Jump to content

नयन घोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नयन घोष
जन्म २८ एप्रिल १९५६
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा तबलावादक, सतारवादक
वडील पंडीत निखील घोष
नातेवाईक पंडित पन्नालाल घोष(काका), पंडित निखील घोष(वडील), ईशान घोष(मुलगा)
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार

पंडीत नयन घोष (जन्म २८ एप्रिल १९५६) हे एक भारतीय तबला आणि सतार वादक आहेत. ते फरुखाबाद घराण्याचे तबलावादक आहेत.[]

संगीताचे शिक्षण

[संपादन]

त्यांना गायन, तबला आणि सतार वादनाचे शिक्षण त्यांचे वडील पद्मभूषण पंडित निखील घोष ह्यांच्याकडून मिळाले आणि त्यानंतर पंडित बुद्धदेव दासगुप्ता ह्यांच्याकडे शिक्षण घेतले.[] त्यानंतर त्यांनी उस्ताद अहमद जान थिरकवाँ आणि पंडित ज्ञान प्रकाश घोष ह्यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले.नयन ह्यांचे मोठे काका पंडित पन्नालाल घोष हे 'उत्तर भारतीय बासरीचे जनक' म्हणून ओळखले जातात.

कारकीर्द

[संपादन]

त्यांचा पहिला स्वतंत्र तबला वादनाचा कार्यक्रम १९६० मध्ये, त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी झाला.[]

त्यांनी पंडित रवी शंकर, उस्ताद विलायत खाँ, पंडित निखील बॅनर्जी, पंडित जसराज, पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खाँ, उस्ताद रईस खाँ, पंडित बुद्धदेव दासगुप्ता, उस्ताद सलामत अली खाँ, उस्ताद मुनावर अली खाँ, शोभा गुर्टू, गिरीजा देवी, उस्ताद शाहीद परवेझ, पंडित विश्वमोहन भट, उस्ताद रशीद खाँ आणि अशा अनेक लोकाना तबला वादनाची साथ केली आहे.[] त्यांनी हेलसिंकी, ब्रात्सिल्वा, रोम, बार्सेलोना, मुर्शीया, अथेन्स, ह्यासारख्या अंतरराष्ट्रीय म्युझिक फेस्टिव्हलमध्ये त्यांनी सतारवादन केले आहे.ते सध्या मुंबईतील संगीत महाभारती ह्या संस्थेचे संचालक आहेत. आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथील मानवी मूल्ये विभागात अतिथी प्राध्यापक आहेत.

पुरस्कार

[संपादन]

घोष यांना १९८५ साली सूर सिंगार संसद, मुंबईचा ताल मणी आणि सूर मणी पुरस्कार मिळाला आहे. कॅलिफोर्नियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरने त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाला आहे. आणि २०१३ साली, स्वर साधना समिती, मुंबईचा स्वर साधना रत्न पुरस्कार त्यांना मिळाला. भारत सरकारचा २०१४ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Nayan Ghosh". Shadaj (इंग्रजी भाषेत). 2021-05-17 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "SudeepAudio.com - Nayan Ghosh, Instrumentalist, Mumbai, Indian music". www.sudeepaudio.com. 2021-05-17 रोजी पाहिले.
  3. ^ "SudeepAudio.com - Nayan Ghosh, Instrumentalist, Mumbai, Indian music". www.sudeepaudio.com. 2021-05-17 रोजी पाहिले.
  4. ^ "SudeepAudio.com - Nayan Ghosh, Instrumentalist, Mumbai, Indian music". www.sudeepaudio.com. 2021-05-17 रोजी पाहिले.
  5. ^ "SNA: Awardeeslist::". web.archive.org. 2016-03-31. रोजी मूळ पानापासून संग्रहित2010-04-17. 2021-05-17 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)