तुर्की एरलाइन्स
| ||||
स्थापना | २० मे १९३३ | |||
---|---|---|---|---|
हब | इस्तंबूल अतातुर्क विमानतळ | |||
मुख्य शहरे | इझ्मिर, अंकारा | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | माइल्स अँड स्माईल | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
विमान संख्या | २६७ | |||
ब्रीदवाक्य | Widen Your World | |||
मुख्यालय | इस्तंबूल, तुर्कस्तान | |||
संकेतस्थळ | http://www.turkishairlines.com/ |
तुर्कीश एरलाइन्स (तुर्की: Türk Hava Yolları) ही तुर्कस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३३ साली स्थापन झालेली तुर्कीश एरलाइन्स तुर्कस्तानमधील ४१ व जगातील २०६ शहरांना विमानसेवा पुरवते. ह्या बाबतीत तुर्कीश एरलाइन्सचा जगामध्ये चौथा क्रमांक लागतो. तुर्कीश एरलाइन्स १ एप्रिल २००८ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. यांचे प्रधान कार्यालय इस्तंबूल येथील येसिल्कोय मधील अटतुर्क विमानतळावरील तुर्कीश एरलाइन जनरल मॅनेजमेंट बिल्डिंग मध्ये आहे.[१] यांची मुख्य केंद्र स्थाने इस्तंबूल अटतुर्क विमानतळ, एसेंबोगा आंतरराष्ट्रीय विमानतळ, सबीना गोकीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.[२]
इतिहास
[संपादन]सुरुवातीचा काळ
[संपादन]तुर्कीश देशाचे संरक्षण मंत्रालय विभागाचे देव्लेट हवा योल्लरी हे प्रशासन प्रमुख असताना या एरलाइनची 20 मे 1933 रोजी स्थापना झाली.[३] त्यावेळी त्यांचेकडे 5 बैठका असणारी 2 कर्टिस्स किंगबर्ड्स, 4 बैठका असणारी 2 जांकर्स F.13s, आणि 10 बैठका असणारे एक तुपोलेव ANT-9, ही विमाने होती. सन1935 मध्ये या विमान कंपनीचे रूपांतर देशाचे मंत्रालयाच्या सार्वजनिक कामकाजाकडे झाले त्याच बरोबर यांचे जनरल डायरोक्टरेट ऑफ स्टेट एर लाइन्स असे नाव केले. त्यानंतर पुढील तीन वर्षानी म्हनजे 1938 मध्ये ही विमान कंपनी देशाचे दळणवळण विभागाची एक भाग झाली.[४]
युद्दानंतरचा काळ
[संपादन]सन 1947 मध्ये या विमान कंपनीची आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाली. त्यात अंकारा इस्तंबूल अथेन्स या ठिकाणांचा समावेश होता. निकोसिया,बैरूत,आणि कैरो या आंतरराष्ट्रीय विमान सेवेची त्यात भर पडली. सन1960 पर्यंत तुर्कीश राष्ट्रीय विमान सेवा मात्र पूर्वीचीच कायम राहिली.
सन 1956 मध्ये तुर्क सरकारने व्यवस्थापनात थोडाफार बदल करून या विमान सेवेचे नाव तुर्क हवा योल्लरी A.O.(टोपण नाव THY) असे केले. या कंपनीत TRL 60 मिल्लियन भाग भांडवल घातले. पुढील थोड्याच काळात ही कंपनी आंतरराष्ट्रीय एर ट्रान्सपोर्ट असोसिएशनला (IATA) जोडली. सन1957 मध्ये ब्रिटिश ओवर्सीस एर वेज संघटनेला या कंपनीचे पुढील 20 वर्षासाठी 6.5% भाग प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या विमान कंपनीला तांत्रिक सहकार्य केले.
ही विमान कंपनी आतापर्यंत म्हणजे सन 1960 पर्यंत सेवरल डगलस DC-3s, C-47s,विक्केर्स विस्कौंट्स, फोक्कर F27s, ही विमाने वापरत होती. या विमान कंपनीने सन 1967 मध्ये पहिल्यांदाच मॅकडोन्नल्ल डग्लस DC-9, मॅकडोन्नल्ल डग्लस DC-10, फोक्कर F28, ही जेट विमाने आपल्या संचात वापरण्यास सुरुवात केली. त्यात 1971 मध्ये तीन बोइंग 707 जेट विमानांची भर पडली.[५] सन 1970चे सुरुवातीचे काळात वापरात असणारी मॅकडोन्नल्ल डग्लस DC-10, फोक्कर F28, ही परत सन 1972 आणि 1973 मध्ये प्रवाशी सेवेत आणली.
कंपनी कामकाज
[संपादन]बिलाल एकसी हे या विमान कंपनीचे ऑक्टोबर 2016 पर्यंत अध्यक्ष आणि CEO आहेत.
व्यवसाय
[संपादन]या विमान कंपनीची मागील 13 वर्षापासून व्यवसायाची चढती कमानच झालेली आहे हे खालील तपशीलातून निदर्शनास येईल.
