दहिवद, अमळनेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दहिवद हे जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातील एक प्रसिद्ध आणि मोठे गाव आहे. अमळनेर या तालुक्याच्या ठिकाणा पासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हे गाव खंडोबाच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे.

लोकसंख्या[संपादन]

दहिवद हे १६३१.५२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून, २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावाची लोकसंख्या ४९२५ असून एकूण कुटुंबे ११३१ कुटुंबे आहेत. यामध्ये २५२५ पुरुष आणि २४१० स्त्रिया आहेत.[१] दहिवदच्या सर्वात जवळचे शहर अमळनेर १७, धरणगाव २६ तर चोपडा २९ किमी अंतरावर आहे.

साक्षरता टक्केवारीत[संपादन]

  • एकूण साक्षर लोकसंख्या: ७६.४१%
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ८४.९७%
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ६७.५५%

शैक्षणिक सुविधा[संपादन]

दहिवद येथे परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा व कनिष्ठ माध्यमिक विद्यालय अर्थात नवभारत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हायस्कूल आहे.

वैद्यकीय सुविधा (शासकीय)[संपादन]

दहिवद येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.

संपर्क व दळणवळण[संपादन]

दहिवद येथे पोस्ट ऑफिसची सुविधा उपलब्ध असून त्याचा पिन कोड ४२५४०१ आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. अमळनेर आणि जवळच्या टाकरखेडे या गावी रेल्वेची सुविधा आहे.

आरोग्य[संपादन]

दहिवद ला प्राथमिक आरोग्य केंद्राची सोय आहे (पीएचसी) बहुतेक लोक सामान्य रोगांचे मूलभूत उपचार आणि त्यांच्या मुलांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जातात.

वीज[संपादन]

प्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे.

उत्पादन[संपादन]

गावातील प्रमुख व्यवसाय शेतीच आहे. कापूस, गहू, भुईमूग, ज्वारी, बाजरी, दादर हे मुख्य पीक आहेत

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.census2011.co.in/data/village/527448-dahiwad-maharashtra.html