Jump to content

धर्मराजिका स्तूप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धर्मराजिका स्तूप
सर्वसाधारण माहिती
प्रकार स्तूप
ठिकाण तक्षशिला, पाकिस्तान
बांधकाम सुरुवात इ.स.पू. ३ रे शतक
पूर्ण इ.स. ५ वे शतक

धर्मराजिका स्तूप (तक्षशिलेचा महान स्तूप) हा पाकिस्तानमधील तक्षशिला भागातला एक मोठा बौद्ध स्तूप आहे.

इतिहास

[संपादन]

इ.स.पू. ३ ऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोकांनी बुद्धांच्या अस्थींचे जतन करण्यासाठी हा स्तूप बांधला होता. पुढील शतकांमध्ये या स्तूपाला आणखी मजबूती देण्यात आली आणि त्यासाठी मूळ बांधकामाच्या भोवताली लहान लहान गोलाकार स्तूप बांधले गेले आणि इतरही काही बांधकामे केली गेली. इंडो-ग्रीक राजा दुसरा झॉयलस यांच्या काळातली अनेक नाणी, ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात बांधलेल्या स्तूपांच्या पायामध्ये सापडलेली होती.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]