धनगरमोहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?धनगरमोहा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर गंगाखेड
जिल्हा परभणी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

धनगरमोहा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

गंगाखेड या तालुक्याच्या शहरापासून साधारणता 18 किलोमीटरवर हे गाव आहे. गंगाखेड वरून गंगाखेड परळी हायवे ने पडेगाव, वडगाव रेल्वे स्थानक वरून दक्षिणेला पाच किलोमीटरवर हे गाव आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेच्या पायथ्याशी हे गाव आहे. या गावाच्या पश्चिम दक्षिण ते पूर्व असा डोंगर वसलेला आहे. सध्या या डोंगरावर सौर ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणात एका खाजगी कंपनीकडून उभा केलेला आहे. संपूर्णतः डोंगर हा खाजगी कंपनीच्या ताब्यात असून शेतकऱ्यांनी त्या डोंगराची विक्री केलेली आहे. याच डोंगरावर महादेवाचे हे प्रसिद्ध असे मंदिर आहे.

हवामान[संपादन]

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन[संपादन]

ग्रामीण पारंपारिक विविध जाती धर्माचे लोक एकत्रित गुण्यागोविंदाने येथे राहतात. विविधतेत एकता, सर्वधर्मसमभाव, सहकार्याची भावना, आपलेपणा, माणूसपण, मानवता धर्म, एकमेकांना मदत करण्याची प्रथा आणि विशेषतः कर्मकांड, अंधश्रद्धेपासून दूर असणारा प्रामुख्याने अल्पभूधारक कोरडवाहू शेती असलेला शेतकरी वर्ग आणि शेतमजूर मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे. साधारणतः 80 टक्के लोकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून 20 टक्के शेतकरी आणि नोकरदार सदन आहेत. शिक्षणाचे व सरकारी आणि खाजगी नोकरदारांचे प्रमाण अधिक आहे. या गावचे सुपुत्र भाई ज्ञानोबा हरी गायकवाड हे शेतकरी कामगार पक्षाकडून गंगाखेड विधानसभेचे साधारणता वीस वर्ष सदस्य होते.

गावामध्ये सातवीपर्यंत शाळा आहे. गावात खरीपमध्ये हायब्रीड ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन ही पिके घेतली जातात. बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. सिंचनाची कुठलीही सुविधा नसताना केवळ कुपनलिकेद्वारे या गावात शेती केले जाते.

सीताफळ हंगामामध्ये सीताफळांची विक्री ही या गावातील करणारे अनेक नागरिक आहेत.

हे प्रामुख्याने या गावातील लोक गंगाखेड येथे सोमवारी आठवडी बाजाराला, शनिवारी आठवडी बाजार आणि जनावराच्या बाजारासाठी, दवाखान्यासाठी, शिक्षणासाठी, व्यापारासाठी ये जा करतात.

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

धनगर मोहा तालुका गंगाखेड येथे महादेवाचे मंदिर आहे. धनगर मोहा गावाच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या गेलेल्या डोंगरावर हे मंदिर वसलेले आहे. पंचक्रोशीत एक जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी अनेक जण आपापल्या वेगवेगळ्या इच्छा पूर्तीसाठी नवस बोलतात. एप्रिल मे मध्ये "अबंलीबारस" या दिवशी आणि साधारणता जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठा सप्ताह चालतो. पंचक्रोशीतून आणि गावातील सर्व नागरिक या वेळेस रात्रंदिवस या ठिकाणी जमतात. डोंगरावर हिरवेगार झाडे, नयनरम्य परिसर पाहण्याची सुविधा असून वाहन जाण्यासाठी रस्ता आहे. सप्ताहाच्या दरम्यान नामांकित कीर्तनकारांचे याठिकाणी कीर्तनाचे आयोजन केले जाते.

धनगर मोहा या गावच्या शेजारीच हरंगुळ हे पोस्टाचे ठिकाण आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून विशेषतः श्री राजाभृतहरी नाथ महाराज यांचे मंदिर आहे. दरवर्षी या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. या यात्रेला गंगाखेड तालुका, परभणी जिल्हा तसेच परळी, बीड आजूबाजूच्या जिल्ह्यातून, खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने महिला, भगिनी, नागरिक यात्रेला येतात. ही प्रसिद्ध अशी यात्रा आहे.

नागरी सुविधा[संपादन]

गावात सिमेंट रस्ते आहेत. गंगाखेड या तालुक्याच्या ठिकाणाहून थेट गावापर्यंत हरंगुळ, वडगाव मार्गे आणि खादगाव मार्गे डांबरीकरण झालेला रस्ता आहे. गावामध्ये वीज, पाणी, रस्ते या सुविधा आहेत .प्रामुख्याने शाळा सातवीपर्यंत असून पुढील शिक्षणासाठी मुला-मुलींना हरंगुळ वडगाव किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.

दवाखान्याची गावांमध्ये सोय नसून प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी किंवा एखादी खाजगी डॉक्टर आठवड्यातून एकदा गावामध्ये तपासणीसाठी येतात.

जवळपासची गावे[संपादन]

उखळी खुर्द, हरंगुळ, खादगाव, पडेगाव, डोंगरगाव शे,डोंगर पिंपळा, कोदरी, बडवणी, मानका देवी, कार्बेटवाडी, पोखरणी, अकोली, हरंगुळ वडगाव

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate