नारायण सावरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नारायण सावरकर उर्फ नारायण दामोदर सावरकर (२५ मे, इ.स. १८८८ - १९ ऑक्टोबर, इ.स. १९४९( हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे धाकटे बंधू [१] होते. ते व्यवसायाने दंतवैद्य होते.

नारायण सावरकर हे श्रद्धानंद या साप्ताहिकाचे प्रकाशक होते, तसेच हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा यांच्या दवाखान्यात सुरू झाली होती.

हिंदू महासभा आणि अभिनव भारत या संघटनांच्या अध्यक्षा हिमानी अशोक सावरकर या नारायण यांच्या स्नुषा होत्या.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ कुलकर्णी, अ. र., सावरकर, विनायक दामोदर , https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand19/index.php/component/content/article?id=10260