राजेंद्र कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजेंद्र कुमार
जन्म राजेंद्र कुमार
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय


Broom icon.svg
या लेखातील अथवा विभागातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.



राजेंद्रकुमार यांचा जन्म २० जुलै १९२९ रोजी सियालकोट, पंजाब येथे झाला.  ६० ते ७० या दशकातील ते एक प्रसिध्द अभिनेता होते. 

राजेन्द्र कुमार यांनी आपली चित्रपटातील कारकीर्द १९५० च्या *'जोगन'* या चित्रपटापासून केली.  या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्यासमवेत काम केले आहे.  १९५७ मधील *'मदर इंडिया'*  या चित्रपटात त्यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली आणि ती खूप गाजली. १९५९ मधील *'गूँज उठी शहनाई'* या चित्रपटाच्या यशाने त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली.

६० च्या दशकात एकापाठोपाठ एक असे ६-७ चित्रपट रौप्यमहोत्सवी (सिल्वर जुबली) झाल्याने त्यांना लोक *'जुबली कुमार'* म्हणून ओळखू लागले.

राजेन्द्र कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत *'धूल का फूल (१९५९),दिल एक मंदिर (१९६३),मेरे महबूब (१९६३),संगम (१९६४),आरज़ू (१९६५),प्यार का सागर,गहरा दाग़,सूरज(१९६६) आणि तलाश* असे एकाहून एक सरस चित्रपट दिले.

त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फ़िल्मफ़ेयर पुरस्कारासाठी *'दिल एक मंदिर,आई मिलन की बेला आणि आरज़ू* या चित्रपटांसाठी नामांकित केले गेले तसेच सर्वश्रेष्ठ सहअभिनेता म्हणून *'संगम'* या चित्रपटांसाठी नामांकित केले गेले.

१९८१ मध्ये त्यांनी आपला पुत्र कुमार गौरव याला 'लव स्टोरी' मधून चित्रपटात आणले.  या चित्रपटाचे ते निर्माता-दिग्दर्शक तर होतेच पण त्याचबरोबर यामध्ये त्यांनी कुमार गौरव च्या वडिलांची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफ़िस वर हीट झाला. त्यानंतर त्यांनी कुमार गौरव याच्यासोबत संजय दत्त याला घेऊन 'नाम' चित्रपट बनवला व हाही चित्रपट बॉक्स ऑफ़िस वर चांगलाच गाजला. राजेंद्रकुमार यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट *'अर्थ'* होता.

असा हा कलाकार १२ जुलै १९९९ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.