Jump to content

धारवाडी म्हैस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धारवाडी म्हैस
स्थिती मुबलक
मूळ देश भारत
आढळस्थान बागलकोट, बेळगाव, धारवाड, बेल्लारी, बिदर, विजयपुरा, चित्रदुर्ग, कलबुर्गी, रायचूर आणि यादगीर जिल्हा (कर्नाटक)
उपयोग दुधदुभते
वैशिष्ट्य
वजन
  • नर:
    -
  • मादी:
    -
उंची
  • नर:
    -
  • मादी:
    -
पिलावळ

धारवाडी म्हैस ही मुख्यतः दूध उत्पादनासाठी पाळल्या जाणाऱ्या भारतीय म्हशीची एक जात आहे. ही प्रामुख्याने दुधाच्या उद्देशाने पाळली जाते. या म्हशीचे दूध सुप्रसिद्ध धारवाडी पेढे तयार करण्यासाठी वापरले जाते. या पेढ्याला G.I. टॅग देखील प्राप्त आहे.

या जातीचे सरासरी दुग्धोत्पादन ९७२ लिटर आहे. दैनंदिन दुधाचे उत्पादन १.५ ते ८.७ लीटरपर्यंत असते. दुधाच्या फॅटची सरासरी टक्केवारी ६.९ आहे.[] कमी पावसाच्या प्रदेशामध्ये धारवाडी म्हशींचे संगोपन करणे योग्य आहे.

धारवाडी पेढे

२०२१ साली धारवाडी म्हैस ही देशातील १७वी मान्यताप्राप्त देशी म्हशीची जात ठरली. कर्नाटकातील म्हशीची ही पहिली जात आहे ज्याला हे महत्त्व प्राप्त झाले.[] अभ्यास, संशोधन किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी जगभरात जातीची ओळख पटवण्यासाठी ही मान्यता महत्त्वाची आहे.

परंपरेने या म्हशींना मोकळेपणाने फिरू दिले जाते आणि त्यांना क्वचितच बांधले जाते. कर्नाटकातील लोक त्यांच्या दिवसभराच्या जेवणातून उरलेले अन्न भांड्यात ठेवायचे आणि ते म्हशींना खायला घालायचे. कर्नाटकात आजही ही प्रथा पाळली जाते.[]

वर्णन

[संपादन]

धारवाडी ही मध्यम आकाराची म्हैस आहे. शरीराचा रंग काळा असतो तर डोके सरळ असते. तिची शिंगे अर्धवर्तुळाकार आणि मोठी असतात. तिचे कान ताठ असतात. कासेचा आकार मध्यम असतो; टीट्सचा आकार दंडगोलाकार असतो.

अधिवास

[संपादन]

कर्नाटकातील बागलकोट, बेळगाव, धारवाड, गदग, ​​बेल्लारी, बिदर, विजयपुरा, चित्रदुर्ग, कलबुर्गी, हावेरी, कोप्पळ, रायचूर आणि यादगीर जिल्ह्यांमध्ये धारवाडी म्हशींचे पालन केले जाते.[]

धारवाडच्या म्हशींचा उत्तर प्रदेशातील उन्नावशी देखील संबंध आहे. 175 वर्षांपूर्वी, राम रतन सिंह ठाकूर प्लेगच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी त्यांच्या मूळ गावी उन्नाव येथून धारवाडला गेले, असे पुरावे सांगतात. त्यांनीच धारवाड पेढा म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या पेढा बनवायला सुरुवात केली, ज्याला GI टॅग देखील आहे.

मान्यता

[संपादन]

२०२१ साली हरियाणातील नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस या संस्थेने व्यापक संशोधन केल्यानंतर ही मान्यता दिली. धारवाई म्हशीला 17 वी मान्यताप्राप्त जात बनण्यासाठी प्रवेश क्रमांक INDIA_BUFFALO_0800_DHARWADI_01018 प्राप्त झाला. अभ्यास, संशोधन किंवा यापुढील इतर कोणत्याही हेतूंसाठी या संहितेद्वारे जगभरात जातीची ओळख पटवली जाईल. धारवाड येथील कृषी विज्ञान विद्यापीठातील पशुवैद्यकीय विज्ञान विभागाने स्थानिक जातीला ही अनोखी ओळख मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. म्हशीच्या या देशी जातीचा आता एक प्रवेश कोड क्रमांक आहे – "INDIA_BUFFALO_0800_DHARWADI_01018". आता, या संहितेचा वापर या जातीवरील पुढील संशोधन आणि अभ्यासासाठी केला जाईल.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Dharwadi Buffalo". ICAR- National Bureau of Animal Genetic Resources (इंग्रजी भाषेत). 2022-05-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Indigenous Buffalo Breed from Karnataka's Dharwad Wins National Recognition". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-05-14 रोजी पाहिले.
  3. ^ "Dharwad buffalo joins the hall of fame of celebrated indigenous cattle in India". Gaonconnection | Your Connection with Rural India (इंग्रजी भाषेत). 2021-09-28. 2022-05-14 रोजी पाहिले.