दिमापूर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिमापूर
भारतीय रेल्वे टर्मिनस
स्थानक तपशील
पत्ता दिमापूर, दिमापूर जिल्हा
गुणक 25°54′21″N 93°43′41″E / 25.90583°N 93.72806°E / 25.90583; 93.72806
समुद्रसपाटीपासूनची उंची १५४ मी
मार्ग दिब्रुगढ-लुमडिंग मार्ग
फलाट 3
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९०३
विद्युतीकरण नाही
संकेत DMV
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर पूर्व सीमा रेल्वे
स्थान
दिमापूर is located in नागालँड
दिमापूर
दिमापूर
नागालॅंडमधील स्थान

दिमापूर रेल्वे स्थानक हे भारताच्या नागालॅंड राज्याच्या दिमापूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे नागालॅंड राज्यातील एकमेव रेल्वे स्थानक असून गुवाहाटीकडून दिब्रुगढकडे धावणाऱ्या सर्व गाड्या येथे थांबतात.

१९०३ साली बांधले गेलेले दिमापूर स्थानक ब्रिटिशकालीन आसाम बंगाल रेल्वेच्या चित्तगॉंग-दिब्रुगढ ह्या मीटर गेज मार्गवरील एक स्थानक होते. १९९७ साली ह्या स्थानकाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर केले गेले. आजच्या घडीला दिमापूर हा नागालॅंड व मणिपूरला भारतीय रेल्वेद्वारे जोडणारा एकमेव दुवा आहे. येथून दर आठवड्याला ४९ गाड्या सुटतात. १२३ किमी लांबीच्या दिमापूर-कोहिमा रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी भारत सरकारने कार्यक्रम आखला आहे.

प्रमुख गाड्या[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]