दोल पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दोल यात्रा मिरवणूक

दोल पूर्णिमा, दोल जत्रा , दोलोत्सव हा व्रज, बांगलादेश, ओरिसा, आसाम, पश्चिम बंगाल या प्रांतात साजरा होणारा महत्वाचा उत्सव आहे.[१] पद्म पुराण या ग्रंथात या व्रताचे वर्णन केलेले आहे.[२]

स्वरूप[संपादन]

मदनगोपाल आणि राधा मूर्ती

होळी या सणाचे हे एक रूप असून फाल्गुन महिन्यात हा उत्सव साजरा करताना राधा आणि कृष्ण यांना तो समर्पित केला जातो अशी या सणाची परंपरा आहे.[३] हा उत्सव चैतन्य महाप्रभू यांच्या गौडीय वैष्णव परंपरेतील एक महत्वाचा उत्सव मानला जातो.[४] या दिवशी भगवान कृष्ण आणि राधा यांची झोपाळ्यावर बसून मिरवणूक काढली जाते. त्याना अबीर आणि गुलाल यांनी स्नान घातले जाते. मिरवणुकीत विविध वाद्यांचा घोष केला जातो. शंखनाद केला जातो.[५] भाविक या मिरवणुकीत सहभागी होवून भक्तीनृत्य करतात. कौटुंबिक स्तरावर लोक राधा आणि कृष्णाची पूजा करतात आणि देवतेला लोणी, तूप, पंचामृत याचा नैवेद्य दाखवितात. आलेल्या भाविकांना याचा प्रसाद वाटला जातो.[६]

उत्सवाच्या पहिल्या दिवशी भगवान कृष्ण यांच्या घुनुचा येथील भेटीची आठवण केली जाते. या दिवशी कृष्ण मंदिरापुढे होळी प्रज्वलित केली जाते आणि कृष्णाच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते.पश्चिम बंगाल प्रांतात हरी बोल असा गजर करीत मिरवणूक संपन्न होते. दुसऱ्या दिवशी दिवंगत पूर्वजांच्या तसबिरीला अबीर, गुलाल असा रंग लावला जातो.घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या पायावर गुलाल लावून आशीर्वाद घेतले जातात. नातेवाईक, इष्टमित्र यांच्या घरी जाऊन रंग खेळून रसगुल्ले खाल्ले जातात.तिसऱ्या आणि चौथ्थ्या दिवशी रंग खेळणे, मिरवणूक असा आनंद सुरू राहतो.[७]

२०० वर्ष पुरातन पालखी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Mouli Ganguly: In Bengal we celebrate Dol Jatra or Dol Purnima like Holi". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2022-03-17. 2023-02-24 रोजी पाहिले.
  2. ^ Parvatīya, Līlādhara Śarmā (1995). Bhāratīya saṃskr̥ti kośa (हिंदी भाषेत). Rajpal & Sons. ISBN 978-81-7028-167-2.
  3. ^ "Dol Jatra 2022: Date, Traditions, Significance And All You Need To Know About The Holi Celebration of Eastern India | 🙏🏻 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2022-03-15. 2023-02-24 रोजी पाहिले.
  4. ^ Bhatia, Varuni (2017-08-09). Unforgetting Chaitanya: Vaishnavism and Cultures of Devotion in Colonial Bengal (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-068626-0.
  5. ^ Verma, Manish (2013). Fasts and Festivals of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-7182-076-4.
  6. ^ "Dol Jatra 2022: Date, Traditions, Significance And All You Need To Know About The Holi Celebration of Eastern India | 🙏🏻 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2022-03-15. 2023-02-25 रोजी पाहिले.
  7. ^ sidra.ghazali@topagency.com (2022-09-21). "Dolyatra". National Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-27 रोजी पाहिले.