2003 | 2004 | 2005 | 2006 | 2007 | 2008 | 2009 | 2010 | 2011 | 2012 | 2013 | 2014 | 2015 | |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
खेळतेभांडवल | 4846 | 2593 | 2956 | 3912 | 4860 | 6123 | 7036 | 8423 | 11811 | 14909 | 18777 | 24158 | 28752 |
निव्वळ नफा | 243 | 107 | 138 | 179 | 265 | 1134 | 559 | 286 | 19 | 1133 | 683 | 1819 | 2993 |
एकूण प्रवाशी | 10.4 | 12 | 14 | 16.9 | 19.6 | 22.6 | 25.1 | 29.1 | 32.6 | 39 | 48.3 | 54.7 | 61.02 |
प्रवाशीभार | 67 | 70 | 72 | 69 | 73 | 74 | 71 | 74 | 73 | 77 | 79 | 79 | 78 |
सामान | 123 | 135 | 145 | 160 | 183 | 199 | 238 | 314 | 388 | 471 | 565 | 668 | 720 |
विमान संच | 65 | 73 | 83 | 103 | 102 | 127 | 134 | 153 | 179 | 200 | 233 | 261 | 299 |
गंतव्यस्थाने | 103 | 102 | 107 | 134 | 138 | 142 | 156 | 171 | 189 | 217 | 243 | 264 | 284 |
उपलब्ध |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
गंतव्य ठिकाणे
[संपादन]सप्टेंबर 2016 अखेर या एरलाइनची युरोप,एशिया,आफ्रिका,अमेरिका या खंडातील 115 देशात 291 गंतव्य ठिकाणे आहेत.
कायदेशीर भागीदारी करार
[संपादन]या विमान कंपनीचे खालील विमान कंपनीशी भागीदारी करार आहेत
- अद्रिय एरवेझ
- एजियन एरलाइन्स
- एर अलजरी
- एर अस्ताना
- एर कॅनडा
- एर चायना
- एर युरोप
- एर इंडिया
- एर माल्ता
- एर न्यू झीलंड
- ऑल निप्पॉन एर वेज
- असियांना एर लाइन्स
- अवियंका
- अवियंका ब्राझील
- आझरबैजन एरलाइन
- क्रोटीया एरलाइन
- ईजिप्त एर
- इथिओपियन एरलाइन
- ईतीहाड एर वेज
- EVA एर
- गरुडा इंडोनेशिया
- हवाईयन एरलाइन
- इराण एर
- जेट ब्ल्यु
- LOT पॉलिश एरलाइन
- लक्स एर
- ओमान एर
- पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन
- फिलिपाईन एरलाइन
- रोयल एर मारको
- रोयल बृनेरी एरलाइन
- रोयल जोर्डनियन
- र्वंड एर
- स्कंडियांवियन एरलाइन
- सिंगापूर एरलाइन
- TAP पोर्तुगाल
- थाई एरवेझ
- युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन
- युनायटेड एरलाइन
- युतइर अवियशन
विमानाची छबी (दिखावट)
[संपादन]विमानाच्या सफेद रंगावर निळी अक्षरे आहेत. विमानाचा मुख्य भागावर एक फूल चित्रित केलेले आहे ते विमानाचे शेपटीकडे धावते आहे आणि लाल शेपटीवर विमान कंपनीचा लोगो सफेद रंगाचे वर्तुळात दिसतो.
विमानाची दुरूस्ती
[संपादन]यांचे विमान देखभालीचे मुख्य केंद्र इस्तंबूल अटतुर्क विमान तळावर आहे.
बक्षिसे
[संपादन]युरोपची बेस्ट एर लाइन म्हणून स्क्यट्रक्स बक्षीस, दक्षिण युरोपची बेस्ट एरलाइन अवॉर्ड, जगातील बेस्ट प्रीमियम किफायतशीर वर्ग बैठक व्यवस्था अवॉर्ड,सतत 2011,2012,2013 या वर्षी प्राप्त झालेत.[६] हे सातत्य 2014 व 2015 रोजीही कायम ठेवलेले आहे. शिवाय सन 2013चे विमान वाहतूक खबर बक्षीस कार्यक्रमात या वर्षाची एर लाइन म्हणून या कंपनीला अवॉर्ड दिला.[७]
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
संदर्भ
[संपादन]- ^ "डिस्कॉव्हर तुर्कीश एरलाइन्स". 2016-09-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-16 रोजी पाहिले.
- ^ "अंकारा विल बिकम थर्ड तुर्कीश एरलाइन्स हब".
- ^ "तुर्कीश एरलाइन्स - हिस्टरी". 2016-05-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-16 रोजी पाहिले.
- ^ "हिस्टरी ऑफ तुर्कीश एरलाइन्स".
- ^ "कॉंनेक्टिव्हिटी ॲंड फ्लीट इन्फॉर्मशन ऑफ तुर्कीश एरलाइन्स". 2017-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-16 रोजी पाहिले.
- ^ "तुर्कीश एरलाइन्स चोजन ऍज दि "बेस्ट एरलाइन्स इन युरोप" फॉर दि सिक्सथ कॉन्सकटीव्ह इयर्स इन दि सक्यट्रॅक्स वर्ल्ड एरलाइन्स अवॉर्ड्स". 2013-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-16 रोजी पाहिले.
- ^ "एर ट्रान्सपोर्ट न्यूझ अवॉर्ड्स इन 2013". 2016-09-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-16 रोजी पाहिले.