाराम गोखले ( - १६ मार्च, १९६२) हे एक मराठी कवी आणि पुस्तक प्रकाशक होते. त्यांच्या अनेक कविता शालेय पाठ्यपुस्तकांत असत. ह.स. गोखले यांनी लिहिलेल्या शुद्धलेखनावरील पुस्तकामुळे ते 'शुद्धलेखन - शुद्ध मुद्रण कोश'कर्ते हरी सखाराम गोखले या नावाने ओळखले जात. ’कांहींतरी’ हा ह.स. गोखले यांच्या कवितांचा संग्रह व्हीनस प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे..

कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेल्या ’दोष कोणाचा?’ या पुस्तकाचे ते प्रकाशक होते.

महाराष्ट्र साहित्य परिषद उत्कृष्ट काव्यसंग्रहाच्या कवीला ह.स. गोखले पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :

चांदोबाची गंमत

[संपादन]

शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकात असलेली आणि एकेकाळी मुलांची अतिशय आवडती असलेली ’चांदोबाची गंमत’ ही कविता ह.स. गोखले यांनी लिहिली होती.
ती कविता:-
ये ये ताई पहा पहा, गंमत नामी किती अहा !
चांदोबा खाली आला, हौदामध्यें बघ बुडला -
कसा उतरला ? केव्हा पडला ? पाय घसरला ?
कशास उलटे चालावे ? पाय नभाला लावावे ?
किती उंच हे आभाळ, त्याहुनी हौद किति खोल -
तरि हा ताई आई आई बोलत नाही,
चांदोबा तूं रडू नको - ताई तूं मज हसूं नको !
किती किती हें रडलास, हौद रड्याने भरलास -
तोंड मळविलें, अंग ठेचलें, तेज पळालें,
उलटा चालू नको कधी, असाच पडशिल जलामधीं !!