धानोरा (बु.)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतीय जनगणना २०११ नुसार माहिती[संपादन]

या गावाची स्थान कोड संख्या (Location code number)] ५६०३१० आहे व लोकसंख्या ३२०२ आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या १६६७ तर महिलांची संख्या १५३५ इतकी आहे. ० ते ६ या वयोगटातील पुरुषांची संख्या २०४ तर स्त्रियांची संख्या २०१ आहे. या गावातील घरांची एकूण संख्या ६९२ आहे. या गावातील एकूण लोकसंख्येपैकी २१३७ व्यक्ती या साक्षर आहेत तर यांपैकी १२१३ हे पुरुष आणि ९२४ स्त्रिया आहेत; १०६५ निरक्षर व्यक्तींमध्ये ४५४ पुरुष आणि ६११ स्त्रिया आहेत.[१]

शैक्षणिक माहिती[संपादन]

गावात पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची सुविधा आहे. जिल्हा परिषदेची इयत्ता १ली ते ७ पर्यंतची शाळा आहे[२] आणि इयत्ता ५ वी ते १० पर्यंत वसंत विद्यालय धानोरा (बु.) येथे शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.याच शाळांमधून शिकलेले काही विद्यार्थी पुढे उच्यविद्याविभूषित झाले आहेत सध्या त्यापैकी काहीजण परदेशांत संशोधन करत आहेत तर काहीजण विविध विद्यापीठात प्राध्यापक आहेत. इतर शिक्षक, अभियंते, डॉक्टर, सरकारी अधिकारी, खासगी कंपन्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. खेड्यामध्ये शाळा असूनही येथील शिक्षणाचा दर्जा गुणवत्तापूर्ण आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा (बु.) चा समोरील बाजूचा फोटो ०५/०२/२०१७ रोजी सूर्यास्तावेळी.

मंदिर परिसर[संपादन]

गावातील सर्व माणसांचे भेटण्याचे ठिकाण हे मंदिर परिसर आहे. गावातील बरेच निर्णय व्यवहार, एकमेकांच्या भेटीगाठी याच परिसरात होतात. मंदिर परिसरात हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, महादेव व दत्त मंदिर आहे यापैकी हनुमान मंदिर हे इतरांच्या तुलनेत अतिशय जुने मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या मागे एक पिंपळाचे अतिशय जुने झाड आहे. सारे गावकरी बैलपोळ्याचा सण याच मंदिरांभोवती अतिशय उत्साहाने, आनंदाने साजरा करतात. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा, विविध कार्यक्रम हे याच मंदिरात होतात. गावातील बस थांबण्याचे ठिकाणही हे मंदिर परिसर आहे. त्यामुळे गावाचा मंदिर परिसर हे या गावाचे एकप्रकारे वैचारिक, व्यावहारिक उलाढालीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणायला काही हरकत नाही.

संदर्भ[संपादन]