नितेश राणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नितेश नारायण राणे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
नितेश नारायण राणे
नितेश राणे


विधानसभा सदस्य
कणकवली साठी
विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१४
मागील प्रमोद जठार

जन्म २३ जून, १९८२ (1982-06-23) (वय: ३८)
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
पत्नी ऋतुजा राणे
नाते नारायण राणे (वडील)
निलेश नारायण राणे (भाऊ)

नितेश राणे (जन्म: २३ जून १९८२) हे महाराष्ट्रातील युवा नेते व स्वाभिमान संघटना या स्वयंसेवी,सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. नितेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे ह्यांचे पुत्र आहेत.


बालपण आणि जीवन[संपादन]

नितेश राणे यांचा जन्म २३ जानेवारी इ.स. १९८२ रोजी नारायण राणे यांच्या घरात जन्म झाला. त्यांचे एमबीए पर्यंतचे शिक्षण लंडन मध्ये झाले असून २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने नितेश राणे भारतात आले.

कारकीर्द[संपादन]

नितेश राणेंनी स्वाभिमान संघटनेची स्थापना करून कारकिर्दीची सुरुवात केली. आरोग्य समस्या ,बेरोजगारी, शिक्षण समस्या, महिला अत्याचार, नागरिकांचे मुलभूत प्रश्न ई. समस्यांवर आवाज उठवण्याचे काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुख्यत्वे मुंबई व महाराष्ट्रात केले जाते. स्वाभिमानच्या माध्यमातून नितेश राणे यांनी इ.स २००९-१० पासून पाणी चोरी व पाणीटंचाइ विरोधात मुंबईत तीव्र आंदोलन सुरु केले. टॅंकर माफिया विरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांकरिता टोल फ्री टोल फ्री सहायता क्रमांक सुरू केला. पालिका प्रशासन,स्थानिक नेते व पाणी माफिया यांच्यात असलेल्या संगनमतानेच पाण्याचा व्यापार सुरु असल्याची टीका त्यांनी केली. इ.स. २०११ मध्ये ठाणे महानगरपालिका हद्दीत रोज १० लाख लिटर अवैधपणे पाणी उपसा करण्यात येत असलेली पाईपलाईन नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेच्या सदस्यांकडून उध्वस्त करण्यात आली.

नितेश राणे यांनी स्वाभिमानच्या माध्यमातून आजवर अनेक रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना रोजगार प्रदान करण्यात आले आहेत. ऑक्टोबर इ.स. २०११ मध्ये कामगार मैदान, मुंबई येथे स्वाभिमान संघटने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवसात २५,००० हून अधिक रोजगार देण्यात आले. हा रोजगार मेळावा जागतिक विक्रम म्हणून ओळखला जातो, या रोजगार मेळाव्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली आहे.

उपक्रम[संपादन]

सप्टेंबर इ.स.२०११ मध्ये मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी व मनोरंजन क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून नितेश राणे व अनंत पणशीकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र कलानिधी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटासाठी सहाय्य करण्यात आले होते. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून मराठी चित्रपट व मालिका दिग्दर्शकांना उत्तम लोकेशन्स मिळावेत आणि अद्ययावत तंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी या हेतूने नितेश राणे व महाराष्ट्र कलानिधीच्या संकल्पनेतून मालवण मध्ये चित्रनगरी उभारण्यात येत आहे. मालवणमध्ये 10 एकरच्या परिसरात या चित्रनगरीच्या पहिल्या टप्पा उभारला जात आहे.

फेब्रुवारी इ.स.२०१२ मध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, स्थानिक लोकांना रोजगार मिळावा व येथे येणा-या पर्यटकांना योग्य माहिती मिळावी याकरता नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग टूर गाइड हा उपक्रम सुरु करण्यात आला.

फेब्रुवारी इ.स. २०१४ मध्ये, नितेश राणे यांनी नोकरी एक्सप्रेस या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली, स्थानिक युवकांना त्यांच्याच गावात किंवा जवळच्या तालुक्याच्या/शहराच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्यास, महाराष्ट्र या माध्यमातून समृद्ध करता येऊ शकेल हा उद्देश समोर ठेवण्यात आला. नोकरी एक्स्प्रेस या फिरत्या वाहनातील युनिट महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बेरोजगारांच्या मुलाखती घेतल्या जातील व त्यांच्या पात्रतेनुसार निवड झाल्यानंतर निवड केलेल्या कंपनीचे नियुक्तीपत्र त्याच ठिकाणी उमेदवारांच्या हाती देण्याची सुविधा त्यामध्ये आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच फिरते केंद्र ठरले.

मे इ.स. २०१४ मध्ये, मराठी कलावंतांना एकत्र येण्याची संधी मिळावी व मराठी कलावंतांमध्ये दडलेल्या खेळाडूला वाव देण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील गल्लीबोळात लोकप्रिय असलेल्या बॅाक्स क्रिकेटला मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने नितेश राणे यांनी महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट लीग (एमबीसीएल) या स्पर्धेची सुरुवात केली.

राजकीय व इतर घडामोडी[संपादन]

नितेश राणे यांनी २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघामधून निवडणूक लढवली व २५,००० हून अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले.

इ.स. २०१० मध्ये चिंटू शेख याने नितेश राणेंनी त्याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता, याप्रकरणी पोलीस चौकशी होऊन नंतर राणेंना क्लीन चीट देण्यात आली होती. इ.स. २०१३ मध्ये चिंटू शेखने नितेश राणेंविरोधात विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घेतली.

इ.स. २०१३-१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विकासाच्या मॉडेलवर टीका करत नितेश राणेंनी गुजराती लोकांबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मांसाहारी असल्याच्या कारणावरून मराठी माणसाला फ्लॅट न विकणार्‍या गुजराती बांधकाम व्यावसायिकांविरोधात त्यांनी भूमिका घेतली. मी सर्वच गुजराती लोकांचा द्वेष करत नसून जे गुजराती शाकाहारी-मांसाहारी असा भेद करून माणसांमधील विषमता वाढवत आहेत व मराठी लोकांवर अन्याय करत आहेत त्यांना माझा जोरदार विरोध राहील, महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे. इथे आम्ही आमच्या पद्धतीने राहणार अशी त्यांनी भूमिका घेतली.

वैयक्तिक[संपादन]

नितेश राणे यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी २८ नोवेंबर इ.स. २०१० रोजी मुंबई येथे झाला. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या नितेश राणेंना व्यंगचित्रांची आवड असून ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत. नितेश राणे ह्यांचे भाऊ निलेश नारायण राणे हे माजी लोकसभा सदस्य आहेत.


संदर्भ[संपादन]

"पाणी माफियांविरोधात टोल फ्री मोहीम". "युती आणि पाणी माफियांचे साटेलोटे - नीतेश राणे". "'स्वाभिमान'च्या मेळाव्यात 6,120 जणांना नोकरी". "स्वाभिमानच्या रोजगार मेळाव्याला तरुणांचा भरघोस प्रतिसाद". "रोजगार मेळाव्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद". "महाराष्ट्र कलानिधी : कोकणात साकारणार चित्रनगरी". "स्वाभिमानच्या `नोकरी एक्स्प्रेस' या `मोबाइल व्हॅन'चा शुभारंभ". "मराठी सेलेब्रिटीज भिडणार क्रिकेटच्या मैदानावर". "राणेंविरोधातला खटला मागे". "ऊतू नका, मातू नका." "मांसाहारी असल्यास सॅम्पल फ्लॅटही पाहणे अशक्य".

बाह्यदुवे[संपादन]