धर्मेंद्र
| धर्मेंद्र | |
|---|---|
|
धर्मेंद्र | |
| जन्म |
धरमसिंग देओल ८ डिसेंबर, १९३५ खन्ना, पंजाब प्रांत, ब्रिटिश भारत (आत्ता खन्ना, पंजाब, भारत |
| मृत्यू |
२४ नोव्हेंबर, २०२५ (वय ८९) मुंबई |
| इतर नावे | गरम धरम, ही मॅन |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| कारकीर्दीचा काळ | १९६०-२०२५ |
| पत्नी |
प्रकाश कौर (ल. १९५४) ,
|
| अपत्ये |
सनी देओल बॉबी देओल इशा देओल अहाना देओल |
धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र (पंजाबी: ਧਰਮਿੰਦਰ ਸਿੰਘ ਦਿਉਲ ; हिंदी: धर्मेन्द्र ;) (८ डिसेंबर, १९३५ — २४ नोव्हेंबर, २०२५) हे हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते होते. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्रा यांनी २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे तो अॅक्शन हीरो म्हणून विशेष परिचित होता. सनी देओल, बॉबी देओल व ईशा देओल ही त्यांची मुलेही हिंदी चित्रपटांतील अभिनेते आहेत.
धर्मेंद्रने उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. इ.स. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींत ते राजस्थानच्या बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य झाले.
त्यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे त्यांच्या निवास्थानी अखेरचा श्वास घेतला.[१]
चित्रपट
[संपादन]धर्मेंद्र यांना मिळालेले पुरस्कार
[संपादन]- पुण्याच्या यूएसके फाउंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१७)
संदर्भ
[संपादन]- ^ Naik, Payal (2025-11-24). "बॉलिवूडचा ही -मॅन हरपला! अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चाहत्यांना धक्का". Marathi News Esakal. 2025-11-24 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील धर्मेंद्र चे पान (इंग्लिश मजकूर)